Monday 23 June 2014

शिर्डी विमानतळावर चोरट्यांचा सुळसुळाट
सिमेंट, लोखंडी एंगल, सुरक्षा तार, हजारो लिटर डिजलची होतेय चोरी
  शिर्डी(प्रतिनिधी):-
                                      शिर्डी देवस्थानासाठी उभारण्यात आलेल्या काकडी विमानतळावरून येत्या काही दिवसात विमान उड्डाण करण्याच्या तयारीत असताना रात्रीच्या वेळेस येथे खूप मोठ्या प्रमाणावर चोर्या होत आहेत  रात्रीतून हजारो रुपयांच्या ऐवजाची चोरी होत असून विमानतळ उभारणार्या वसिष्ठ कंपनीसमोर याचे मोठे संकट उभे राहिले आहे.
                                       कोपरगाव तालुक्यात काकडी येथे सुरु होत असलेले विमानतळ अंतिम टप्यात असून या विमानतळाचे काम वसिष्ठ प्रोजेक्ट या कंपनीला देण्यात आलेले आहे. रण वे, टर्मिनल इमारत,  रस्ते,  हि महत्वाची  कामे पूर्ण झाली असून  संरक्षक भिंत व काही किरकोळ स्वरूपाची कामे सुरु आहेत. या दरम्यान रात्री  येथे खूप मोठ्या स्वरूपात चोर्या होत आहे असे वसिष्ठ कंपनीचे व्यवस्थापक श्री. व्यंकटेश्वरा यांनी सांगितले.  विमानतळाचा परिसर खूप मोठा असल्याने येथे चोर्यांचे प्रमाण वाढत आहे. येथे टर्मिनल इमारतीचे काम सुरु असताना हि इमारात विमानतळाच्या  बाजूला असल्याने एकाच वेळी  येथून ७० गोण्या सिमेंटची चोरी झाली आहे. बाजारभावाप्रमाणे याची किमत २१ हजार रुपये आहे. येथे संरक्षक भिंतीचे काम सुरु असून यासाठी  लोखंडी एंगल  व तारा वापरण्यात येत आहेत  रोज रात्री या एंगल व तारांची चोरी होत आहे. विमानतळाच्या कामासाठी खूप मोठ्या प्रमाणात डीजल लागत असून एकाच वेळेस २० हजार लिटर डिजल आणले जाते व प्रकल्पातील मोठ्या टाकीमध्ये टाकले जाते रात्रीच्या वेळेस या टाकीचे फिल्टर खोलून या टाकीतून लाखो रुपयांच्या हजारो लिटर डिजलची चोरी केली जात आहे. या चोर्यांमुळे विमानतळ कंपनी त्रस्त झाली असून या घटनेमध्ये वरिष्ठांनी लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे. या ठिकाणी वसिष्ठ कंपनीच्या लाखो रुपयांच्या मशनरि  उभारलेल्या असून या सर्व माशानारीना सुरक्षा रक्षक नेमने अशक्य आहे. याच कंपनीला काकडी विमानतळ ते शिर्डी हा रस्ता बनवण्याचे  काम मिळाले असल्याने अनेक  नवीन मशनरी येथे आणल्या गेल्या आहेत. या मशनरिना  देखील मोठा धोका असून चोरटे यांचे देखील नुकसान करू शकतात अशी भिती कंपनीला वाटू लागली आहे. या सर्व घटनांची शिर्डी पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली आहे असे श्री. व्यंकटेश्वरा यांनी सांगितले. या सर्व परिस्थितीमध्ये प्रशासनाने विशेष लक्ष घालून  या चोर्यांना लवकरात लवकर आळा घालण्याची गरज निर्माण झाली आहे. 

 विमानतळाचे काम पूर्णत्वाकडे जात आहे  मात्र ज्या गावात विमानतळ होत आहे त्या काकडी गावात अजुनपर्यंत कोणत्याही पायाभूत सुविधांकडे लक्ष देण्यात आलेले नाही. अनेक मुलभूत  सुविधांपासून हे गाव वंचीत आहे.