Tuesday 28 May 2019

पाण्याचे योग्य नियोजन करण्याचे आ. कोल्हे यांच्या आधिका-यांना सुचना


धोंडेवाडी साठवण तलावाची आ..कोल्हे , तहसीलदार चंद्रे यांच्याकडून पाहणी 

शिर्डी लाइव्ह (प्रतिनिधी):- 
                                       यावर्षीचा दुष्काळ फार मोठा आहे .पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात आहेतेंव्हा रांजणगांव देशमुख सहा गावांची प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या धोंडेवाडी साठवण तलावातील पाण्यांचे काटकसरींने नियोजन करावे.पाणी गळती याकडे लक्ष द्यावे. रांजणगांव देशमुख गावांसाठी टँकरद्वारे दोन एवजी पाच पाण्यांच्या खेपा करून त्याचा उदभव बदलुन द्यावा असा आदेश स्नेहलता कोल्हे यांनी तहसिलदार योगेश चंद्रे प्रभारी गटविकास अधिकारी पी. डी. वाघीरे यांना दिला.
आमदार स्नेहलता कोल्हे यांनी शुक्रवारी धोंडेवाडी साठवण तलावास भेट देवुन पाहणी करून टंचाई आढावा बैठक घेतली.
                                     आ कोल्हे यावेळी बोलतांना म्हणांल्या की वीजेच्या थकबाकीमुळे विजपुरवठा बंद झालेला होता. या पाणीसाठवण योजनेचा वीज प्रवाह उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचेशी चर्चा करुन सुरु करण्यात आला आहे.. गोदावरी कालव्यांच्या चालू पाटपाणी आर्वतनांत या साठवण तलावात पाणी घेतले तो पूर्ण क्षमतेने भरण्यांबाबत आपण संबंधीत अधिका-यांना सुचना केल्या होत्या पण पाणी कमी दिवस चालल्याने दोन मिटर पाणी साठा झाला आहे.
                                           यावेळी ग्रामस्थ आपले प्रश्न मांडतांना म्हणाले कि,जनावरांच्या पिण्यांच्या पाण्यांचा चा-याचा प्रश्न गंभीर आहे. जवाहर विहीर योजनेत 80 प्रस्ताव तयार आहे मात्र शासन अटीमुळे त्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत तो दुर करावा अशी मागणी केली. रांजणगांव देशमुख सह दहा गावांत 7 हजार 610 पशूधन असून त्यांच्या चा-यासाठी या परिसरात छावणी सुरू करावी तसेच पिण्यांच्या पाण्यांचे टँकरच्या खेपा अवघ्या दोनच होतात त्यामुळे जनावरांच्या पिण्याचे पाण्यांचे हाल होत आहे तेंव्हा टँकरखेपा वाढवाव्या अशी मागणी ग्रामस्थांनी केली. त्यावर तहसिलदार योगेश चंद्रे यांनी छावणी एवजी दोन दिवसांत सर्व्हेक्षण करून चारा डेपो सुरू करण्यांबाबत नियोजन करू. वडझरी ते रांजणगांव देशमुख हा रस्ता अत्यंत खराब झाला आहे त्याच्या दुरूस्तीसाठी प्रयत्न करावेत. डाळींब पीकविमा, दुष्काळी अनूदान, सोयाबीन पीकविमा तात्काळ मिळावा अशा शेतक-यांनी मागण्या केल्या. डॉ बाबासाहेब आंबेडकर विहीर योजनेतील पैसे दोन वर्षापासून मिळत नाही ते मिळावे अशी लाभधारकांनी मागणी केली. आमदार स्नेहलता कोल्हे यांनी शेतक-यांच्या नागरिकांच्या तक्रारी ऐकुन घेत त्याच्या निरसनासाठी प्रयत्न करू असे सांगितले. याप्रसंगी सहकारमहर्षि कोल्हे कारखान्यांचे उपाध्यक्ष संजय होन, साईनाथ रोहमारे, संचालक अशोक औताडे,बाजार समितीचे संचालक नानासाहेब गव्हाणे,कैलास रहाणे, सरपंच विक्रम पाचोरे, उपसरंपच बाबासाहेब गोर्डे, निवृत्ती गोर्डे, विलास डांगे, सुखदेव खालकर, गजानन मते, ज्ञानदेव चव्हाणअभियंता उत्तम पवारभारत वर्पेशहाजी वर्पेकैलास गोर्डे रामनाथ सहाणेतुकाराम गव्हाणेविलास वामनसुरेश देशमुखबाळासाहेब काकडे आदि उपस्थित होते.
................................................................................................
बैठकितुनच आ.कोल्हे यांचा मंत्री जयकुमार रावल यांना फोन

महाराष्ट ग्रामिण रोजगार हमी योजनेचे शेतक-यांनी विहीरींचे प्रकरणे जास्त केली मात्र सरकारने उदिष्टे कमी दिल्याने ते उदिष्टे वाढवुन मिळावे म्हणजे जास्त शेतक-यांना याचा फायदा मिळेल अशी मागणी शेतक-यांनी टंचाई बैठकित आ केल्हे यांचेकडे केली असता त्यांनी बैठकीतुन मंत्री जयकुमार रावल यांचेशी भ्रमणध्वनीवरुन संपर्क करत उदिष्टे वाढवुन देण्याची विनंती केलीत्यांनी या आठवड्याच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत याबाबत यावर चर्चा करुन शेतकरी हीताचा निर्णय घेण्याची ग्वाही आ.स्नेहलता कोल्हे यांना दिली.

Tuesday 7 May 2019

रक्तदान करुन रांजणगावात आंबेडकर जयंती साजरी


शिर्डी लाईव्ह प्रतिनिधी) 
                                   कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथे डॅा बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधुन संयुक्त जयंती उत्सव समीतीच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
                                या रक्तदान शिबीरात ४० जणांनी रक्तदान केले. औरंगाबाद येथील अमृता ब्लड बॅंकेच्या सहकार्याने हे रक्तदान शिबीर राबविण्यात आले. ब्लड बॅंकेचे  रोशन सोनवणे, सचिन वर्पे,रविंद्र देशमाने, निलेश हिवाळे, गौतम एडके यांनी रक्तदान करुन घेतले.यावेळी गायत्री बढे हीने आंबेडकरांच्या जिवनावर प्रबोधन केले.रमाई महीला मंडळाच्या वतीने यावेळी खिरीचे वाटप करण्यात आले. यावेळी डॅा आंबेडकरांच्या पुतळ्यास आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. गावातुन ढोल ताशाच्या निनादात आंबेडकरांच्या प्रतिमेची मिरवणुक काढण्यात आली होती.
                              यावेळी सरपंच संदिप रणधिर, सामाजिक कार्यकर्ते पराग खंडीझोड, अशोक रणधिर, तंटामुक्तीचे अध्यक्ष संतोष वर्पे, माजी पोलीस पाटील निवृत्ती गोर्डे, पोलीस पाटील राजेंद्र शेटे, सुनिल खालकर, बालम रणधिर, बाबासाहेब रणधिर, अरुण ठोंबरे, धोंडीबा रणधिर, रविंद्र खालकर, किरण ठोंबरे, हनुमंता रणधिर, अमोल ठोंबरे, संदिप ठोंबरे, वैभव रणधिर, अनंत ठोंबरे, कविता रणधिर, सागर खालकर, राहुल ठोंबरे, माया ठोंबरे आदिसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटोओळी-रांजणगाव देशमुख ता कोपरगाव येथे डॅा बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधुन संयुक्त जयंती उत्सव समीतीच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले.

नगर जिल्ह्यात प्राथमिक शाळांची पटसंख्या वाढत आहे- राजेश परजणे

 बहादराबाद येथे डिजीटल क्लासरुम चे उदघाटन व वार्षिक स्नेहसंमेलन


शिर्डी लाईव्ह (प्रतिनिधी)
                                        जिल्हा परिषद शाळेत सर्वसामान्यांची मुले शिकत आहे. नगर जिल्ह्यात दोन वर्षात जिल्हा परिषद शाळामध्ये मोठा बदल झाला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांकडे बघण्याचा दृष्टाकोण बदलविणे गरजेचे आहे. इंग्रजी माध्यामापेक्षा मराठी माध्यमाच्या शाळा सरस आहेत. जिल्ह्यात कोपरगाव व जामखेड तालुक्यात मोठा बदल झाला आसुन हे तालुके सर्वात पुढे आहेत. पटसंख्या फक्त टिकुनच न रहाता वाढ होत आहे ही बाब नगर जिल्ह्यला नक्कीच भुषणावह आहे. शिक्षकांनी मनाची खुणगाठ बांधली आहे. कोपरगावचे प्राथमिक शिक्षण विभागाचे काम राज्याला पथदर्शी आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांनी केले.

ते कोपरगाव तालुक्यातील बहादराबाद येथे जिल्हा परिषद शाळेच्या डिजीटल क्लासरुम चे उदघाटन व वार्षिक स्नेहसंमेलनानिमीत्त आयोजीत सांज चिमण पाखरांच्या या कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी पंचायत समीती सभापती अनुसया होन, माजी सभापती सुनिल देवकर, साई संस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे, गटशिक्षणाधिकारी शबाना शेख, केंद्रप्रमुख आर .के.ढेपले, सरपंच विक्रम पाचोरे,डॅा अरुण गव्हाणे, जवळकेचे सरपंच बाबुराव थोरात, रोहीदास होन, अजित पाचोरे आदि प्रमुख उपस्थित होते.

यावेळी बोलतांना सचिन तांबे म्हणाले कि, शिक्षणाबरोबर संस्कार झाले पाहीजे ते काम बहादराबादच्या शाळेत सुरु आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेऊन अनेक जण मोठ्या पदावर काम करत आहेत.

सुनिल देवकर म्हणाले कि, जिल्हा परिषदेच्या शाळा इंग्रजी माध्यमांच्या पुढे आहेत. जिल्ह्यात आजपर्यतं जे जे मोठे लोक होउन गेले त्या सर्वांचे शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेतच झालेले आहेत.

प्रास्ताविकात बोलतांना मुख्याध्यापिका स्वाती गुळवे म्हणाल्या कि, आम्ही ग्रामस्थ व पालकांच्या मदतीने शाळा सुंदर बनविली आहे. येथे विद्यार्थ्यांना सर्वागिण शिक्षण देण्यावर आमचा भर आसतो. शाळेच्या पटवाढीवर आम्ही भर दिला २२ वरुऩ आता ४२  पट केला. शाळेच्या विकासासाठी लोकसहभागाचे अहवान करताच पालकांनी मदत केली.दिड लाख रुपये लोक सहभाग मिळवुन शाळा डीजीटल केली. डीजीटल क्लासरुम उभी राहीली. सर्व मुलांचे वाढदिवस आम्ही शाळेत साजरे करतो. पालक वाढदिवसाला इतर खर्च करण्याएवजी शाळेला मदत करतात.

शाळेला आजपर्यंत सरपंच विक्रम पाचोरे व ग्रामसेवक अहमद शेख यांनी एक- एक टीव्ही संच, लोणी येथील डॅा गुळवे यांनी डिजीटल साऊंड सिस्टीमं, बाळासाहेब पाचोरे व अजित पाचोरे यांनी प्रिंटर तर जिओ कंपनीने शाळेला प्रोजक्टर दिले. सचिन तांबे यांनी संगणक संच दिला आहे.
                                       यावेळी चार वर्षात शाळेचा सर्वांगीण विकास केल्यामुळे मुख्याध्यापिका  स्वाती गुळवे यांना ग्रामस्थानी आदर्श शिक्षका म्हणून गौरविले

                                          यावेळी सांज चिमण पाखरांची या कार्यक्रमाअंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध कलागुण सादर केले. यात नाटीका, देशभक्तीपर गिते, चित्रपट गिते, धार्मिक गिते, मराठमोळी लावणी, वात्रटीका आदि बहारदार कार्यक्रम सादर करुन प्रेक्षकांना खिळवुन ठेवले होते. यात अनेकांनी बक्षीसे देऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना दाद दिली.

प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती गुळवे यांनी केले तर आभार सरपंच विक्रम पाचोरे यांनी मानले. यावेळी सुत्रसंचालन संतोष रहाटळ व श्रीकांत रहाणे यांनी केले.

यावेळी शिक्षीका मंगला गोपाळे सचिन आढागंळे, अभिजीत आगलावे, विलास गवळी, रामदास गव्हाणे, निवृत्ती बढे, गणेश पाचोरे, सातपुते, नंदु दिघे, सुभाष पाचोरे, कल्पना पाचारणे, बाळासाहेब गुंजाळ, अनिता नेहे आदिसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.





फोटोओळी-बहादराबाद ता कोपरगाव येथे स्नेहसंमेलनानिमीत्त आयोजीत सांज चिमण पाखरांच्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

Saturday 4 May 2019

मृत्युंजय सामाजिक संस्थेतर्फे मनेगाव शाळेला साऊंड सिस्टीम



रांजणगाव देशमुख (वार्ताहर):-
                                          कोपरगाव तालुक्यातील मनेगाव प्राथमिक शाळेला तालुक्यातील मृत्युंजय सामाजिक संस्थेने साऊंड सिस्टीम संच शाळेच्या स्नेहसमेलनाचे औचित्य साधुन भेट देण्यात आला आहे.
यावेळी मृत्युंजय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अजय महाले,युवराज गांगवे,वैभव देशमुख,अमोल गुडघे,साळवे आदि उपस्थित होते.यावेळी बोलतांना अजय महाले म्हणाले कि,आम्ही दर महीन्याला एका शाळेत जाऊन मदत करत आसतो.यासाठी दरमहीन्याला वर्गणी गोळा करतात यातुन हे सामाजिक काम सुरु आहे.शाळेला गरज असलेली वस्तु आम्ही देत असतो. 
                                           स्नेहसमेलनानिमीत्त आकर्षक वेशभुषा ,सुमधुर संगिताच्या तालावर बालचमुने ठेका धरला होता. या कार्यक्रमासाठी पालकवर्गाने उपस्थिती लावुन मुलांना प्रत्येक गीतावर बक्षीसे देऊन दाद दिली.देशभक्तीपर गिते,लावणी,नाटीका,सवांद यासारख्या विविध गोष्टींचा समावेश करुन वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले.
                                        यावेळी एच.डी.एफ.सी बॅंकेच्या कृषी विकास संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना जेवणाचा डबा व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका दिलीप गडाख यांनी केले.
यावेळी शिक्षक  उत्तम पवार , मंगल साबळे ,प्रविण कदम ,सांगिता लांडगे, विमल राजगिरे, आश्विनी  काशिद, रेखा चिकणे, काशिनाथ आढाव, भिका झिंजुर्डे आदींसह पालक- विद्यार्थी उपस्थित होते. 

Friday 3 May 2019

रुख्मिणीबाई खालकर यांचे निधन


शिर्डी लाईव्ह(प्रतिनिधी):-
                                 कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथील रुख्मिणीबाई विठ्ठल खालकर वय ९० वर्षे यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात सहा मुले एक मुलगी सुना नातवंडे पतवंडे असा मोठा परिवार आहे. त्या कोपरगावचे जेष्ठ वकील साहेबराव खालकर, सामाजिक कार्यकर्ते रामनाथ खालकर, माजी सरपंच दशरथ खालकर यांच्या मातोश्री तर वकील योगेश खालकर व उद्योजक अरुण खालकर यांच्या त्या आजी होत. 

Wednesday 1 May 2019

शिर्डी लोकसभा मतदार संघात 64.54 टक्के मतदान

शिर्डी लोकसभा मतदार संघातील अकोले, संगमनेर, शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपुर, नेवासा या तालुक्यात झालेल्या मतदानाची आकड़ेवारी :-