Thursday 31 January 2019

झगडे फाटा ते रांजणगाव देशमुख रस्त्यावरील खड्डे न बुजवल्यास तीव्र आंदोलन छेडणार- अँड योगेश खालकर



रांजणगाव देशमुख (प्रतिनिधी):-
 
                                            झगडे फाटा ते रांजणगाव देशमुख या रस्त्यावर अंजनापूर, जवळके, बहादराबाद, शहापूर, वेस , सोयेगाव, धोंडेवाडी ही गावे असून जवळके चौफुली, रांजणगाव देशमुख चौफुली व बहादरपूर रस्त्यावर मोठं-मोठे खड्डे पडलेले असून ते आठ दिवसाच्या आत न बुजवल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा अँड योगेश खालकर यांच्यासह पूर्व भागातील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

                                            यावेळी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, झगडे फाटा ते रांजणगाव देशमुख येथील रस्त्यावर पडलेल्या खड्यामुळे दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढले असून या अपघातामुळे अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. तर काहींना कायमचे अपंगत्व ही आले आहे. अनेक ठिकाणी रस्ता मध्यभागी तर कडेला खचला आहे तसेच शिर्डी सारखे आंतरराष्ट्रीय दर्जाचे देवस्थान असल्यामुळे या रस्त्यावर अहोरात्र वाहतूक तसेच पायी येणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी असते मात्र खराब रस्त्यांमुळे पायी चालणे व गाडी चालवणे मोठे जिकरीचे होऊन बसले आहे. याबाबत वेळोवेळी लेखी-तोंडी सूचना देऊनही सार्वजनिक बांधकाम विभाग या कडे लक्ष देत नाही. त्यामुळे येत्या आठ दिवसात सार्वजनिक बांधकाम विभागाने जर हा प्रश्न मार्गी लावला नाही तर तीव्र आंदोलन उभारू असा इशारा अँड योगेश साहेबराव खालकर यांच्यासह पूर्व भागातील नागरिकांनी म्हटले आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनावर अमोल पाडेकर, पंकज जोंधळे, प्रसाद औताडे,  माजी सरपंच ज्ञानदेव गव्हाणे, प्रविण घारे, रामभाऊ थोरात, प्रदीप गव्हाणे, कैलास गव्हाणे, आदींच्या सह्या आहेत. 


जय हनुमान विद्यालयाचा चित्रकला परीक्षेत १०० टक्के निकाल


रांजणगाव देशमुख(प्रतिनिधी):-
                                           कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथील गणेश विद्या प्रसारक मंडळाच्या जय हनुमान विद्यालयातील चालू शैक्षणिक वर्षाचा इलेमेंटरी व इंटरमिजीएट परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला आहे. 
                                           या शैक्षणिक वर्षात आठवी इयत्तेतील एकूण ४५  विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. त्यामधील ३ विद्यार्थी बी ग्रेड व ४२ विद्यार्थी सी ग्रेड मधून उत्तीर्ण झाले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेचे प्राचार्य ए डी दिघे सर व कला शिक्षक वर्पे सर व विद्यालयातील इतर शिक्षक व शिक्षिका यांचे मार्गदर्शन लाभले. 

Sunday 13 January 2019

धोंडेवाडी येथे पशु पक्षी प्रदर्शन; ३०० जनावरांचा सहभाग; पशुपालकांना रोख बक्षिसे

शेतकऱ्यांची जाण असलेले सरकार सत्तेवर यावे- ना. शालिनी विखे


शिर्डी लाइव्ह (प्रतिनिधी):-
                                     दुष्काळी परीस्थीतिने शेतकरी बेजार झालेला आहे. अशा परिस्थितीतही शेतकरी पशुधन जगविण्यासाठी धडपडत आहे. शेतकऱ्यांना आपल्या शेती उत्पादनाला भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची जाण असलेले सरकार सत्तेवर यावे असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शालिनी विखे पाटील यांनी केले.
                                    त्या कोपरगाव तालुक्यातील धोंडेवाडी येथे आयोजित चांदेकसारे जिल्हा परिषद गटाचे भव्य पशु पक्षी प्रदर्शनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. जिल्हा परिषद अहमदनगर व पशुसंवर्धन विभाग पंचायत  समिती कोपरगाव यांच्या वतीने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्षा सौ. राजश्री घुले, काळे कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे, जिल्हा परिषद सदस्या सौ. सोनाली रोहमारे, अजय फटांगरे, दंडवते, सोनाली साबळे, पंचायत समिती सभापती अनुसया होन, अर्जुन काळे, पौर्णिमा जगधने, योगिता पवार, सुनील शिंदे, अनिल कदम, अशोक रोहमारे, राहुल रोहमारे, वैशाली आभाळे, बाबुराव थोरात, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुनील तुंबारे, सहाय्यक आयुक्त डॉ. अजयनाथ थोरे, पशुधन विस्तार अधिकारी डॉ. दिलीप दहे, डॉ. जामदार, गट विकास अधिकारी कपिल कलोडे, सहाय्यक गट विकास अधिकारी महेश वळवी, आदींसह मान्यवर उपस्थित होते.
                                  सौ. विखे पुढे म्हणाल्या की, जिल्हा परिषदेमध्ये पशुसंवर्धन खात्याला सोनाली रोहमारे यांच्यासारखे अभ्यासू व्यक्तिमत्व मिळाले असून त्यांच्या अत्यंत आग्रहामुळे हा कार्यक्रम आपण येथे घेत आहोत. दुधाच्या दरासंधार्भात मंत्री महादेव जाणकर यांच्याशी चर्चा झाली आहे. साईजोती स्वयंसहाय्यता बचत गटाचे प्रदर्शन नगर येथे सुरु असून आपल्या ग्रामीण भागातील महिलांना नवीन प्रेरणा घेण्यासाठी आपण तेथे पाठवले पाहिजे.
                                 या प्रदर्शनातील उत्कृष्ट पशुधनासाठी कर्मवीर शंकरराव काळे साहेब यांच्या स्मरणार्थ विविध गटांसाठी ३५००० रुपयांचे बक्षीस देण्यात आले. तसेच प्रदर्शनात सहभागी पशुधनासाठी जिल्हा परिषदेच्या वारीने उत्तेजनार्थ रोख स्वरूपाचे बक्षिस देण्यात आले. यावेळी डॉ. तुंबारे, डॉ. वाकचौरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
                                 जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष राजश्री घुले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, पुण्यातील एक कंपनी आपल्या गीर गायींचे दूध मुंबई मध्ये ३०० रुपये प्रतिलिटर प्रमाणे विकते त्याचप्रमाणे आपणही गीर गायी जोपासाव्या. शेती करत असताना दुधाचा जोडधंदा असायला हवा.
                                काळे कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दुष्काळ पडलेला असून शेती उत्पादनाला भाव नाही. पशु किंवा पक्षी पालन करताना आपला खर्च कमीत- कमी कसा होईल याकडे आपण लक्ष द्यायला हवे.
                                 सादर प्रसंगी पशुधन विकास अधिकारी डॉ. संतोष वाकचौरे, डॉ. साखरे, डॉ. खर्डे, डॉ. पावसे, डॉ. भोरे, डॉ. पुंड, डॉ. बन, डॉ. चत्तर,  डॉ. भोंडे, डॉ. कदम, डॉ दिघे, डॉ. घोरपडे, डॉ. बाचकार, डॉ. भांगरे, डॉ. सातपुते, सौ. डॉ. काटे, सौ. डॉ. मुळूक, डॉ. मिसाळ , डॉ. गायकवाड, डॉ. शिंदे, डॉ. धुमाळ, डॉ. घोरपडे, डॉ. बाचकर, डॉ. बारहाते, डॉ. शिंदे एस डी यांच्यासह धोंडेवाडी सह परिसरातील नागरिक व पशुपालक आपल्या पशूंसह मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ३०० पशु या प्रदर्शनामध्ये सहभागी झाले होते. यामध्ये संकरित गायी, कालवड, देशी गायी, बैल, घोडे, शेळ्या, गोऱ्हे आदी जनावरे होती. निवेदन बाळासाहेब चिमणराव राहणे यांनी, प्रास्ताविक सोनाली रोहमारे यांनी तर आभार अजय फटांगरे यांनी व्यक्त केले.


(फोटो ओळी- कोपरगाव तालुक्यातील धोंडेवाडी येथे पशु पक्षी प्रदर्शनाच्या वेळी पशूंची पाहणी करताना जिल्हा परिषद अध्यक्षा ना. सौ शालिनी विखे तसेच उपाध्यक्षा राजश्री घुले. छाया- गोरक्षनाथ वर्पे)




Friday 11 January 2019

निधन वार्ता - ताराबाई टेके

निधन वार्ता





ताराबाई टेके

कोपरगाव : तालुक्यातील वारी येथील अंगणवाडीच्या मदतनीस ताराबाई खंडू टेके वय ४५ यांचे निधन झाले. त्या १८ वर्षपासून अंगणवाडी मदतनीस म्हणून सेवेत होत्या.त्यांचा अत्यंत प्रेमळ व मायाळू स्वभावाच्या होता.त्यांच्या कामाची दखल घेत शासनाने चार वर्षापूर्वी त्यांना “आदर्श अंगणवाडी मदतनीस ” हा पुरस्कार प्रदान केला होता. त्यांच्या अचानक जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या मागे आई,दोन भाऊ, वहिन्या, भाचे असा परिवार आहे. येथील सीताराम टेके, शिवाजी टेके यांच्या त्या भगिनी होत.

Monday 7 January 2019

स्थानिक स्कुल कमिटीच्या उपाध्यक्ष पदी बाळासाहेब गोर्डे


शिर्डी लाईव्ह(प्रतिनिधी):-
                                     कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथील गणेश विद्या प्रसारक मंडळाच्या जय हनुमान विद्यालयाच्या स्थानिक स्कुल कमिटीच्या अध्यक्षपदी गोदावरी दूध संघाचे संचालक सुनील पुंज खालकर व उपाध्यक्ष पदी बाळासाहेब गंगाधर गोर्डे यांची निवड करण्यात आली आहे.
                                       रांजणगाव देशमुख येथे गणेश विद्या प्रसारक मंडळ गणेशनगर यांचे जय हनुमान विदयालय असून विद्यालयाच्या नवीन स्थानिक स्कुल कमिटीच्या निवडीबाबतचे पत्र नुकतेच विद्यालयास प्राप्त झाले आहे. निवड झालेल्या नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. निवड झालेल्या सदस्यांमध्ये प्रकाश गोर्डे, संपत खलकर, निलेश गुडघे, तुषार काथे, एड. योगेश खालकर, अरविंद वर्पे, गंगाधर खालकर, बाळासाहेब वामन, सोमनाथ ठोंबरे, प्रसाद खालकर, संदीप गोर्डे, भिकाजी झिंजुर्डे, ज्योती वर्पे यांचा समावेश आहे. 

शिक्षणाच्या बाबतीत कोपरगाव तालुका अग्रेसर- आशुतोष काळे




शिर्डी लाईव्ह(प्रतिनिधी):-
                   शिक्षणाच्या बाबतीत कोपरगाव तालुका जिल्ह्यात अग्रेसर असून शिक्षण हे पवित्र काम समजून पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद सदस्य हे कामाला लागले आहे शिक्षण क्षेत्रात मोठा बदल पाहायला मिळत आहे विद्यार्थी संख्या व गुणवत्ता वाढीवर येथील शिक्षकांचे सातत्याने लक्ष आहे. कोपरगाव पंचायत समितीमध्ये सत्तांतर होऊन काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची  सत्ता आल्यानंतर खऱ्या अर्थाने शिक्षण क्षेत्रात प्रगती झाली असल्याचे प्रतिपादन युवा नेते आशुतोष काळे यांनी केले.
                     ते कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे ग. र. औताडे पाटील विद्यालयात आयोजित शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर पंचायत समिती कोपरगाव अंतर्गत जिल्हा परिषद चांदेकसारे गटाच्या बाल आनंद मेळाव्या प्रसंगी बोलत होते.
                   यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे, सोनालीताई रोहमारे, सभापती अनुसयाताई होन,  गट विकास अधिकारी कपील कलोडे, गटशिक्षण अधिकारी शबाना शेख, उपसभापती अनिल कदम, काळे कारखान्याचे उपाध्यक्ष सुनील शिंदे, उत्तमराव औताडे, निवृत्ती शिंदे, पंचायत समिती सदस्य अर्जून काळे, एम.टी.रोहमारे, सचिन रोहमारे, सचिन मुजगुले, अँड राहुल रोहमारे,  रोहिदास होन,  उत्तम कुर्हाडे,  योगीराज देशमुख, नंदकिशोर औताडे, रोहिदास होन, भिकाजी होन,  वाल्मिक नवले, बाबुराव थोरात, बंडू थोरात,  सरपंच वैशाली आभाळे, विस्तार अधिकारी श्रीमती सोनवणे, केंद्र प्रमुख दिलिप ढेपले, राजेंद्र ढेपले अदिसह शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्तविक गट शिक्षणाधिकारी शबाना शेख यांनी केले. विद्याथ्यानी स्वागतगित, लेक वाचवा लेक शिकवा यावर नाटीका सादर करुन उपस्थितांची मने जिंकून घेतली. यावेळी गट विकास अधिकारी कपील कलोडे, सभापती अनुसया होन, सोनालीताई रोहमारे आदिनी आपले मनोगत व्यक्त केले.
               गटातील ४७ जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी भाजीपाला, हॉटेल्स, फळे अदि प्रकारचे स्टाँल लावले होते. आपल्याच पाल्यांकडून वस्तू खरेदी करण्याचा आनंद पालक घेत होते. सुत्रसंचालन व आभार चिमुकल्या विद्यार्थ्यांनी राधिका गडाख व मयुरी शेजवळ यांनी मानले.
     

(फोटो ओळी - कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे बाल आनंद मेळाव्या प्रसंगी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आशुतोष काळे व मान्यवर. छाया- गोरक्षनाथ वर्पे)

स्थानिक स्कुल कमिटीच्या अध्यक्षपदी सुनील खालकर


उपाध्यक्ष पदी बाळासाहेब गोर्डे यांची वर्णी
शिर्डी लाईव्ह (प्रतिनिधी):-
                                     कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथील गणेश विद्या प्रसारक मंडळाच्या जय हनुमान विद्यालयाच्या स्थानिक स्कुल कमिटीच्या अध्यक्षपदी गोदावरी दूध संघाचे संचालक सुनील पुंज खालकर व उपाध्यक्ष पदी बाळासाहेब गंगाधर गोर्डे यांची निवड करण्यात आली आहे.
                                       रांजणगाव देशमुख येथे गणेश विद्या प्रसारक मंडळ गणेशनगर यांचे जय हनुमान विदयालय असून विद्यालयाच्या नवीन स्थानिक स्कुल कमिटीच्या निवडीबाबतचे पत्र नुकतेच विद्यालयास प्राप्त झाले आहे. निवड झालेल्या नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. निवड झालेल्या सदस्यांमध्ये प्रकाश गोर्डे, संपत खलकर, निलेश गुडघे, तुषार काथे, एड. योगेश खालकर, अरविंद वर्पे, गंगाधर खालकर, बाळासाहेब वामन, सोमनाथ ठोंबरे, प्रसाद खालकर, संदीप गोर्डे, भिकाजी झिंजुर्डे, ज्योती वर्पे यांचा समावेश आहे.

मल्हारवाडी येथे प्रहार चा अपंग क्रांती मेळावा


रांजणगाव देशमुख(वार्ताहर):-
                       कोपरगाव तालुक्यातील मल्हारवाडी येथे आ. बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली समजतील गरीब, अपंग, विधवा, परीतक्ता, जेष्ठ नागरिक यांच्या विकासासाठी चालविण्यात येणाऱ्या प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या वतीने मेळावा घेण्यात आला.
                      या मेळाव्यासाठी प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या राज्य समन्वयक संध्याताई जाधव, संघटनेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष, मुक्तार शेख, नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र आहेर, गट प्रमुख मुरलीधर बागुल, सीताराम मुळे, महिला अध्यक्ष शकुंतला पवार, कार्याध्यक्ष बाबासाहेब रोडे, भाऊपाटील बिबे, बाबासाहेब गुंजाळ, पोलीस पाटील शिवराम गुंजाळ, उत्तम रानवडे, आण्णा रानवडे, अर्जुन वेताळ, मच्छिंद्र शिंदे, नंदू येलमामे, भाऊसाहेब डांगे, विलास डांगे, जगन्नाथ डांगे, नानासाहेब बिबे, आदींसह मान्यवर उपस्थित होते.
                      यावेळी संध्या जाधव यांनी शासनाकडून समाजातील अपंग, विधवा, जेष्ठ नागरिक यांच्यासाठी संजय गांधी श्रावण बाळ निराधार योजनेचा लाभ घेण्याविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच उपस्थितांना विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. अपंगांसाठीच्या पाच टक्के निधी राखीव असतो याची माहिती देण्यात आली. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते. उपस्थितांचे आभार सीताराम मुळे यांनी मानले.


(फोटो ओळी- कोपरगाव तालुक्यातील मल्हारवाडी येथे प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या वतीने मेळावा घेण्यात आला.)