Monday 26 August 2019

पत्रकार विनोद जवरे यांना युवा आयडॉल पुरस्कार प्रदान




शिर्डी लाईव्ह (प्रतिनिधी):- 


                                      कोपरगांव तालुक्यातील जवळके येथील युवा पत्रकार विनोद जवरे यांना युवा ध्येय परिवाराच्यावतीने दिला जाणारा युवा आयडॉल हा राज्यस्तरीय पुरस्कार नुकताच विश्व विद्यापीठाचे माजी कुलगुरू सर्जेराव निमसे व संपादक लहानु सदगीर यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यांत आला. 
                                    पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल हा पुरस्कार जवरे यांना  देण्यात आला. सदर कार्यक्रम हा अहमदनगर येथील माउली सभागृह येथे पार पडला याप्रसंगी मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमुर्ती बी जी कोळसे पाटील  उपस्थित होते.  तसेच पुरस्काराबददल आ. स्नेहलता कोल्हे, आ. राजाभाऊ  वाजे, मा.खासदार. बबन नाना घोलप  आदींनी  विनोद चे  अभिनंदन केले आहे.


Wednesday 21 August 2019

कारवाडी- वडाची वाडी येथे भागवत सप्ताहाचे आयोजन


शिर्डी लाईव्ह (प्रतिनिधी):-
                   कोपरगाव तालुक्यातील कारवाडी- वडाची वाडी येथे बुधवार दिनांक २१ ऑगस्ट ते बुधवार दिनांक २८ ऑगस्ट या कालावधीमध्ये भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तने व प्रवचने होणार आहेत.
                  दिनांक २१ ऑगस्ट रोजी रामायणाचार्य सुखदेव महाराज चव्हाण, दिनांक २२ रोजी प्रसन्नकुमार महाराज धामने, दिनांक २३ रोजी अनिल महाराज जमधडे, दिनांक २४ रोजी भागवताचार्य अनिल महाराज तुपे, दिनांक २५ रोजी शिवचरित्रकार प्रवीण महाराज दुशिंग, दिनांक २६ रोजी संजीवनीताई गडाख, दिनांक २७ रोजी स्वरगंधर्व बाळासाहेब महाराज रंजाळे, यांची कीर्तने होणार आहेत. तर दिनांक २८ ऑगस्ट रोजी संगीत भागवताचार्य नामदेव महाराज शाश्री यांचे काल्याचे कीर्तन होणार असून त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे.

                   सप्ताह काळात सकाळी ४ ते ६ काकडा, ६ ते ११ ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी ३ ते ४ भजन, सायंकाळी ५ ते ६ ज्ञानेश्वर प्रवचन, सायंकाळी ६ ते ७ हरीपाठ, रात्री ९ ते ११ कीर्तन व नंतर हरिजागर असे कार्यक्रम असणार आहेत. दि २८ ऑगस्ट रोजी सप्ताहाची सांगता होणार असून सकाळी कीर्तनानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. या सप्ताहात गावातील तसेच नोकरी व्यवसायानिमित्त बाहेर असलेले सर्वच ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात. या कार्यक्रमाचा परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा असे कारवाडी- वडाची वाडी ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात आले आहे. 

Sunday 18 August 2019

बहादरपूर येथे गोपाजी बाबांचा यात्रोत्सव


रांजणगाव देशमुख (वार्ताहर):-
                                      कोपरगाव तालुक्यातील श्री क्षेत्र  बहादरपूर येथे  दि. १८  व १९  ऑगस्ट या दोन दिवस गोपाजी बाबा यांचा यात्रोत्सव होणार असून मोठा वैचारिक वारसा लाभलेल्या बहादरपूर  यात्रेत तालुक्यातील तसेच नासिक व नगर जिल्ह्यातील हजारो भाविक हजेरी लावत असतात.
                                        गोपाजी बाबांनी सुमारे २२५ वर्षांपूर्वी  पश्चिम बंगाल येथून संजीवनी विद्येचा अभ्यास करून बहादरपूर व परिसरामध्ये मोठे काम करून बहादरपूर येथे समाधी घेतली.  तेव्हापासून दर श्रावण महिन्यात हि यात्रा  भरते या यात्रेमध्ये सकाळी गोपाजी बाबांची विधिवत पूजा होऊन  त्यानंतर पारंपारिक झांजपथक व वाद्यांच्या सहायाने कावडीची सवाद्य मिरवणूक होते दि. १८ रोजी सायंकाळी  रथाची  मिरवणूक होणार असून यामध्ये सर्वांची उत्सुकुता असलेली फटाक्यांची आतषबाजी होणार आहे. तर दि. १९ रोजी सकाळी ओंकारेश्वर येथून आणलेल्या गंगाजलाची कावडी व मशाल मिरवणूक होणार असून  दुपारी कुस्त्यांचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये जिल्ह्यातील नामंवंत कुस्तीपटू हजेरी लावत असतात.
                               या वर्षीचे यात्रेचे नियोजन खकाळे  वाड्याकडे असून गावामध्ये व मंदिराला भव्य दिव्य अशी विद्युत रोषणाई करण्यात  आलेली आहे . सुमारे ७० लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेले  श्री गोपाजी बाबा यांच्या  मंदिराचे बांधकाम पूर्णत्वाकडे जात आहे.  या यात्रेमध्ये बहादरपूर व परिसरातील सर्व स्तरातील  लोक सहभागी होत असतात. तर  जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात भाविक हजेरी लावत असतात.

शिष्यवृत्ती परीक्षेत शहापूर च्या विद्यार्थ्यांचे यश ; शिक्षक सैंदाणे यांचा सत्कार


शिर्डी लाईव्ह (प्रतिनिधी):-
                                कोपरगाव तालुक्यातील शहापूर जिल्हा परिषद शाळेच्या श्री सैदाणे यांचा नाशिक चे विभागीय आयुक्त श्री. राजाराम माने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शिष्यवृत्ती परीक्षेत  शहापूर शाळेतून विद्यार्थ्यांची निवड झाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला.

                                 तालुक्यातील शहापूर शाळेचे तंत्र स्नेही मुख्याध्यापक श्री सैंदाने सर यांचा  शिष्यवृत्ती परीक्षेत  शहापूर शाळेतून विद्यार्थ्यांची निवड झाल्याने सत्कार करण्यात आला. तालुका स्तरीय १ ली व २ री च्या विद्यार्थ्यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती सदर प्रसंगी तालुक्यात शिष्यवृत्ती परीक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या वर्गशिक्षकांचा सत्कार करण्यात आला.सर्व शाळा नी कोपरगावाचा आदर्श घ्यावा  असे मत यावेळी माने यांनी व्यक्त केले. या प्रसंगी अहमदनगर जिल्हा परिषदेचे शिक्षण समिती सदस्य श्री राजेश आबा परजने उपस्थित होते. तालुका गटशिक्षणाधिकारी श्रीमती शबाना शेख मॅडम यांनी प्रास्तविक सादर केले .आभार श्री आर के ढेपले यांनी मानले.

श्री सैंदाने यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी माने यांच्या हस्ते सत्कार

सैंदाने यांचा शाळांच्या विविध उपक्रमांमध्ये नेहमीच पुढाकार

शिर्डी लाईव्ह (प्रतिनिधी):-
                                    कोपरगाव तालुक्यातील शहापूर शाळेचे तंत्र स्नेही मुख्याध्यापक श्री. सैंदाने सर यांचा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांच्या विविध उपक्रमांमध्ये नेहमीच पुढाकार असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

                                    त्यांनी तालुक्याच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने यांना कोपरगाव तालुक्याची एक दिशा दर्शक वाटचाल नावाचे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन सादर केले. यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला.

                                   संवत्सर येथे तालुका स्तरीय कार्यशाळेस माने यांनी भेट दिली. सदर प्रसंगी  त्यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. प्रत्येक शिक्षकाने तंत्र स्नेही व्हायला हवे असे मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले. यावेळी तालुका गटशिक्षणाधिकारी श्रीमती शबाना शेख यांनी प्रास्तविक सादर केले. आभार श्री आर के ढेपले  यांनी मानले.

Thursday 15 August 2019

शहापूर शाळेस लोक सहभागातून अनेक कामे

पालकांचे भरीव योगदान 

शिर्डी लाईव्ह(प्रतिनिधी):-
              
                      कोपरगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शहापूर शाळेत लोकसहभागातून अनेक कामे करण्यात आली असून यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना अनेक सोयी उपलभ झाल्या आहेत.
                                  शाळा व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्यांनी मिळून शाळेतील पिण्याच्या टाकीसाठी शाळेस योगदान दिले आहे. तसेच गावातील साई संकल्प ग्रुप यांच्याकडून शाळेस २० लेझीम व राष्ट्रीय महापुरुषांचे फोटो मिळाले आहेत. शाळा व्यवस्थापन समिती व मुख्याध्यापक श्री सैंदाने सर यांच्या वतिने त्यांचा २६ जाने २०१९ च्या कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात आला. गावातील सरपंच ग्रामसेवक यांनी शाळेसाठी योगदान देणारांचे आभार मानले. तसेच केंद्र प्रमुख श्री. ढेपले साहेब व गटशिक्षणाधिकारी शबाना शेख यांनी लोकसहभागाबद्दल शाळेचे व पालकांचे अभिनंदन केले.

लोकसहभागातून शहापूर शाळा डिजिटल

शिक्षकांच्या परिश्रमांना यश 
शिर्डी लाईव्ह(प्रतिनिधी):-        
                                कोपरगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शहापूर शाळेने लोकसहभागातून शाळेतील सर्व वर्ग डिजिटल केले आहेत. गावातील पालकांच्या सहकार्याने ५४ हजार एवढी लोकवर्गणी जमा करून त्यातून शाळेस प्रोजेक्टर, एल इ डी घेतला. लोकसहभागासाठी शाळेतील मुख्याध्यापक श्री सैंदाने सर व सोनवणे मॅडम यांनी अथक परिश्रम घेतले. तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. राहुल घारे यांनीही सहकार्य केले.
                                वर्ग डिजिटल केल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थीही इंग्रजी माध्यमाच्या शाळांतील विद्यार्थ्यांसारखे शिक्षण घेऊ शकतात. व विद्यार्थ्यांना दृक श्राव्य शिक्षण दिल्याने त्यांच्या आंतरिक कलागुणांना मोठी चालना मिळणार आहे.
                                 सरपंच श्री दिपक खंडीझोड यांनी शिक्षकांचे खूप खूप आभार मानले. शाळा डिजिटल केल्याने केंद्र प्रमुख श्री ढेपले साहेब यांनी शाळेच्या शिक्षकांचे कौतुक केले. सदर कार्यक्रमासाठी गटशिक्षणाधिकारी श्रीमती शबाना शेख मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.

शिष्यवृत्ती परीक्षेत शहापूर शाळेचे भरघोस यश ; सहा विद्यार्थी गुणवत्ता यादीत


शिर्डी लाईव्ह(प्रतिनिधी):- 
                              सन २०१७ - २०१८ मध्ये झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांनी भरघोस यश मिळवले असून कोपरगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शहापूर या शाळेतील इयत्ता पाचवी चे सहा विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत. सन २०१७ - २०१८ मध्ये झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांनी भरघोस यश मिळवत शाळेचे नावही मोठे केले आहे.
                               शहापुर शाळेचा निकाल १०० % लागला असून. ह्या शाळेतील शिक्षक श्री. सैंदाने ज्ञानेश्वर पांडुरंग यांनी वर्षभर तासिकांचे नियोजन करून विद्यार्थ्यांचा सराव करून घेतला. तसेच परीक्षा घेऊनही प्रयत्न केले. सादर प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.नितीन पाचोरे यांनी शाळेचे मुख्याध्यापक श्री. सैंदाने सर यांचे कौतुक केले. तसेच सदर परीक्षेस केंद्रप्रमुख श्री ढेपले सर यांचे मार्गदर्शन लाभले. गटशिक्षणाधिकारी श्रीमती शबाना शेख मॅडम यांनी शाळेचे कौतुक करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

Saturday 10 August 2019

सप्ताहाचे अखेरचे दोन दिवस ; महत्वाच्या बाबी



            आज दिनांक ११ ऑगस्ट रोजी सप्ताहाचा ७ व दिवस असून संध्याकाळी ९ ते ११ रामायानाचार्य ह भ प रामाराव महाराज ढोक यांचे कीर्तन होणार आहे. आजच्या दिवशी नोकरी व्यवसायानिमित्त बाहेरगावी असलेले सर्वच ग्रामस्थ, पाहुणे गावात येत असतात. यावेळी संध्याकाळच्या कीर्तनाला खूप मोठी गर्दी होते.

            या गर्दीमध्येही सर्वांना कीर्तनाचा व उत्सवाचा आनंद मिळावा यासाठी सर्वांनी थोडीशी काळजी घेणे आवश्यक आहे. रात्री कीर्तनाला आल्यानंतर आपली वाहने बाजारातळ, महादेव मंदिर प्रांगण, बस स्थानक परिसर, ग्रामपंचायत चौक अशा ठिकाणी पार्किंग केली तर सर्वांनाच बसायला जागा मिळेल आणि कीर्तन संपल्यानंतर सर्वजन घरीही वेळेवर पोहोचू शकतील. 

            तसेच काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी सकाळी ९ ते ११ ह भ प रामाराव महाराज ढोक यांचे कीर्तन होणार आहे यावेळी आपली वाहने मंदिर परिसरात व बस स्थानक परीसरात पार्किंग न करता इतरत्र पार्किंग करावी असे केल्याने मंदिर परीसरात गर्दी होणार नाही आणि कीर्तनाला व महाप्रसाद घेण्यासाठी पुरेशी जागा शिल्लक राहील. कोणी संशयित व्यक्ती दिसल्यास त्यासंधार्भात ग्रामस्तांना कळवायचे आहेत.

            दुकानदार बांधवांणी आपली दुकाने मंदिर परिसरात न लावता वेशीच्या आत लावावी. कीर्तनासाठी जागा कमी पडत असल्याने येथे दुकाने लावल्यानंतर भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागतो.

सर्वजन या उत्सवाचा आनद घेऊ. 

Friday 2 August 2019

पंचमीपासून रांजणगाव देशमुख येथे भागवत सप्ताहाचे आयोजन


रांजणगाव देशमुख(वार्ताहर):-
                                    कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथे रामायणाचार्य ह भ प रामराव महाराज ढोक नागपूर यांच्या प्रेरणेने तसेच ह भ प बबन महाराज गव्हाणे व ह भ प अशोक महाराज क्षीरसागर अमरावती, बबन महाराज गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली दि ५ ऑगस्ट ते  १२ ऑगस्ट या दरम्यान अखंड हरिनाम भागवत सप्ताहाचे आयोजन कारण्यात आले आहे.
                                     या सप्ताहात दि.५ रोजी हभप बाळासाहेब महाराज रंजाळे खैरी निमगाव, दि. ६ हभप पांडुरंग महाराज गिरी दि. ७  हभप माधव महाराज रसाळ इंदापूर दि. ८  हभप संजय महाराज धोंगडे त्र्यंबकेश्वर, दि. ९ हभप विशाल महाराज खोले मुक्ताईनगर, दि. १० हभप शिवाजी महाराज देशमुख नेवासा, दि. ११  हभप रामराव महाराज ढोक व दि. १२ रोजी  ह भ प रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांचे काल्याचे कीर्तन होणार आहेत. सप्ताह काळात सकाळी ४ ते ६ काकडा, ६ ते ११ ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी ३ ते ४ भजन, सायंकाळी ५ ते ६ ज्ञानेश्वर प्रवचन, सायंकाळी ६ ते ७ हरीपाठ, रात्री ९ ते ११ कीर्तन व नंतर हरिजागर असे कार्यक्रम असणार आहेत. दि १२ ऑगस्ट रोजी सप्ताहाची सांगता होणार असून सकाळी कीर्तनानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. या सप्ताहात गावातील तसेच नोकरी व्यवसायानिमित्त बाहेर असलेले सर्वच ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात. समारोपाच्या दिवशी काकडा पेटवण्यासाठी भद्रा मारोती खुलताबाद येथून दरवर्षी मशाल आणली जाते या मशालीचे हे १४ वे वर्ष आहे. या कार्यक्रमाचा परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा असे रांजणगाव देशमुख ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात आले आहे.


फोटो- श्री. क्षेत्र हनुमान देवस्थान रांजणगाव देशमुख  

रांजणगाव देशमुख येथे युवकाची आत्महत्या



रांजणगाव देशमुख(वार्ताहर):-
                               कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथील सचिन जगन रणधीर वय ३० वर्षे यांनी राहत्या घरात छताला दोरीच्या साहाय्याने फाशी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
                              ही घटना दिनांक १ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान घडली. यावेळी सचिन यांचा भाऊ किरण यांनी सचिनला पहिले असता आरडा ओरडा केला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील राजेंद्र शेटे यांनी घटनास्थळी जाऊन सादर घटनेची माहिती शिर्डी पोलीस स्टेशनला दिली.
                           माहिती मिळताच शिर्डी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेंडगे, पोलीस उपनिरीक्षक दाणे व पोलीस कॉन्स्टेबल अभंग, पोलीस कॉन्स्टेबल राठोड यांनी घटनास्थळी भेट देऊन  घटनास्थळाचा पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी राहता येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. त्यानंतर अतिशय शोकाकुल वातावरणात रांजणगाव देशमुख येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही.