Friday 15 February 2019

शासनाने पत्रकारांच्या बाबतीत सकारात्मक भुमीका घ्यावी- एस.एम.देशमुख


कोपरगावात पत्रकारांची कार्यशाळा संपन्न

शिर्डी (प्रतिनिधी ):- 
                                            सरकारने कायदा पेन्शनचा विषय मुद्दाम प्रलंबित ठेवला तसेच सरकारी योजनाचा फायदा पत्रकारांना देताना मात्र लाभार्थीच्या व्याख्याही अस्पष्ट आहेत.अनेक जाचक अटी देखील आहेत.त्यामुळे हे नियम शिथल करण्याची परिषदेने सरकारकडे मागणी करत शासनाने पत्रकारांच्या बाबतीत सकारात्मक भुमीका घेतली पाहीजे असे प्रतिपादन मराठी पत्रकार परिषदेचे प्रमुख विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी केले। 
                                                कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघ कोपरगाव तालुका एजुकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विध्यमाने सोमैया महाविधालयातील साकरबेन सोमैया सभ्गृहात आयोजित पत्रकार कार्यशाळेत ते बोलत होतेयावेळी अध्यक्षस्थानी एजुकेशन सोसायटीचे सचिव आड.संजीव कुलकर्णी होते.
                                                  यावेळी श्रीकांत बेणीयशवंत पवारअनिल महाजनअशोक खांबेकरसुनील शिंदेसुधीर डागाशरद पाबळेडॉ.अरुण गव्हाणेडॉ.बी.एस.यादव यांच्यासह उत्तर नगर जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या संखेने उपस्थित होतेदेशमुख पुढे बोलताना म्हणाले कि, महाराष्ट्रात ३५४ तालुक्यात परिषदेचे काम संघटनेच्या वाढीसाठी विकेंद्रीकरणत्यासाठी उत्तर नगर जिल्हा पत्रकार संघऑनलाईन पध्दतीने निवडणुका पारदर्शक कारभारपत्रकारांची लवकरच नियमावली करण्यात येणार आहेपत्रकार समाजाचे प्रश्न सोडविण्याचे काम करतो मात्र स्वतःचे प्रश्न सोडविण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो हे दुर्दैव आहे.कार्यक्रमाच्या प्रास्तविकात अध्यक्ष डॉ.अरुण गव्हाणे यांनी पत्रकार संघाच्या कामकाजाचा आढावा घेतला.
                                                               अध्यक्षीय भाषणात अॅड.संजीव कुलकर्णी म्हणाले ' समाजाच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम पत्रकार धाडसीपणे करतात.त्यामुळे समाजात त्यांना योग्य सन्मान आहे.पत्रकारामध्ये बातमीसाठी शोधक नजर हवी तसेच ताज्या बातम्या देण्याचे आव्हान असतानाच विश्लेषणात्मक लिखाणाची जोड हवी.परिषदेच्या माध्यमातून पत्रकारांचे अनेक प्रश्न मार्गी लावले उत्तर नगर जिल्हा पत्रकार संघाचे संघटन करणार असल्याचे यशवंत पवार म्हणाले.
दरम्यान कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते शहरातील छायचित्रकार संतोष साळुंके यांना उपचारासाठी हजाराचा मदतरुपी धनादेश देण्यात आला.तसेच यावेळी अनिल महाजन,सुधीर डागा,सतीश वैजापुरकर,अशोक खांबेकर यांनी मनोगत व्यक्त केले.
                                         कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.साहेबराव दवंगेलक्ष्मण जावळे यांनी तर सिद्धार्थ मेहरखांब यांनी आभार मानलेयावेळी स.म कुलकर्णी, सुरेश रासकर, सी.डी.वाघ नानासाहेब शेळकेप्रशांत शर्मा, रोहित टेके, सतिष वैजापुरकर, दिलीप खरात शैलेश शिंदे, युसुफ रंगरेज, संतोष जाधव, सिद्धार्थ मेहेरखांब, सोमनाथ सोनपसारे,  लक्ष्मण वावरे,  प्रा. साहेबराव दवंगे, लक्ष्मण जावळे, गोरक्षनाथ वर्पे, विजय शेळके, जनार्दन जगताप, फकीरा टेके, शिवाजी जाधव, संतोष देशमुख, दिलीप दुशिंग, हाफिज शेख, संजय लाड, योगेश डोखे, निवृत्ती शिंदे, पुंडलिक नवघरे, काकासाहेब खर्डे, मोबीन खान, राजेंद्र गाडे, संजय भवर, हेमचंद्र भवर, दत्तात्रय गायकवाड, अक्षय काळे, किरण नाईक, श्रीकांत नरोडे आदिसह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्तीत होते.

फोटो-


कोपरगाव येथे पत्रकार कार्यशाळेतउदघाटन प्रसंग मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस.एम.देशमुख ,पवार, बेणी, पाबळ व इतर मान्यवर। 

Monday 11 February 2019

उद्या कोपरगावात पत्रकारांची कार्यशाळा


शिर्डी (प्रतिनिधी) : मराठी पत्रकार परिषद, मुंबई सलग्न कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघ व कोपरगाव तालुका एजुकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानाने उत्तर नगर जिल्ह्यातील पत्रकारांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यशाळा ही कोपरगाव शहरातील के .जे.सोमैया महाविद्यालयातील साकरबेन सभागृहात बुधवार दि.१३ रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष कोपरगाव तालुका एजुकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे असणार आहे. तर प्रमुख अतिथी नाशिक सार्वजनिक वाचनालयाचे सचिव श्रीकांत बेनी, मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस अनिल महाजन, नाशिक जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष यशवंत पवार, कोपरगाव तालुका एजुकेशन सोसायटीचे सचिव अँड.संजीव कुलकर्णी हे राहणार आहे. तसेच कोपरगाव, श्रीरामपूर, संगमनेर, राहाता, अकोले, नेवासा येथील पत्रकार उपस्थित राहणार आहे.

Thursday 7 February 2019

रांजणगावात अडीच तास रस्ता रोको अंदोलन ; मागण्या मान्य न झाल्यास चितेवर होणार आमरण उपोषण


रांजणगावात अडीच तास रस्ता रोको अंदोलन

लहान मुलींच्या  हस्ते दिले निवेदन
रांजणगाव देशमुख (प्रतिनिधी)- 
                                            रांजणगाव देशमुख व परिसरातील ११ गावात ५० पैसापेक्षा कमी आणेवारी असतानाही ही गावे दुष्काळात बसलेली नाहीत्याविरोधात रांजणगाव देशमुख येथे सर्वपक्षीय रास्तारोको आंदोलन करण्यात आलेहा प्रश्न मार्गी लागला नाही तर १४ व १५ फेब्रुवारीला धरणे आंदोलन करून १६ तारखेपासून चिता रचून आमरण उपोषण केले जाणार आहेत्याही पुढे जाऊन १९ पर्यंत मार्ग निघाला नाही तर चिता पेटवली जाणार असल्याचा निर्णय वेळी शेतकऱ्यांनी घेतलासकाळी नऊ वाजता सुरू झालेले आंदोलन तब्बल अडीच तास चाललेयावेळी रास्त्याच्या दोन्ही बाजूने दोन कि.मीपर्यंत रांगा लागल्या होत्यादरम्यान लहान मुलींचे हस्ते आंदोलनाचे निवदेन देत कोपरगावचे तहसिलदार किशोर कदम यांना देण्यात आले.

दुष्काळाच्या सर्व निकषात ही गावे बसतात परंतु पोहेगाव मंडळामुळे सरासरी कमी येत असल्याने शासनाच्या दुष्काळाच्या यादीतून ही गावे वगळण्यात आली आहेया सर्वाचा रोष यावेळी आंदोलनातून पाहायला मिळालासकाळी आंदोलन जेव्हा सुरू झाले तेव्हा आंदोलनाचे निवेदन घेण्यासाठी तहसिलदार हजर नसून त्यांचे प्रतिनिधी उपस्थित असल्याचे कळाल्यावर आंदोलक संतप्त झालेमंडलाधिकारी जेठगुले यांनी तहसिलदार हे दिल्लीला बैठकीसाठी गेले असल्याचे आंदोलकांना सांगितलेयावेळी जो पर्यंत सक्षम अधिकारी येत नाही तो पर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतलातहसिलदार नसेल तर प्रातांधिका-यांना बोलवा अशी भूमिका यावेळी घेतली. आंदोलन सक्षम आधिका-याशिवाय सुटणार नसल्याचे लक्षात येताच तहसिलदार स्वतः हजर झाले

यावेळी आंदोलक आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले कीअकरा गावात दुष्काळी परिस्थिती असतानाही दुष्काळ जाहीर झाला नाहीत्याला प्रशासन जबाबदार आहेप्रशासनाने या गावात पर्जण्यमापक न बसविता ते गोदावरी काठी बसविले आहेया गावांचा स्वतंत्र प्रस्ताव दाखल करुन तात्काळ दुष्काळ जाहीर करावातसेच प्रत्येक गावात टँकरचारा छावण्या व दुष्काळी निधीसाठी तरतुद करावी अशी मागणी यावेळी करण्यात आलीदरम्यान आंदोलनावेळी रूग्णवाहिका आल्यानंतर सर्व आंदोलकांनी तातडीने तिला जागा करून दिली.
यावेळी शिर्डीचे पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला. नायब तहसीलदार बी.जी गोसावी, मंडलाधिकारी बी.के.जेडगुले आदि उपस्थीत होते।
......................................................
आंदोलनाचे निवेदन देताना शेतकऱ्यांची तहसिलदार कदम यांना रास्ता रोकोचे निवेदन गावातील लहान मुलींच्या हस्ते देण्यात आले.
तहसिलदार जर दिल्लीला गेले होते तात्काळ ते कोणत्या विमानाने आले असा प्रश्न यावेळी आंदोलकांनी केलाम्हणजे प्रशासन चुकीची माहिती सांगून आंदोलन दडपून टाकण्याचा प्रयत्न होता की काय असा प्रश्न यावेळी आंदोलकांनी उपस्थितीत केला.
...................................................................
रांजणगावसह ११ गावात दुष्काळ जाहीर करावा यासाठी केलेल्या रास्ता रोकोचे निवेदन देताना तहसिलदार किशोर कदम यांना देताना लहान मुली.

रांजणगावसह ११ गावात दुष्काळ जाहीर करावा यासाठी केलेल्या रास्ता रोकोसाठी उपस्थितीत शेतकरी।




Tuesday 5 February 2019

दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी उद्या रांजणगाव देशमुख येथे रास्त रोको आंदोलन ; नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहण्याचे आवाहन


रांजणगाव देशमुख(प्रतिनिधी):- 
                            कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव महसूल मंडळातील रांजणगाव देशमुख सह इतर गावे कोणत्याच दुष्काळ यादीमध्ये न आल्याने येथील शेतकऱ्यांवर मोठा अन्याय झाला असून ही गावे दुष्काळ यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी उद्या दिनांक ७ फेब्रुवारी रोजी रांजणगाव देशमुख येथे रास्त रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या संदर्भातील पत्र तहसीलदार किशोर कदम यांना देण्यात आले आहे.
                             पोहेगाव मंडळातील रांजणगाव देशमुख, मनेगाव, बहाद्दरपूर, अंजनापूर, वेस, जवळके, सोयगाव, धोंडेवाडी, बहादरबाड, काकडी, मल्हारवाडी या गावांमध्ये तीव्र स्वरूपाचा दुष्काळ असून शेतीचे उत्पन्न शून्य आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना कोणताच आधार नसून प्रशासनाने हि गावे दुष्काळ यादीत सहभागी न केल्यामुळे शेतकरी वर्गतात मोठी निराशा आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे जनावरांना चारा नसून चाऱ्यासाठी येथील अनेक शेतकरी ऊस तोडणीसाठी बाहेर जात आहेत.
                            त्यामुळे उद्या दिनांक ७ फेब्रुवारी रोजी रांजणगाव देशमुख येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित रहावे.

--