Thursday 28 March 2019

राहुरीतील पत्रकार हल्ल्याचा कोपरगावात निषेध


  कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन
शिर्डी लाइव्ह प्रतिनिधी) -
                                    राहुरी येथे बुधवार दिनांक 20 मार्च  रोजी दुचाकी चोरीच्या वादातून भर बाजारपेठेत सुरू असलेल्या हानामारीचा वृत्तांकन करत असतान राहुरीचे पत्रकार भाऊसाहेब येवले यांना त्यातील काही समाजकंठकांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली असल्याने दोषींना कठोर शासन व्हावे. यासाठी शुक्रवारी कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने  हल्ल्याचा निषेध करून तहसीलदार योगेश चंद्रे यांना  निवेदन दिले आहे
       यावेळी दिलेल्या निवेदनामध्ये असे म्हटले आहे की, राहुरी येथील पत्रकार भाऊसाहेब येवले हे सायकल चोरीप्रकरणी हाणामारीचे फोटो वृत्तांकन करत असताना त्या ठिकाणी त्यांना मारहाण करण्यात आली व त्यांच्याकडून भ्रमणध्वनी हिसकावून घेण्यात आला. या घटनेचा कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाने तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.घडलेल्या घटनेचा वरिष्ठ पातळीवर तपास होऊन दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.यावेळी कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष डॉ.अरुण गव्हाणे,उपाध्यक्ष शैलेश शिंदे ,कार्याध्यक्ष युसुफ रंगरेज ,सचिव संतोष जाधव, शिवाजी जाधव, हेमचंद्र भवर, सोमनाथ सोनपसारे,नानासाहेब शेळके, रोहित टेके,श्याम गवंडी, हाफीज शेख, विजय शेळके, सिद्धार्थ महेरखांब ,लक्ष्मण जावळे, राहुल देवरे ,अक्षय काळे , लक्ष्मण वावरे, प्राध्यापक साहेबराव दवंगे,योगेश डोखे, मुबीन खान ,यांच्यासह मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते.

 पत्रकारावरील हल्ल्याच्या निषेधार्थ कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने अध्यक्ष डॉ अरुण गव्हाणे व पदाधिकारी यांनी तहसीलदार योगेश चंद्रे यांना निवेदन दिले

Sunday 3 March 2019

अशोक रूईकर यांचे निधन



कोपरगाव (प्रतिनिधी)
                                  कोपरगाव येथील श्री अशोक कारभारी रूईकर यांचे दिं.२६ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.२० वाजता निधन झालेले आहेत. पत्रकार योगेश रुईकर, राकेश रुईकर व दीपाली पळसकर यांचे ते वडील होत. त्यांच्यावर कोपरगाव येथील अमरधाम येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा दशक्रिया विधि दिनांक ७ मार्च रोजी सकाळी साडे नउ वाजता अमरधाम कोपरगाव येथे होणार आहे. 

तुळशीराम खालकर यांचे निधन


रांजणगाव देशमुख (प्रतिनिधी):-
                                              कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथील सामाजिक कार्यकर्ते व प्रगतशील शेतकरी तुळशीराम विठ्ठल खालकर वय ६५ वर्षे यांचे दिनांक ०१ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास निधन झालेत्यांच्या पश्चात पत्नीदोन मुलेएक मुलगीभाऊपुतणेनातवंडे असा परीवार आहेगणेश खालकरबाबासाहेब खालकर व कल्पना पाटोळे यांचे ते वडील होत.  त्यांच्यावर रांजणगांव देशमुख येथील वैकुंठ भुमित अंत्यनसांस्कार करण्यात आले.  त्यांचा दशक्रिया विधी दिनांक १० मार्च रोजी सकाळी नउ वाजता रांजणगांव देशमुख येथे होणार आहे.