Thursday 29 November 2018

योगिता पाचोरे यांचा आदर्श शेतकरी पुरस्काराने सन्मान 


शिर्डी लाइव्ह (प्रतिनिधी):-

                         कोपरगाव तालुक्यातील बहादराबाद येथील युवा महिला शेतकरी योगिता सतिष पाचोरे यांना आदर्श डाळिंब उत्पादक शेतकरी पुरस्कार राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ व मान्यवरांच्या हस्ते नाशिक येथे नुकताच प्रदान करण्यात आला.
                         कोपरगाव तालुक्यातील बहादराबाद येथील योगिता सतिष पाचोरे यांना कृषीथॉन गौरव युवा महिला यांच्या वतीने नाशिक येथे कृषीथॉन शेतकरी प्रदर्शनात झालेल्या  कार्यक्रमात माजी उपमुखमंत्री छगनरावजी भुजबळ तसेच माझी कृषी मंत्री बाळासाहेब थोरात विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत योगिता पाचोरे व त्याचे पती सतिष पाचोरे यांना आदर्श शेतकरी पुरस्कार प्रदान करण्यात आला.

                     या प्रसंगी योगिता पाचोरे म्हणाल्या की मी शेतकरी असल्याचा मला अभिमान आहे शेती ही माझी माय आहे. शेतीत विविध प्रयोग करत असताना माझे भाया मनोहर पाचोरे, बाळासाहेब पाचोरे ,जाव मुक्ता पाचोरे  व माझे पती तसेच माझी सासू सासरे यांचे नेहमीच मला मोलाचे मार्गदर्शन असते हा पुरस्कार माझा नसून माझ्या परिवाराचा आहेत. 

Thursday 22 November 2018

रांजणगाव देशमुख सह परिसरात दुष्काळ जाहीर करा- ऍड. योगेश खालकर


तहसीलदारांना निवेदन; अन्यथा आमरण उपोषण
रांजणगाव देशमुख(वार्ताहर):-
 
                                        कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख, जवळके, अंजनापूर, बहाद्दरपूर, धोंडेवाडी, वेस, सोयगाव, मनेगाव, मल्हारवाडी, काकडी, डांगेवाड़ी आदी गावांना १५ दिवसात दुष्काळ जाहीर करावा अन्यथा दि. ३ डिसेंबर पासून रांजणगाव देशमुख येथे आमरण उपोषण सुरु काण्यात येईल असे निवेदन रांजणगाव देशमुख येथील ऍडव्होकेट योगेश खालकर यांनी तहसीलदार यांना दिले आहे.
                                        या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यतील वरील गावांना ५० वर्षांपासून कायम दुष्काळ असताना हि गावे दुष्काळ यादीत समाविष्ट करण्यात आलेली नाही. तालुक्यातील एकही गाव दुष्काळाच्या पहिल्या यादीमध्ये आलेले नाही. सध्या या गावांमध्ये पिण्याच्या व जनावरांच्या पाण्यासाठी मोठ्या झळा सोसाव्या लागत आहेत. जनावरांना चारा उपलब्ध नाही. शेतकरी गावे सोडण्याच्या तयारीत आहेत.
                                        शेतकऱ्यांना अळीमुळे झालेल्या कापसाच्या नुकसानीचे पैसे मिळालेले नाही. या गावांमध्ये चारा छावण्या सुरु करणे गरजेचे आहे. वरील गावे पोहेगाव मंडळात येत असल्याने दुष्काळी गावेही बागायत म्हणून गणली जातात. त्यामुळे या गावांचे वेगळे मंडल कार्यालय होणे गरजेचे आहे. या सर्व मागण्या ८ दिवसात पूर्ण कराव्या अन्यथा या गावांतील शेतकरी आपल्या कुटूंबियांसमवेत रांजणगाव देशमुख येथे ३ डिसेंबर पासून आमरण उपोषण करतील. आणि याची जबाबदारी सरकारची राहील.

Thursday 15 November 2018

धोंडेवाडी साठवण तलावात पाणी पडण्यास सुरुवात


रांजणगाव देशमुख सह सात गावांचा पाणी प्रश्न तात्पुरता मार्गी
आ. कोल्हे यांच्या प्रयत्नांना यश 

रांजणगाव देशमुख(वार्ताहर):-
    
                                        कोपरगाव तालुक्यातील रांजणगांव देशमुख, धोंडेवाडी, वेस, सोयेगांव, मनेगांव, अंजनापुर, बहादरपुर या सात गावांची असलेल्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचा धोंडेवाडी पाझर तलाव पाण्यांने भरून घेण्यांसाठी थकीत असलेल्या वीजबिलात आ. स्नेहलता कोल्हे यांनी तोडगा काढल्यानंतर एक्सप्रेस फीडरवरील वीज जोड तात्काळ सुरू करावेत असे आदेश राज्य वीज वितरण कंपनीचे कार्यकारी संचालक संजीवकुमार यांनी मंगळवारी दिले होते. त्याची तातडीने अमलबजावनी होउन बुधवारी विजवितरण कंपनीच्या कर्मचा-यांनी  दिवसभर काम करत विज पुरवठा जोडुन दिला आणि धोंडेवाडीच्या साठवण तलावात पाच वाजेच्या सुमारास पाणी पडण्यास सुरुवात झाली आहे. ही योजना गेल्या दोन वर्षापासुन बंद अवस्थेत होती.
                                        रांजणगांव देशमुख प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे व्याजासह ३२ लाख रूपये वीज बील थकले होते. वीजबील भरण्यासंदर्भात ग्रामपंचायती सक्षम नाही. या गावामध्ये दुष्काळी परिस्थीती आहे. ही योजना चालु करावी यासाठी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री राम शिंदे तसेच महसुलमंत्री चंद्रकांत दादा पाटील त्यांच्याशी याबाबत सातत्यांने पाठपुरावा केला तसेच कोल्हे कारखाना कार्यस्थळावर वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता डी बी गोसावी, उपकार्यकारी अभियंता डी एन चावडा, अतिरिक्त उप कार्यकारी अभियंता जे व्ही महाजन, उपकार्यकारी अभियंता जी आर रिचवाल, पोलिस निरीक्षक श्री लोखंडे गटविकास अधिकारी कपिलनाथ कलोडे, संबंधीत गांवचे रहिवासी यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यांत आली त्यात सध्याची दुष्काळी स्थिती नागरिकांसह जनावरांचा पिण्यांच्या पाण्यांचा निर्माण झालेला प्रश्न त्यासाठी टँकर सुरू करण्यांवर होणारा खर्च याबाबत सविस्तर चर्चा होवुन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याशी बोलणे झाले. आणी विजपुरवठा जोडण्याचा निर्णय घेण्यात आला.
                                       चालु आवर्तनातुन हा तलाव पुर्ण क्षमतेने भरुन घेणे गरजेचे आहे. हा तलाव पुर्ण क्षमतेने भरला तर तिन ते चार महीने या योजनेच्या गावठाण हद्दीतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागु शकेल.
                                       पाणी पडतेवेळी बहादरपरचे माजी सरपंच कैलास रहाणे, रांजणगावचे सरपंच संदीप रणधीर, रांजणगाव देशमुख चे ग्रामविकास अधिकारी शेख व इतर गावचे ग्रामसेवक व विजवितरण कंपनीचे आधिकारी व कर्मचारी उपस्थीत होते.

                                        

या साठवण तलावात पाणी साठा केल्यानंतर प्रशासनास मोठी काळजी घ्यावी लागणार आहे. आसपास पाणी उपसा होणार नाही यावर कडक नियंत्रण ठेवावे लागणार आहे. तरच तलावात पाणी टिकून लाभार्थी गावांना त्याचा फायदा होईल.


(या तालावात पाणी साठल्यास या योजनेच्या लाभार्थी गावांना याचा फायदा होणार आहे. आ.स्नेहलता कोल्हे यांनी सातत्याने प्रयत्न केल्याने तलावात पाणी आले आहे.
  -संदीप रणधीर,  सरपंच रांजणगाव देशमुख)


धोडेंवाडी पाझर तलाव भरण्यांसाठी तात्काळ वीज जोड सुरू करण्याचे आदेश - आ कोल्हे



रांजणगाव देशमुख(वार्ताहर):-

 कोपरगाव तालुक्यातील रांजणगांव देशमुख, धोंडेवाडी, वेस, सोयेगांव, मनेगांव, अंजनापुर, बहादरपुर या सात गावांची  असलेली प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचा धोंडेवाडी पाझर तलाव पाण्यांने भरून घेण्यांसाठी थकीत असलेल्या वीजबिलात तोडगा काढुन एक्सप्रेस फीडरवरील वीज जोड तात्काळ सुरू करावेत असे आदेश राज्य वीज वितरण कंपनीचे कार्यकारी संचालक संजीवकुमार यांनी मंगळवारी दिले अशी माहिती आमदार स्नेहलता कोल्हे यांनी दिली.
                                 रांजणगांव देशमुख प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे व्याजासह ३२ लाख रूपये वीज बील थकले होते त्या संदर्भात पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री राम शिंदे तसेच महसुलमंत्री चंद्रकांत दादा पाटील शिर्डी दौ-यावर आले असता त्यांच्याशी याबाबत सातत्यांने पाठपुरावा केला तसेच कोल्हे कारखाना कार्यस्थळावर वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता डी बी गोसावी, उपकार्यकारी अभियंता डी एन चावडा, अतिरिक्त उप कार्यकारी अभियंता जे व्ही महाजन, उपकार्यकारी अभियंता जी आर रिचवाल (राहाता) पोलिस निरीक्षक श्री लोखंडे गटविकास अधिकारी कपिलनाथ कलोडे, संबंधीत गांवचे रहिवासी यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यांत आली त्यात सध्याची दुष्काळी स्थिती नागरिकांसह जनावरांचा पिण्यांच्या पाण्यांचा निर्माण झालेला प्रश्न त्यासाठी टँकर सुरू करण्यांवर होणारा खर्च याबाबत सविस्तर चर्चा होवुन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याशी बोलणे झाले. १९९८ पासून या योजनेचे उत्तरदायित्व संजीवनीचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्ह यांनी घेवुन सातत्यांने यातुन पाणी दिले होते. मात्र गेल्या दीड वर्षापासुन ही योजना ठप्प होती.

                                        सोमवार १२ नोव्हेंबर रोजी याबाबत राज्य वीज वितरण कंपनीचे कार्यकारी संचालक संजीवकुमार यांच्याशीही चर्चा झाली त्यांनी बैठकीत ठरल्याप्रमाणे झालेल्या प्रस्तावावर निर्णय करून अहमदनगरचे अधिक्षक अभियंता संतोष सांगळे, कार्यकारी अभियंता जीवन एस चव्हाण यांच्याशी मंगळवारी दुपारी धोंडेवाडी पाझरतलाव एक्सप्रेस फिडरचा कट केलेला वीज पुरवठा तात्काळ चालु करावा व जनतेच्या पिण्यांच्या पाण्यांची अडचण दुर करावी असे आदेश केले अहमदनगर बैठकीस माजी सरपंच कैलास राहणे सरपंच संदिप रणधीर उपस्थित होते, त्यामुळे धोंडेवाडीचा पाझर तलाव आता चालु पिण्यांच्या पाण्यांच्या आर्वतनांत भरला जाईल व पश्चिम भागातील सात गावांच्या नागरिकांच्या पिण्यांच्या पाण्यांची समस्या दुर होईल असेही आमदार कोल्हे शेवटी म्हणांल्या. वीज वितरण कंपनीने घेतलेल्या निर्णयाचे व उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या सहकार्याबददल आमदार कोल्हे व संबंधीत गावच्या नागरिकांनी  आभार मानले आहे.