Wednesday 12 December 2018

शहीद जवान केशव गोसावी यांच्या कुटुंबियांना मदत



रांजणगाव देशमुख(प्रतिनिधी):- 

                                  कोपरगाव तालुक्यातील जवळके, धोडेंवाडी, अंजनापुर, बहादरपुर, बहादबाद, वेस, सोयेगांव तसेच आदी गावांच्या वतीने  रोख रक्कम रुपये चौदा हजार मदत वीर जवान केशव गोसावी यांच्या कुटुबांसाठी केली आहेत.
                                 सिन्नर तालुक्यातील शिंदेवाडी येथील सैन्य दलाच्या २४ मराठा बटालीयन मध्ये नेमणुकीवर असलेले जवान नायक केशव गोसावी रविवार दिनांक ११ नोव्हेंबर रोजी जम्मु काश्मीर नौशेरा भागात आतंकवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झाले. या घटनेने त्यांचे कुटुंबिय व संपुर्ण शिंदेवाडी गावासह तालुक्यात शोककळा पसरली. त्या दुःखातुन त्यांना आधार मिळावा यासाठी अनेक संस्था व गावांकडून त्यांना मदत करण्यात आली. 
                              त्यांच्या पश्चात अपंग वडील, पत्नी व विवाहीत बहीणी असा परिवार आहे. आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची आहे. सदर प्रसंगी सरपंच बाबुराव थोरात, उपसरपंच गोपीनाथ रहाणे, माजी सरपंच ज्ञानेश्वर गव्हाणे, संतोष गव्हाणे, नंदु मामा पाडेकर, बाळासाहेब चिमण रहाणे, पत्रकार विनोद जवरे, साई भक्त सुभाष रहाणे, विकास गोर्डे, दत्तात्रय गोर्डे आदी उपस्थित होते. 

फोटो -
                शहीद जवान केशव गोसावी यांचा कुटुबियांना आर्थिक देतांना सरपंच बाबुराव थोरात, माजी सरपंच ज्ञानेश्वर गव्हाणे, उपसरपंच गोपीनाथ रहाणे आदी. 


महेश पाचोरे यांचा रांजणगाव देशमुख येथे सत्कार




महाराष्ट्र लोकसेवा आयोगातून लेखापाल पदी निवड

रांजणगाव देशमुख(प्रतिनिधी):-
                                      कोपरगाव तालुक्यातील बहादराबाद येथील महेश कचेश्वर पाचोरे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्याकडून घेतल्या गेलेल्या परीक्षेमधून लेखापाल पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा रांजणगाव देशमुख येथील ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
                                      कोपरगाव तालुक्यातील दुष्काळ ग्रस्त भागातील बहादराबाद येथील महेश पाचोरे हे सामान्य शेतकरी कुटुंबातून असून मेहनत व जिद्दीच्या बळावर या यशापर्यंत पोहोचलो असल्याचे प्रतिपादन त्यांनी आपल्या मनोगतातून केले.
                                      पाचोरे हे रांजणगाव देशमुख येथील जावई असल्याने व ग्रामीण भागातील तरुणही स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून आपले करियर करत असल्याने इतरांना त्यांचे मार्गदर्शन मिळावे म्हणून त्यांना सत्कारासाठी आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी रांजणगाव देशमुख येथील सरपंच संदीप रणधीर, उपसरपंच बाबासाहेब गोर्डे, माजी पोलीस पाटील निवृत्ती गोर्डे, भाऊसाहेब खालकर, पोलीस पाटील राजेंद्र शेटे, रवींद्र खालकर, प्रकाश गोर्डे, कुणाल देशमुख, अशोक वामन, बाळासाहेब वामन, सोमनाथ खालकर, संपत सोनवणे, श्रावण खालकर, सचिन खालकर, सुरेश खालकर, धनंजय वर्पे, त्र्यंबक वर्पे, योगेश चव्हाण, संजय गोर्डे, शरद देशमुख, अजित गुडघे, सौरभ वामन, किशोर शिंदे, गावातील क्रिकेट संघ, विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष व सभासद तसेच ग्रामस्थ हजर होते.

(फोटो ओळी- कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथे लेखापाल पदी निवड झाल्याबद्दल महेश पाचोरे यांचा सत्कार करण्यात आला. छाया- गोरक्षनाथ वर्पे)


विद्यार्थ्यांनी व्यसनापासून दूर रहावे- गोरक्षनाथ वर्पे




जय हनुमान विद्यालयात व्यसन मुक्ती अभियान
रांजणगाव देशमुख(वार्ताहर):-
                             कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथील जय हनुमान विद्यालयात व्यसनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांपासून विद्यार्थी दूर राहावे यासाठी प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करण्यासाठी पालक म्हणून पत्रकार गोरक्षनाथ वर्पे यांना आमंत्रित करण्यात आले होते.
                             विद्यार्थी अवस्थेतच अनेक मुलांना विविध प्रकारचे व्यसन लागते या व्यसनापासून मुले दूर रहावी म्हणून शासकीय पातळीवर प्रशासन मोठे प्रयत्न करत असून यासाठी शाळांमध्ये विविध उपक्रम राबविले जात आहेत.
                           यामध्ये पालक, शिक्षक व विद्यार्थी यांची एक समिती स्थापन करून पालकांकडून विद्यार्थ्यांना शाळेत मार्गदर्शन करण्याचा कार्यक्रम रांजणगाव देशमुख येथील जय हनुमान विद्यालयात घेण्यात आला. यावेळी पालक म्हणून पत्रकार गोरक्षनाथ वर्पे यांना आमंत्रित करण्यात आले होते. वर्पे यांनी विद्यार्थी व्यसनमुक्त राहण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या विषयावर विद्यालयाच्या वतीने निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धाही घेण्यात आल्या. या प्रसंगी मुख्याध्यापक ए डी दिघे सर, कालेवार सर आदींसह शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी हजर होते.

(फोटो ओळी- कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथील विद्यालयातील विद्यार्थ्यांनी व्यसनापासून दूर राहण्यासाठी प्रतिज्ञा केली.-  छाया- गोरक्षनाथ वर्पे)

रांजणगाव देशमुख येथे टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांचे आयोजन

रांजणगाव देशमुख(प्रतिनिधी):-
                                        कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथे गावातील तरुणांच्या वतीने दिनांक ५ डिसेंबर ते १६ डिसेंबर २०१८ दरम्यान भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांचे आयोजन  करण्यात आले आहे. यासाठी प्रथम, द्वितीयव तृतीय अशी बक्षिसेही देण्यात येणार आहेत.
                                         रांजणगाव देशमुख येथे बस स्टँडच्या पाठीमागे या स्पर्धांचे आयोजन केले असून दिनांक ५ डिसेंबर पासून या स्पर्धांना  सुरुवात झाली आहे. विजेत्या संघांसाठी १११११  रुपयांचे प्रथम बक्षीस नसिरा  पोल्ट्री फार्म, पुणे यांच्याकडून, ७७७७ रुपयांचे द्वितीय बक्षीस बाबासाहेब रणधीर यांच्याकडून, ५५५५ रुपयांचे तृतीय बक्षीस यदृच्छा पेट्रोलियम व कपिला ऍनिमल हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून, ४४४४ रुपयांचे चतुर्थ बक्षीस गनीभाई सय्यद व अक्षय वर्पे यांच्याकडून तर ३३३३ रुपयांचे पाचवे बक्षीस किरण व सचिन वर्पे, एस के ट्रान्सपोर्ट यांच्याकडून जाहीर करण्यात आले आहे.
                                       या स्पर्धांच्या उदघाटनाच्या वेळी निवृत्ती गोर्डे, सरपंच संदीप रणधीर, उपसरपंच बाबासाहेब गोर्डे, पोलीस पाटील राजेंद्र शेटे, रामनाथ विठ्ठल खालकर, सोमनाथ खालकर, गणेश जनार्दन खालकर, डॉ. अरुण गव्हाणे, अजित गुडघे, विलास रणधीर, चंद्रभान ठोंबरे, प्रकाश गोर्डे, धनंजय वर्पे, बाळासाहेब गोर्डे, रावसाहेब खालकर, सुभान सय्यद, प्रशांत दिघे, सचिन शिंदे, नानासाहेब वर्पे, संतोष बिडवे, सचिन खालकर, निलेश खालकर, विशाल गोर्डे, आप्पा वर्पे, त्र्यंबक वर्पे, अलिशान सय्यद आदींसह ग्रामस्थ हजर होते. 

(फोटो ओळी- रांजणगाव देशमुख येथे क्रिकेट स्पर्धांच्या उदघाटनादरम्यान उपस्थित मान्यवर व क्रिकेट संघ. छाया- गोरक्षनाथ वर्पे)


Thursday 29 November 2018

योगिता पाचोरे यांचा आदर्श शेतकरी पुरस्काराने सन्मान 


शिर्डी लाइव्ह (प्रतिनिधी):-

                         कोपरगाव तालुक्यातील बहादराबाद येथील युवा महिला शेतकरी योगिता सतिष पाचोरे यांना आदर्श डाळिंब उत्पादक शेतकरी पुरस्कार राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ व मान्यवरांच्या हस्ते नाशिक येथे नुकताच प्रदान करण्यात आला.
                         कोपरगाव तालुक्यातील बहादराबाद येथील योगिता सतिष पाचोरे यांना कृषीथॉन गौरव युवा महिला यांच्या वतीने नाशिक येथे कृषीथॉन शेतकरी प्रदर्शनात झालेल्या  कार्यक्रमात माजी उपमुखमंत्री छगनरावजी भुजबळ तसेच माझी कृषी मंत्री बाळासाहेब थोरात विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत योगिता पाचोरे व त्याचे पती सतिष पाचोरे यांना आदर्श शेतकरी पुरस्कार प्रदान करण्यात आला.

                     या प्रसंगी योगिता पाचोरे म्हणाल्या की मी शेतकरी असल्याचा मला अभिमान आहे शेती ही माझी माय आहे. शेतीत विविध प्रयोग करत असताना माझे भाया मनोहर पाचोरे, बाळासाहेब पाचोरे ,जाव मुक्ता पाचोरे  व माझे पती तसेच माझी सासू सासरे यांचे नेहमीच मला मोलाचे मार्गदर्शन असते हा पुरस्कार माझा नसून माझ्या परिवाराचा आहेत. 

Thursday 22 November 2018

रांजणगाव देशमुख सह परिसरात दुष्काळ जाहीर करा- ऍड. योगेश खालकर


तहसीलदारांना निवेदन; अन्यथा आमरण उपोषण
रांजणगाव देशमुख(वार्ताहर):-
 
                                        कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख, जवळके, अंजनापूर, बहाद्दरपूर, धोंडेवाडी, वेस, सोयगाव, मनेगाव, मल्हारवाडी, काकडी, डांगेवाड़ी आदी गावांना १५ दिवसात दुष्काळ जाहीर करावा अन्यथा दि. ३ डिसेंबर पासून रांजणगाव देशमुख येथे आमरण उपोषण सुरु काण्यात येईल असे निवेदन रांजणगाव देशमुख येथील ऍडव्होकेट योगेश खालकर यांनी तहसीलदार यांना दिले आहे.
                                        या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यतील वरील गावांना ५० वर्षांपासून कायम दुष्काळ असताना हि गावे दुष्काळ यादीत समाविष्ट करण्यात आलेली नाही. तालुक्यातील एकही गाव दुष्काळाच्या पहिल्या यादीमध्ये आलेले नाही. सध्या या गावांमध्ये पिण्याच्या व जनावरांच्या पाण्यासाठी मोठ्या झळा सोसाव्या लागत आहेत. जनावरांना चारा उपलब्ध नाही. शेतकरी गावे सोडण्याच्या तयारीत आहेत.
                                        शेतकऱ्यांना अळीमुळे झालेल्या कापसाच्या नुकसानीचे पैसे मिळालेले नाही. या गावांमध्ये चारा छावण्या सुरु करणे गरजेचे आहे. वरील गावे पोहेगाव मंडळात येत असल्याने दुष्काळी गावेही बागायत म्हणून गणली जातात. त्यामुळे या गावांचे वेगळे मंडल कार्यालय होणे गरजेचे आहे. या सर्व मागण्या ८ दिवसात पूर्ण कराव्या अन्यथा या गावांतील शेतकरी आपल्या कुटूंबियांसमवेत रांजणगाव देशमुख येथे ३ डिसेंबर पासून आमरण उपोषण करतील. आणि याची जबाबदारी सरकारची राहील.

Thursday 15 November 2018

धोंडेवाडी साठवण तलावात पाणी पडण्यास सुरुवात


रांजणगाव देशमुख सह सात गावांचा पाणी प्रश्न तात्पुरता मार्गी
आ. कोल्हे यांच्या प्रयत्नांना यश 

रांजणगाव देशमुख(वार्ताहर):-
    
                                        कोपरगाव तालुक्यातील रांजणगांव देशमुख, धोंडेवाडी, वेस, सोयेगांव, मनेगांव, अंजनापुर, बहादरपुर या सात गावांची असलेल्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचा धोंडेवाडी पाझर तलाव पाण्यांने भरून घेण्यांसाठी थकीत असलेल्या वीजबिलात आ. स्नेहलता कोल्हे यांनी तोडगा काढल्यानंतर एक्सप्रेस फीडरवरील वीज जोड तात्काळ सुरू करावेत असे आदेश राज्य वीज वितरण कंपनीचे कार्यकारी संचालक संजीवकुमार यांनी मंगळवारी दिले होते. त्याची तातडीने अमलबजावनी होउन बुधवारी विजवितरण कंपनीच्या कर्मचा-यांनी  दिवसभर काम करत विज पुरवठा जोडुन दिला आणि धोंडेवाडीच्या साठवण तलावात पाच वाजेच्या सुमारास पाणी पडण्यास सुरुवात झाली आहे. ही योजना गेल्या दोन वर्षापासुन बंद अवस्थेत होती.
                                        रांजणगांव देशमुख प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे व्याजासह ३२ लाख रूपये वीज बील थकले होते. वीजबील भरण्यासंदर्भात ग्रामपंचायती सक्षम नाही. या गावामध्ये दुष्काळी परिस्थीती आहे. ही योजना चालु करावी यासाठी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री राम शिंदे तसेच महसुलमंत्री चंद्रकांत दादा पाटील त्यांच्याशी याबाबत सातत्यांने पाठपुरावा केला तसेच कोल्हे कारखाना कार्यस्थळावर वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता डी बी गोसावी, उपकार्यकारी अभियंता डी एन चावडा, अतिरिक्त उप कार्यकारी अभियंता जे व्ही महाजन, उपकार्यकारी अभियंता जी आर रिचवाल, पोलिस निरीक्षक श्री लोखंडे गटविकास अधिकारी कपिलनाथ कलोडे, संबंधीत गांवचे रहिवासी यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यांत आली त्यात सध्याची दुष्काळी स्थिती नागरिकांसह जनावरांचा पिण्यांच्या पाण्यांचा निर्माण झालेला प्रश्न त्यासाठी टँकर सुरू करण्यांवर होणारा खर्च याबाबत सविस्तर चर्चा होवुन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याशी बोलणे झाले. आणी विजपुरवठा जोडण्याचा निर्णय घेण्यात आला.
                                       चालु आवर्तनातुन हा तलाव पुर्ण क्षमतेने भरुन घेणे गरजेचे आहे. हा तलाव पुर्ण क्षमतेने भरला तर तिन ते चार महीने या योजनेच्या गावठाण हद्दीतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागु शकेल.
                                       पाणी पडतेवेळी बहादरपरचे माजी सरपंच कैलास रहाणे, रांजणगावचे सरपंच संदीप रणधीर, रांजणगाव देशमुख चे ग्रामविकास अधिकारी शेख व इतर गावचे ग्रामसेवक व विजवितरण कंपनीचे आधिकारी व कर्मचारी उपस्थीत होते.

                                        

या साठवण तलावात पाणी साठा केल्यानंतर प्रशासनास मोठी काळजी घ्यावी लागणार आहे. आसपास पाणी उपसा होणार नाही यावर कडक नियंत्रण ठेवावे लागणार आहे. तरच तलावात पाणी टिकून लाभार्थी गावांना त्याचा फायदा होईल.


(या तालावात पाणी साठल्यास या योजनेच्या लाभार्थी गावांना याचा फायदा होणार आहे. आ.स्नेहलता कोल्हे यांनी सातत्याने प्रयत्न केल्याने तलावात पाणी आले आहे.
  -संदीप रणधीर,  सरपंच रांजणगाव देशमुख)


धोडेंवाडी पाझर तलाव भरण्यांसाठी तात्काळ वीज जोड सुरू करण्याचे आदेश - आ कोल्हे



रांजणगाव देशमुख(वार्ताहर):-

 कोपरगाव तालुक्यातील रांजणगांव देशमुख, धोंडेवाडी, वेस, सोयेगांव, मनेगांव, अंजनापुर, बहादरपुर या सात गावांची  असलेली प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचा धोंडेवाडी पाझर तलाव पाण्यांने भरून घेण्यांसाठी थकीत असलेल्या वीजबिलात तोडगा काढुन एक्सप्रेस फीडरवरील वीज जोड तात्काळ सुरू करावेत असे आदेश राज्य वीज वितरण कंपनीचे कार्यकारी संचालक संजीवकुमार यांनी मंगळवारी दिले अशी माहिती आमदार स्नेहलता कोल्हे यांनी दिली.
                                 रांजणगांव देशमुख प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे व्याजासह ३२ लाख रूपये वीज बील थकले होते त्या संदर्भात पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री राम शिंदे तसेच महसुलमंत्री चंद्रकांत दादा पाटील शिर्डी दौ-यावर आले असता त्यांच्याशी याबाबत सातत्यांने पाठपुरावा केला तसेच कोल्हे कारखाना कार्यस्थळावर वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता डी बी गोसावी, उपकार्यकारी अभियंता डी एन चावडा, अतिरिक्त उप कार्यकारी अभियंता जे व्ही महाजन, उपकार्यकारी अभियंता जी आर रिचवाल (राहाता) पोलिस निरीक्षक श्री लोखंडे गटविकास अधिकारी कपिलनाथ कलोडे, संबंधीत गांवचे रहिवासी यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यांत आली त्यात सध्याची दुष्काळी स्थिती नागरिकांसह जनावरांचा पिण्यांच्या पाण्यांचा निर्माण झालेला प्रश्न त्यासाठी टँकर सुरू करण्यांवर होणारा खर्च याबाबत सविस्तर चर्चा होवुन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याशी बोलणे झाले. १९९८ पासून या योजनेचे उत्तरदायित्व संजीवनीचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्ह यांनी घेवुन सातत्यांने यातुन पाणी दिले होते. मात्र गेल्या दीड वर्षापासुन ही योजना ठप्प होती.

                                        सोमवार १२ नोव्हेंबर रोजी याबाबत राज्य वीज वितरण कंपनीचे कार्यकारी संचालक संजीवकुमार यांच्याशीही चर्चा झाली त्यांनी बैठकीत ठरल्याप्रमाणे झालेल्या प्रस्तावावर निर्णय करून अहमदनगरचे अधिक्षक अभियंता संतोष सांगळे, कार्यकारी अभियंता जीवन एस चव्हाण यांच्याशी मंगळवारी दुपारी धोंडेवाडी पाझरतलाव एक्सप्रेस फिडरचा कट केलेला वीज पुरवठा तात्काळ चालु करावा व जनतेच्या पिण्यांच्या पाण्यांची अडचण दुर करावी असे आदेश केले अहमदनगर बैठकीस माजी सरपंच कैलास राहणे सरपंच संदिप रणधीर उपस्थित होते, त्यामुळे धोंडेवाडीचा पाझर तलाव आता चालु पिण्यांच्या पाण्यांच्या आर्वतनांत भरला जाईल व पश्चिम भागातील सात गावांच्या नागरिकांच्या पिण्यांच्या पाण्यांची समस्या दुर होईल असेही आमदार कोल्हे शेवटी म्हणांल्या. वीज वितरण कंपनीने घेतलेल्या निर्णयाचे व उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या सहकार्याबददल आमदार कोल्हे व संबंधीत गावच्या नागरिकांनी  आभार मानले आहे.

Wednesday 31 October 2018

बहाद्दरपूर गावातील उपक्रम स्तुत्य - भास्करराव पेरे


बहाद्दरपूर येथे ४०१ वृक्षारोपन कार्यक्रमाचा समारोप

शिर्डी लाइव्ह (प्रतिनिधी):-

                                    बहादरपुर गाव हे इतर गावांनी आदर्श घ्यावा असे गाव असून गावामध्ये वृक्षजीवन फाउंडेशनचे काम अतिशय चांगले आहे तसेच गावाचा विकास करायचा असेल तर ग्रामविकास अधिकारी यांना जीव लावा, सरपंच हा आई सारखा असवा असे प्रतिपादन राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या औरंगाबाद जिल्ह्यातील पाटोदा ग्रामपंचायचीचे माजी सरपंच भास्करराव पेरे यांनी बहादरपुर येथे वृक्षजीवन फाउंडेशन च्या वृक्षलागवडीच्या सांगता कार्यक्रमात केले. 

                    ते कोपरगाव तालुक्यातील बहादरपुर येथे वृक्षजीवन फाऊंडेशनने केलेल्या वृक्ष लागवडीचा सांगता कार्यक्रम तसेच गावातील वाचनालय उद्घाटनाच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणुन रोटरी क्लबचे अध्यक्ष अमोल भुजबळ, अभियंता शान शेख, एच.डी.एफ.सी .बँकेचे विकास परीवर्तनचे संचालक दिलीफ नाफाडे, रोटरी क्लबचे उपाध्यक्ष राजेंद्र कोते आदी मान्यवर उपस्थित होते. या वर्षी गावामध्ये ४०१ वृक्षांचे रोपं करण्यात आले. दरवर्षी याप्रमाणे शेकडो झाडे लावून त्यांना वर्षभर पाणी देऊन त्यांचे व्यवस्थित संगोपन करण्याचे काम बहाद्दरपूर मधील वृक्षराजीवन फाउंडेशन करते. या कार्यक्रमाचे प्रास्तविक महेश रहाणे यांनी केले तर सुत्रसंचालन बाळासाहेब चिमणराव रहाणे यांनी केले व आभार उपसरपंच गोपीनाथ रहाणे यांनी व्यक्त केले. 

फोटो ओळी- बहादरपुर येथे वृक्षजीवन फाउंडेशन तसेच ग्रामस्थांचा वतीने राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या पाटोदा ग्रामपंचायचे माजी सरपंच भास्करराव पेरे यांचा सत्कार करतांना वृक्षजीवन फाउंडेशन टीम व ग्रामस्थ. 

Wednesday 3 October 2018

ईकबाल पटेल यांचे निधन


शिर्डी लाइव्ह : तालुक्याच्या पश्चिम भागातील शहाजापूर येथील प्रसिध्द ट्रक व्यावसायीक ईकबाल ईस्माईल पटेल(सय्यद ) (५४ )यांचे निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन भाऊ,तीन मुली,तीन जावई, दोन मुले, दोन सुना, नातवंड असा परिवार आहे. येथील समीर पटेल व जमीर पटेल यांचे ते वडील होत.
यांचे निधन 

एकनाथ गव्हाणे यांचे निधन

एकनाथ गव्हाणे यांचे निधन

 शिर्डी लाइव्ह:- कोपरगाव तालुक्यातील अंजनापुर येथईल एकनाथ विठ्ठल गव्हाणे (वय-५८) यांचे नुकतेच निधन झाले असुन त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातंवडे असा परीवार आहे. दत्तात्रय गव्हाणे, राजेंद्र गव्हाणे व वैशाली गोडगे यांचे ते वडील होते. 

Thursday 27 September 2018

गोपाजी बाबा पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

पतसंस्थेला १७ लाखांचा नफा 
संस्थेकडे ४ कोटी १५ लाखांच्या ठेवी

शिर्डी लाइव्ह (प्रतिनिधी):-
                                   कोपरगाव तालुक्यातील बहाद्दरपूर येथील सदगुरु गोपाजी बाबा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक २४ सप्टेंबर रोजी संस्थेच्या सभागृहात पार पडली. यावेळी संस्थेचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर म्हाळस्कर यांनी संस्थेच्या कामकाजाची व प्रगतीची माहिती दिली.
                                    त्यांनी सांगितले की संस्थेचे भागभांडवल २६ लाख रुपये असून संस्थेकडे ४ कोटी १५ लाख रुपयांच्या ठेवी आहेत. तर संस्थेने ३ कोटी रुपयांचे कर्ज वितरण केले आहे. संस्थेला १७ लाख २४ हजार रुपयांचा नफा झाला आहे. तर संस्थेकडे ६ लाख ६९ हजार रुपयांचा राखीव निधी आहे. संस्थेने १ कोटी ७० लाखांची गुंतवणूक केली आहे. सभासदांना १३ टक्के दराने लाभांश जाहीर करण्यात आला. यावेळी संस्थेचे चेअरमन भागवत दामू रहाणे, उपाध्यक्ष विजय रहाणे, संचालक रामदास कारभारी रहाणे, मीननाथ पंढरीनाथ जोंधळे, बाळासाहेब सावळेराम रहाणे, भास्करराव चंदूजी थोरात, भाऊसाहेब सीताराम थोरात, रामचंद्र कारभारी पवार, सौ. सुनीता मछिंद्र पाचोरे, सुनीता बाबासाहेब खकाळे, पाराजी कचेश्वर पाचोरे, चंद्रशेखर भास्करराव रहाणे, चंद्रकांत कचरू पोकळे, सुरेश चांगदेव पाडेकर, चंद्रशेखर चंदूजी रहाणे हे सर्व संचालक तर संस्थेचे सभासद, हितचिंतक, कर्जदार, ठेवीदार तसेच संस्थेचे कर्मचारी, पिग्मी एजंट उपस्थित होते. उपस्थित सर्वांचे आभार विजय वारुबा रहाणे यांनी मानले.

Thursday 20 September 2018

भीमबाई शिंदे यांचे निधन


भीमबाई शिंदे यांचे निधन
रांजणगाव देशमुख(वार्ताहर):-
                                                कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथील भीमबाई विठ्ठल शिंदे (वय९०) यांचे नुकतेच निधन झाले .त्यांच्या पश्चात पाच मुले, तीन मुली, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. सेवानिवृत्त केंद्रप्रमुख साहेबराव शिंदे, रामनाथ शिंदे, किराणा व्यापारी चंद्रभान शिंदे, रघुनाथ शिंदे, संजय शिंदे यांच्या त्या मातोश्री होत. 

Friday 14 September 2018

साई एज्युकेशन इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये 'श्रीं' ची स्थापना



शिर्डी लाईव्ह (प्रतिनिधी):- 

                                         गुरुवार दिनांक १३ रोजी सर्वत्रच गणेशाचे उत्साहात आगमन झाले. कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथील साई एज्युकेशन इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये गणेशाची स्थापना करण्यात आली. यासाठी गेल्या दोन दिवसापासून विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी यांनी परीश्रम घेऊन पुर्ण गणपतीची सजावट, रोषणाई, रांगोळी ही सर्व तयारी केली. गणेश मूर्ती स्थापनेच्या वेळी साई फाऊंडेशन रांजणगाव देशमुख चे अध्यक्ष संजय गोडॅ, उपसरपंच बाबासाहेब गोडॅ, वि.का.सोसायटी चे संचालक प्रकाश गोडॅ, कुणाल देशमुख, मा. पोलिस पाटील निवृत्ती गोडॅ, साई फाऊंडेशन चे संचालक कैलास गोडॅ, योगेश चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी गणपतीची आरती माजी पोलिस पाटील निवृत्ती गोडॅ यांच्या हस्ते करण्यात आली.   




Tuesday 11 September 2018

रांजणगाव देशमुख येथे आ. कोल्हे यांच्या हस्ते ग्रामपंचायत इमारतीचे भुमीपुजन


रांजणगाव देशमुख(वार्ताहर):-
                                               प्रत्येक गाव समृध्द झाले पाहीजे.त्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहेशेतकरी हीताचे निर्णय होत आहे.शेतक-यांच्या प्रश्नासाठी मी सातत्याने प्रयत्न करत आहे.ज्यांना कामच करायचे नाही अशी टिका करण्यात धन्याता मानतात पण मला अनेक कामे मार्गी लावता आली व अजुनही अनेक कामे मार्गी लावणार आहे असल्याचे प्रतिपादन आ.स्नेहलता कोल्हे यांनी केले

                                    त्या कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथे चौदावा वित्त आयोग व जनसुविधा योजनेअंतर्गत बांदण्यात येणा-या 14 लाख रुपये खर्चाच्या ग्रामपंचायत इमारतीच्या भुमीपुजन प्रसंगी बोलत होत्या अध्य़क्षस्थानी निवृत्ती गोर्डे होते.यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष शरद शोरात,युवा मोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब पानगव्हाणे,साईनाथ रोहमारे,बापुसाहेब औताडे,कैलास रहाणे,विक्रम पाचोरे,सरपंच संदिप रणधिर,उपसरपंच बाबासाहेब गोर्डे, पोलीस पाटील राजेंद्र शेटे आदि प्रमुख यावेळी उपस्थीत होतेयावेळी दलीतवस्ती स्मशानभुमीतील शेडचे भुमीपुजनही करण्याता आले.

                                      यावेळी बोलतांना आ.कोल्हे पुढे म्हणाल्या की,मतदार संघातील अनेक प्रश्न प्रलंबित होते.सातत्याने पाठपुरावा करुन ही प्रश्न मार्गी लागत आहे.या परिसरातील पाणी योजनेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाशी लवकरच बैठक घेणार आहे.निळवंडे धरणाच्या बाबतीत काही जण ज्यांना या कामाचे काही देणेघेणे अशी मंडळी लोकामध्ये चुकीची माहीती सांगत आहे मात्र निळवंडेच्या या भागातील पाण्याला कोणताही धक्का लागणार नाही.शेतक-यांची प्रश्न सरकारकडुन सोडवुन घ्यावे लागतात त्यासाठी पाठपुरावा करावा लागतो.शेवटच्या घटकापर्यंत सरकारच्या योजना पोहचल्या पाहीजे हे काम आम्ही करत आहोत.
                                 यावेळी सोसायटीचे अध्यक्ष ज्ञानदेव चव्हाणवाल्मीक कांडेकरविस्तार आधिकारी माळीग्रामविकास आधिकारी शेखबाळासाहेब गोर्डेप्रकाश गोर्डेसचिन खालकररामनाथ सहाणेभाउसाहेब खालकररावसाहेब गोर्डेभारत वर्पेत्र्यंबक वर्पेअरुण वर्पेहरीभाउ गुडघेसुभान संय्यद ,अशोक विघेसुभाष वर्पेतुषार काथे आदिसह ग्रामस्थ उपस्थीत होतेप्रास्ताविक सरपंच संदिप रणधिर यांनी केले.सुत्रसंचालन व आभार रावासाहेब गोर्डे यांनी मानले.
...........................................

फोटोओळी-  कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथे ग्रामपंचायत इमारतीचे भुमीपुजनाप्रसंगी आ.स्नेहलता कोल्हेशरद थोरात,साईनाथ रोहमारे व ग्रामस्थ. 

Sunday 9 September 2018

वाळकी येथे शिक्षकांचा निरोप समारंभ


वाळकी येथे शिक्षकांचा निरोप समारंभ
रांजणगाव देशमुख(वार्ताहर):-
                                विद्यार्थी हेच दैवत मानले तर आयुष्यात काहीच कमी पडत नाही संस्कार करताना आपल्या कुटुंब आणि मुलांवरही संस्कार होत असतात. असे प्रतिपादन १० वर्ष्यांच्या सेवेनंतर वाळकी येथून बदली झालेले शिक्षक बाळासाहेब घाडगे यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केले.
                               कोपरगाव तालुक्यातील वेस गावाच्या शेजारील राहता तालुक्यातील वाळकी येथे बदली झालेल्या शिक्षकांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षक बँकेचे संचालक बाबा खरात, वाळकीच्या सरपंच संध्याराणी शिरोळे, व्यवस्थापन समिती अध्यक्ष भारत शिरोळे, माजी सरपंच संपतराव शिरोळे, गनीभाई शेख, तंटामुक्त समितीचे प्रकाश दिघे, पोलीस पाटील शामराव शिरोळे, शामदभाई शेख, उपसरपंच हमीदा शेख, गोरक्षनाथ शिरोळे, युनूस शेख, भाऊसाहेब शिंदे, आदी मान्यवर उपस्थित होते.
                             यावेळी गौरवपत्र, शाल, श्रीफळ देऊन बदली झालेल्या राजेंद्र ठाणगे, बाबा गायकवाड, उर्मिला ब्राम्हणे, दिलीप बोरुडे, या शिक्षकांना गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीताराम गव्हाणे, यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक शिवाजी सोनवणे, राजेंद्र दुशिंग,  राजू भालेराव, संदीप हांडे, शांताराम भोसले, संजय वाघमारे आदींनी परिश्रम घेतले.
(फोटो ओळी- वाळकी येथे बदली झालेल्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.) 

Tuesday 28 August 2018

रांजणगाव देशमुख येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन


शिर्डी लाईव्ह- प्रतिनिधी :-
                                पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांची जयंती संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. याच शेतकरी दिनाचे औचित्य साधून कोपरगाव तालुक्यात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
                    कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथेही तालुक्याच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजना, पिकांवरील कीड नियंत्रण, तसेच कापसावरील बोंड अळी नियंत्रणासाठी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात सरपंच संदीप रणधीर, उपसरपंच बाबासाहेब गोर्डे, ग्रामविकास अधिकारी शेख, कृषी सहाय्यक किरण शिंदे, ग्रामपंचायत सदस्य, चंद्रभान शिंदे, चंद्रभान गोर्डे, वीरेंद्र वर्पे, प्रकाश गोर्डे, हरिभाऊ गुडघे, अजित गुडघे, नितीन गोर्डे, भाऊसाहेब गोर्डे, सुनील गोर्डे, अरुण वर्पे, रावसाहेब ठोंबरे, भाऊसाहेब पवार आदि शेतकरी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमानंतर प्रत्यक्ष कपाशीच्या शेतात जाऊन कृषी सहाय्यक किरण शिंदे यांनी शेतकऱ्यांना फेरोमन ट्रॅप लावण्याचे व बोंड अळी नियंत्रणासाठी मार्गदर्शन केले.



फोटो - कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथे डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. 



Sunday 26 August 2018

बहादरपुर मध्ये गोपाजी बाबांचा यात्रोत्सव सुरु ; विविध कार्यक्रमांचे आयोजन


रांजणगाव देशमुख(वार्ताहर);-
                                कोपरगाव तालुक्यातील बहाद्दरपूर येथे दि. २६ पासून श्री संत सद्गुरू गोपाजी बाबांचा यात्रोत्सव सुरु झाला असून वर्षी रविवार दि २६ ऑगस्ट ते २८ ऑगस्ट या कालावधीत  यात्रोत्सव पार पडणार आहे. रविवार दि २६ रोजी  रोजी सायंकाळी  सदगुरु गोपाजी बाबांच्या रथाची भव्य मिरवणुक तसेच शोभेच्या दारूच्या आतषबाजीचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी १० वाजता भव्य लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले असून सोमवार दि २७ रोजी पहाटे ४ ते ६ बाबांच्या  समाधीचे पुजन व अभिषेक सोहळा तसेच सकाळी १० ते १२ भव्य गंगाजल कावड मिरवणुक व दुपारी २ ते ६ महाराष्ट्रातील नामांकित कुस्तीपटूंचा कुस्त्यांचा हगामा असे कार्यक्रम होणार आहेत. परीसरातील भाविकांनी या उत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन बहादरपुर यात्रा कमिटी व बहादरपुर ग्रामास्थांनी केले आहेत. बहाद्दरपूर येथे तळिक्यातून तसेच तालुक्याच्या बाहेरूनही गोपाजी बाबांचे भक्त दर्शनासाठी व नवस पूर्ण करण्यासाठी येत असतात. 

जीव आणि ब्रम्हाचे ऐक्य म्हणजे काला- ढोक महाराज


रांजणगाव देशमुख येथे अखंड हरीनाम सप्ताहाची सांगता
रांजणगाव देशमुख(वार्ताहर) :-
                                            देव, भक्त व नाम यांचे एकत्रीकरण आहे म्हणुन काला आहे. काला म्हणजे जिव आणी ब्रम्हाचे एेक्य आणी विकारहीत अंतकरण म्हणजे वाळवंट. सर्व काले वाळवंटातच झाले. असा काला फक्त महाराट्रातच आहे. स्वर्गातही असा काला नाही. असे प्रतिपादन रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांनी केले.
ते कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथे अखंड हरीनाम सप्ताहाच्या काल्याच्या किर्तनात बोलत होते. ढोक महाराज पुढे म्हणाले की, ज्ञान, कर्म, योग हे मार्ग सामन्य माणसाला आचरणात आणणे आवघड आहे. त्यामधील सुक्ष्म चुक सुध्दा पापाला कारण होते.थोड्याशा भक्तीनेही शंकर प्रसन्न होतात. विष्णुभक्त श्रीमंत नसला तरी नामाने तारुण नेण्याचे सामर्थ्य त्यांच्यात आहे. महाराष्ट्रातील संत परंपरा मोठी आहे. त्यांचा राष्ट्रविकासातील वाटा अतिशय मोलाचा आहे. माणसाच्या जीवनातीच येरझार शांबवुन ईश्वराच्या रुपात विलीन होऊ शकतो. मानवी जिवनाचा उद्धार करण्यासाठी भक्तीसारखा सोपा मार्ग नाही.
                                 २०२० साली जोग महाराजांच्या शताब्दीनिमित्त रांजणगाव देशमुख येथे रामायाणासह मोठा सप्ताह करण्याचे यावेळी ढोक महाराज यांनी जाहीर केले. व त्या वर्षाची एक स्मरणीका काढणार असल्याचेही महाराजांनी यावेळी सांगितले. यावेळी आ.स्नेहलता कोल्हे, प्रवरा मेडीकल ट्रस्टचे राजेंद्र विखे पाटील यांनी भेट दिली. युवकांनी खुलताबाद येथील भद्रा मारुती देवस्थान येथुन ज्योत आणली. महाप्रसादने सप्ताहाची सांगता झाली. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थीत होते. तरुणांनी महाप्रसाद वाढण्याचे नियोजन चांगल्या प्रकारे केले होते.


...........................................
फोटोओळी- कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथे अखंड हरीनाम सप्ताह निमीत्त जमलेले भाविक व ढोक हाराज. (छाया-किशोर शिंदे)

Thursday 16 August 2018

रांजणगाव देशमुख येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात ; लेझीम पथकाने वेधले लक्ष


शिर्डी लाईव्ह (प्रतिनिधी):-

                          कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी ७:३० वाजता गावातील जय हनुमान विद्यालयातील ध्वजारोहण झाले. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांची प्रभात फेरी निघाली. भारत माता कि जय वंदे मातरम च्या जय घोषाने गाव दणाणून गेले होते. गावातील लहान थोरांमधील उत्साह अवर्णनीय होता. प्रभात फेरीनंतर गावातील ग्रामपंचायत व सोसायटीचे ध्वजारोहण पार पडले. त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित कार्यक्रमात मागील वर्षीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षिसे देऊन गौरव करण्यात आला. तसेच यावेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.


                         यावेळी ग्रामविकास अधिकारी शेख, सरपंच संदीप रणधीर, उपसरपंच बाबासाहेब गोर्डे, माजी पोलीस पाटील निवृत्ती गोर्डे, पोलिस पाटिल राजेंद्र शेटे ग्रामपंचायत सदस्य, तलाठी जी पी कांगणे, मुख्याध्यापक अशोक दिघे सर, अमर बोगा, विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्त मोठ्या संख्येने हजर होते. सूत्रसंचालन गवळी सर व कदम सर यांनी केले.


- यावेळी जय हनुमान विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लेझीम पथक तयार करून मनोरा, मयूर, दहीहंडी अशा प्रकारात लेझीम नृत्य सादर केले. यावेळी ग्रामस्थांनी शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. लेझीम पथकाला संजय वर्पे सर यांनी मार्गदर्शन केले.








फोटो - रांजणगाव देशमुख येथे आयोजित स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात जय हनुमान विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लेझीम पथक तयार करून गावातून संचलन केले. 

Monday 13 August 2018

पंचमीपासून रांजणगाव देशमुख येथे भागवत सप्ताहाचे आयोजन


शिर्डी लाइव्ह, प्रतिनिधी:- 
                                    कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथे रामायणाचार्य ह भ प रामराव महाराज ढोक नागपूर यांच्या प्रेरणेने तसेच ह भ प बबन महाराज गव्हाणे व ह भ प अशोक महाराज क्षीरसागर अमरावती, बबन महाराज गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली दि १५ ऑगस्ट ते  २३ ऑगस्ट या दरम्यान अखंड हरिनाम भागवत सप्ताहाचे आयोजन कारण्यात आले आहे. 
                                     या सप्ताहात दि.१५ रोजी हभप माउली महाराज आळंदी, दि. १६ हभप दिगंबर महाराज किरकाडे दि. १७  हभप पांडुरंग महाराज गिरी दि. १८  हभप  विकास महाराज गायकवाड, दि. १९ हभप शिवाजी महाराज देशमुख, दि. २० हभप उद्धव महाराज मंडलिक, दि. २१ हभप अशोक महाराज क्षीरसागर, दि. २२ ह भ प रामराव महाराज ढोक व दि. २३ रोजी  ह भ प रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांचे काल्याचे कीर्तन होणार आहेत. सप्ताह काळात सकाळी ४ ते ६ काकडा, ६ ते ११ ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी ३ ते ४ भजन, सायंकाळी ५ ते ६ ज्ञानेश्वर प्रवचन, सायंकाळी ६ ते ७ हरीपाठ, रात्री ९ ते ११ कीर्तन व नंतर हरिजागर असे कार्यक्रम असणार आहेत. दि २३ ऑगस्ट रोजी सप्ताहाची सांगता होणार असून सकाळी कीर्तनानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. या सप्ताहात गावातील तसेच नोकरी व्यवसायानिमित्त बाहेर असलेले सर्वच ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात. समारोपाच्या दिवशी काकडा पेटवण्यासाठी भद्रा मारोती खुलताबाद येथून दरवर्षी मशाल आणली जाते या मशालीचे हे १३ वे वर्ष आहे. या कार्यक्रमाचा परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा असे रांजणगाव देशमुख ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात आले आहे.


फोटो- श्री. क्षेत्र हनुमान देवस्थान रांजणगाव देशमुख 

Tuesday 7 August 2018

निळवंडेचे बंदिस्त कालवे अशक्य ; पारंपरिक व भूमीगत कालव्यातील तफावत अकराशे कोटींची



शिर्डी लाइव्ह (प्रतिनिधी):-
                         निळवंडे प्रकल्पाच्या अकोले तालुक्यातील कालव्यांबाबत अनेकदा संभ्रमाचे वातावरण निर्माण करण्यात येत आहे. मात्र यातील वास्तव वेगळे आहे. पारंपरिक कालवे व भूमीगत कालवे यातील फरक हा अंदाजे अकराशे कोटींचा असणार आहे. त्यामुळे ते सद्य स्थितीत कोणत्याही सरकारला परवाडणारे नाही. त्यामुळे याबाबत काही लोकप्रतिनिधींकडून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यात येत आहे. त्यामुळे वस्तुस्थितीचा विचार करून शेतकऱ्यांनी या भूलथापांना व राजकीय घोषणांना बळी पडू नये असे आवाहन निळवंडे पाटपाणी कृती समीतीने केले आहे.

                         अकोले तालुक्यातील उजव्या कालव्यासाठी १ ते १८ कि. मी साठी फक्त ५६.६६ कोटी रूपये लागणार आहे. तेच बंदिस्त करण्यासाठी ३५० कोटी रूपये लागणार आहे. डाव्या कालव्यासाठी पारंपरिक पद्धतीने १३२.१७ कोटी लागणार आहे तो वाढून बंदिस्तसाठी ९८० कोटी रुपये अपेक्षित आहे. म्हणजे पारंपरिकसाठी अवघे १८८.८३ कोटी लागणार आहे. तर ते बंदिस्तसाठी १३३० कोटी रुपये लागणार आहे. म्हणजे दोन्हीतील फरक ११४१ कोटींचा आहे. एवढा वाढीव खर्च करणे कोणत्याही सरकारला परवडणारे किंवा ते व्यवहार्य नाही.

                        बंदिस्त कालव्यांबाबत शासनाचे धोरण नक्कीच आहे. संबधीत धोरणानुसार शासनाने २ फेब्रुवारी २०१८ रोजी एक जीआर काढला आहे. त्यानुसार ज्या प्रकल्पांचे पारंपरिक वितरण प्रणाली धरून भूसंपादन झालेले आहे अशा ठिकाणी नलिका वितरणाचा विचार करू नये असे स्पष्ट नमुद करण्यात आले आहे. शासनाच्या मुख्य धोरणानुसार नलिका वितरण प्रणाली ही जमीन वाचवण्यासाठी नसून ते पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आहे हे लक्षात घेतले पाहिजे. शिवाय बंदिस्त पाईपलाईन प्रणालीमध्ये कोणत्याही प्रकारची जमीन वाचत नाही. जमीन तेवढीच लागते. कारण बंदिस्त पाईपलाईनच्या देखभाल दुरूस्तीसाठी दोन्ही बाजूने रस्ते ठेवले जातात. त्यामुळे यातून जमीन वाचण्याची सुताराम शक्यता नाही. एकदा संपादीत केलेली जमीन शासन परत करत नाही किंवा तसा कायदा नाही. हे सर्व वास्तव सांगण्याचे धाडस एकही राजकीय नेता करत नाही. जे पूर्वी विधानसभेत पारंपरिक पध्दतीने कालवे झाले पाहिजे असे म्हणत होते ते आता बंदिस्त झाले पाहिजे असे म्हणत आहे. वास्तवस्थिती समजल्यावर मान्यवरांना देखील घुमजाव करण्याची वेळ येते. जलसंपदा राज्यमंत्री शिवतारे यांना या प्रसगांतून जावे लागले आहे. नुकतेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ही बाब लक्षात आणून दिल्यावर त्यांनीही राज्याचे जलसंपदा प्रधान सचिव आय. एस. चहल यांना प्रवाही पद्धतीने कालव्यांची कामे करण्याचे आदेश द्यावे लागले. त्यामुळे अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांनी हे सर्व वास्तव समजून घेऊन कालव्यांच्या कामाला विरोध करू नये असे आवाहन निळवंडे पाटपाणी कृती समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वर्पे, गंगाधर गमे, नानासाहेब शेळके, उत्तम घोरपडे, सुखलाल गांगवे, दत्ता भालेराव, राजेंद्र सोनवणे, दादासाहेब पवार, भाऊसाहेब शिंदे, बाळासाहेब रहाणे, सुखदेव खालकर, विठ्ठल घोरपडे, श्रीकांत मापारी यांनी केले आहे.



कालवा 
पारंपरिक खर्च (कोटीत )
बंदिस्त खर्च
(कोटीत ) 
दोन्हीतील  तफावत
( कोटीत )
उजवा कालवा
५६.६६
३५०
२९३.३४
डावा कालवा
१३२.१७
९८०
८४७.८३
एकुण खर्च
१८८.८३
१३३०
११४१.१७ 

Monday 6 August 2018

निळवंडेच्या कालव्यांवर अकोल्यात जून अखेर ४८,२१७ लक्ष रुपयांचा खर्च

 निळवंडेच्या कालव्यांवर अकोल्यात जून अखेर  ४८,२१७ लक्ष रुपयांचा खर्च 



शिर्डी लाइव्ह (प्रतिनिधी)-
                                    उत्तर नगर जिल्ह्यातील सात तालुक्यातील १८२ अवर्षण गावांना वरदान असणाऱ्या निळवंडे धरणावर सन २०१८-१९ मध्ये अकोले तालुक्यातील ६५ हजार ३८९ लक्ष ८७ हजार रुपयांच्या एकूण निविदेपैकी माहे जून अखेर ४८,२१७ लक्ष ४० हजार रुपयांचा खर्च झाला असून प्रस्तावित कामासाठी ८ हजार ८९५ लक्ष १२ हजार रुपये प्रस्तावित असल्याची माहिती निळवंडे कालवा कृती समिती प्रकल्पच्या कालव्यांचे कार्यकारी अभियंता रवींद्र बागुल यांनी  एका माहितीत दिली आहे. 

     उत्तर नगर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, राहता,  कोपरगाव, श्रीरामपूर, राहुरी तालुक्यातील १७६ गावांना तर सिन्नर तालुक्यातील ६ गावांसाठी निळवंडे धरण १९७० साली प्रस्तावित करण्यात आले. या गावांचे ६४ हजार २६० हेक्टरचे आठमाही सिंचन करण्यासाठी ८.३२ टी.एम.सी.चे धरण बांधून आता दहा वर्षाचा कालखंड लोटला आहे मात्र अद्याप या प्रकल्पाचे कालवे बांधण्यात आले नाही. वास्तविक  कुठल्याही धरणाच्या भिंतीचे काम पूर्ण होण्याआधी किमान कालव्यांचे काम पाच वर्ष आधी पूर्ण होणे हा जलसंपदा विभागाच्या प्रकल्प उभारणी नियमानुसार अभिप्रेत असताना अप्पर प्रवरा २ अर्थात निळवंडे प्रकल्पाचा जल  सम्पदा विभागाने राजकीय खोड्यामुळे अपवाद करण्यात आला. त्यामुळे या प्रकल्पास आता ४९ वर्षे पूर्ण होत असतानाही या दुष्काळी शेतकऱ्यांना पिण्यासह शेती सिंचनाचे पाणी मिळालेलं नाही. त्यामुळे या दुष्काळी भागातील शेतकरी आत आत्महत्या करण्यास प्रारंभ झाला आहे. या भागातील राजकीय पार्श्वभूमी लक्षातघेत हे कालवे पूर्ण होण्याची सूतराम शक्यता नसल्याने या विरुद्ध निळवंडे  कालवा कृती समितीने जलसंपदा विभागाच्या भोंगळ कारभाराविरुद्ध लढा उभारला असून केंद्र सरकारकडून निधी मिळविण्यासाठी वेगवर्धित सिंचन प्रकल्पात समावेश होण्यासाठी मुंबई उच्च  न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे दरवाजे ठोठावून वकील अजित काळे यांच्या मार्फत सुप्रमा एस एफ सी व अखेरची  तांत्रिक मान्यता मिळविली आहे.

                                 राज्य सरकारची  गुंतवणूक मान्यता प्रस्तावास मान्यता मिळण्याचे काम अखेरच्या टप्प्प्यात आहे. तथापि विदर्भ मराठवाड्यातील १४ आत्महत्या ग्रस्त जिल्ह्यातील व उर्वरित महाराष्ट्रातील  दुष्काळ ग्रस्त भागातील बांधकामाची सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या विशेष पॅकेज मधील १०७ प्रकल्पामध्ये निळवंडे प्रकल्पाचा समावेश करण्यात आला असुन या प्रकल्पास सन २०१८-१९ साठी १५८ कोटी ८३ लाख रुपयांची आर्थिक तरतुद या प्रकल्पात करण्यात आली आहे. तसेच नाबार्ड ग्रामीण पायाभूत विकास निधी मालिका अंतर्गत सण २०१८-१९ मध्ये उर्ध्व प्रवरा (निळवंडे -२ ) प्रकल्पावरील कालवे बांधकाम डावा कालवा किमी ० ते ३ व उजवा कालवा किमी ० ते ४० साठी रुपये १८९ कोटी ३५ लाख रुपयांना नागपूर येथील जलसंपदाचे मुख्य अभियंता यांनी ७ जुलै २०१८ रोजी मंजुरी प्रदान केली आहे. या वित्तीय वर्षात उपलब्ध निधीतून मुख्य कालवयांसाठी अकोले तालुक्यात जास्तीत जास्त निधी खर्च करण्याचे नियोजन जलसंपदा विभागाने केली आहे. आतापर्यंत उर्ध्व प्रवरा मुख्य डावा कालव्याचे काम ३३ टक्के पूर्ण झाले आहे. तर उजव्या कालव्याचे काम १९ % पूर्ण झाले आहे .

                                   उच्च स्तरीय  कालव्यांसह या प्रकल्पाची सिंचन क्षमता ६८ हजार ८७८ हेक्टर इतकी असून आता पर्यत २५६१ हेक्टर तेवढी सिंचन क्षमता  निर्माण झाल्याची माहिती रवींद्र बागुल यांनी निळवंडे कालवा कृती समितीस एक उत्तरात दिली आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील १८२ गावात समाधानाचे वातावरण पसरले असले तरी अकोले तालुक्यातील भूसंपादन झालेले असल्याने आता कोणी यात जाणीवपूर्वक खोडा  घालू नये असे आवाहनही कालवा कृती समितीचे कार्यकर्ते नानासाहेब जवरे, रुपेंद्र काले ,नानासाहेब गाढवे, मच्छिन्द्र दिघे, संजय गुंजाळ, गंगाधर रहाणे, रमेश दिघे, दत्तात्रय आहेर, संदेश देशमुख, विठ्ठलराव देशमुख, नामदेव दिघे, बाबासाहेब गव्हाणे, माधवराव गव्हाणे, भाऊसाहेब गव्हाणे, सोमनाथ दरंदले , सुनील दिघे, अशोक गांडूळे, संतोष तारगे आदींनी केले आहे.