बहादरपूर येथे अखंड हरिनाम सप्ताहास सुरुवात
भागवत कथेसाठी हजारोंची उपस्थिती
रांजणगाव देशमुख(वार्ताहर):-
कोपरगाव तालुक्यातील बहादरपूर येथे बुधवार दि.२७ पासून सुवर्ण महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताह व भागवत कथा सोहळ्याला सुरुवात झाली यावेळी ग्रामास्तांमध्ये मोठा उत्साह होता.
कोपरगाव तालुक्यातील बहादरपुर येथे बुधवार पासून सुवर्ण महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताह व भागवत कथा सोहळ्याला सुरुवात झाली. सकाळी गावातुन नंदी, कासव, पिंड व गोपाजीबांबांची मुर्ती यांची गावातुन सवाद्य मिरवुणुक काढण्यात आली होती.या मिरवणुकित अनेकांनी फुगडी खेळुन आनंद व्यक्त केला. दुपारी मंडप पुजन,संत साहित्य पुजन, कथापवक्ते पुजन होउन भागवत कथेला सुरुवात करण्यात आली. मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा तीन दिवस चालणार असून त्यासाठी गावातील जोडपे व पौरोहित्य करण्यासाठी ब्राम्हण आहेत. तसेच श्री संत सदगुरु गोपाजीबाबांच्या बालसंस्कार केंद्राच्या फलकाचे अनावरण स्वामी शिवानंदगीरीजी महाराज यांचे हस्ते करण्यात आले. सकाळी ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. रात्री अमृतदास महाराज जोशी यांचे हरीकिर्तन झाले.भागवत कथेच्या शुभारंभ प्रसंगी स्वामी शिवानंदगीरीजी महाराज म्हणाले की, संजीवन समाधी घेणारे संत सदगुरु गोपाजीबाबा महान संत होते.भागवत कथा म्हणजे साक्षात भगवंतांचे वाडमय आहे.भागवत कथा श्रवणाने जिवन सफल होते. दुपारी २ ते ५ या वेळेत भागवताचार्य ह भ प केशव महाराज उखळीकर यांच्या सुश्राव्य वाणीतून भागवत कथेचे निरुपण होत आहे. या भागवत कथेला पहिल्या दिवपासूनच ठीकठिकाणाहून हजारोंच्या संख्येने भाविकांची उपस्थिती होती. सप्ताह प्रसंगी गावातील रस्त्याच्या दुतर्फा सर्वत्र आकर्षक रांगोळी काढण्यात आलेली होती, घरावर गुढ्या उभारण्यात आलेल्या होत्या, गावात येणा-या जाणाराचे जय हरी म्हणुन होणारे स्वागताने संपुर्ण बहादरपुर नगरी मध्ये भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे, सप्ताह काळात सकाळी व संध्याकाळी प्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहेत. भाविकांना पिण्याच्या पाण्यासाठी थंड पाण्याची सोय करण्यात आलेली आहे. भाविकांच्या गाड्यांसाठी प्रशस्त व सुरक्षित पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे. बसण्यासाठी सप्ताह मंडप अगदी प्रशस्त असून दुपारी भागवत कथेसाठी Fan ची व्यवस्था करण्यात आलेली आहे. संपूर्ण गावात विद्यत रोषणाई करण्यात आलेली आहे. भागवत कथेप्रसगी पांडुरंगगिरीजी महाराज वावीकर, स्वामी शिवानंदगीरीजी महाराज, अरविंद महाराज, बबन महाराज गाडेकर, रामप्रभु महाराज आदिसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थीत होते. संपूर्ण सप्ताहाचे नियोजन बहादरपूर ग्रामस्तानी अत्यंत आधुनिक व अद्ययावत प्रकारे केले आहे.
(फोटो ओळी- कोपरगाव तालुक्यातील बहादरपूर येथे सप्ताहास सुरुवात झाली रात्री अमृतदास महाराज जोशी यांच्या कीर्तनाप्रसंगी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. चौकटीत अमृतदास महाराज जोशी. छाया- विकास गोर्डे, समर्थ फोटो.)