Saturday 30 June 2018

धोंडीराम ठोंबंरे यांचे निधन



रांजणगाव देशमुख(वार्ताहर):
कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथील सामाजिक कार्येकर्ते व प्रगतशील शेतकरी धोंडीराम दत्तु ठोंबरे यांचे वयाच्या ६२ व्या वर्षी आकस्मीत निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तिन मुले, तिन मुली, सुना नातवंडे असा मोठा परीवार आहे.

मारुती गोर्डे यांचे निधन



रांजणगाव देशमुख (वार्ताहर):-
कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथील मारुती रघुनाथ गोर्डे वय ५८ वर्षे यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर रांजणगाव देशमुख येथील अमरधाम येथे शोकाकुल वातावरणात अंत्यंसंस्कार करण्यात आले. त्यांचा दशक्रिया विधी ६ जुलै रोजी रांजणगाव देशमुख येथील पाझर तलाव येथे होणार आहे. यावेळी उद्धव महाराज बिराजदार यांच्या प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आले.

Thursday 28 June 2018

रांजणगाव देशमुख येथे खा लोखंडे यांचा सर्वपक्षीय सत्कार ; 'निळवंडे' ला केंद्रिय जलआयोगाची मान्यता


राजणगाव देशमुख ( वार्ताहर):-

खा लोखंडें यांनी निळवंडेसाठी कृती समितीच्या मदतीने केद्रातुन २२३२ कोटी खर्चाला मान्यता आणल्यामुळे त्यांचा रांजणगाव देशमुख ग्रामस्थांच्या वतीने भव्य सर्वपक्षीय नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुंजा खालकर हे होते.

केंद्रिय जलआयोगाची मान्यता मिळाल्यामुळे रविवारी खा लोखंडे व निळवंडे पाटपाणी कृती समितीचा कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथे भव्य सर्वपक्षीय सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना खा लोखंडे म्हणाले की, २०१४ च्या निवडणुकीच्या वेळी मला लोकांनी गावात येण्यास अडवले. परंतू आता तुम्ही स्वतःहुन मला सत्कारासाठी आमंत्रीत केले. निळवंडेचा प्रश्न आता पुर्णपणे सुटला असुन कालव्यांची कामे सुरु झाली आहेत. आपल्या शेतात दिड वर्षाच्या आत पाणी येणार आहे. साईबाबांचा नावाने व जलआयोगाच्या अधिका-यांच्या मदतीने आपला प्रश्न मिटला आहे. यावेळी निळवंडे पाटपाणी कृती समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वर्पे, गंगाधर गमे, सुकलाल गांगवे आदींचे भाषने झाली. यावेळी खा लोखंडेंसह समितीच्या पदाधीका-यांचाही सत्कार करण्यात आला.

यावेळी पंचायत समिती सदस्य सौ. इल्हे मॅडम, सरपंच संदीप रणधीर माजी पोलीस पाटील निवृत्ती गोर्डे, माजी सरपंच अत्याभाऊ वर्पे, अनिल खालकर, संपत खालकर, सोमनाथ खालकर, गजानन मते, योगेश चव्हाण, सचिन खालकर, रावसाहेब गोर्डे, दत्ता भालेराव, पराग खंडीझोड, श्रीकांत मापारी, अरुण ठोंबरे, धनंजय वर्पे, संजय गोर्डे, ज्ञानदेव चव्हाण, तुषार काथे, शिवाजी वामन, बाळासाहेब घोरपडे, उत्तम घोरपडे, बाळासाहेब धाकतोडे, विक्रम ठोंबरे आदी मान्यवरांसह ग्रामस्थ मोट्या संख्येने उपस्थित होते.

Wednesday 27 June 2018

यमुनाबाई देशमुख यांचे निधन


रांजणगाव देशमुख(वार्ताहर):-
कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथील यमुनाबाई लक्ष्मणराव देशमुख वय १०४ वर्षे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी नातू पणतू असा मोठा परिवार आहे. रांजणगाव देशमुख नानासाहेब व रावसाहेब देशमुख यांच्या त्या मातोश्री होत. त्यांचा दशक्रिया विधी शनिवार दिनांक ३० जून रोजी सकाळी ९ वाजता देशमुख वस्ती येथे होणार आहे.

Saturday 23 June 2018

जय हनुमान विद्यालयात योग दिन उत्साहात ; योग शिक्षक वर्पे सर यांच्याकडून योगाचे धडे


रांजणगाव देशमुख(प्रतिनिधी):-
योग ही भारताची प्राचीन संकल्पना असून समस्त जगाला भारत देशाने योग दिला आहे. २१ जून हा दिवस गेल्या ४ वर्षांपासून आंतराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने देशभरात सर्वच ठिकाणी हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख सह परिसरातील सर्वच गावांमध्ये योग दिन उत्साहात व मोठ्या जोशात साजरा करण्यात आला. रांजणगाव देशमुख येथील जय हनुमान विद्यालयात सकाळी योग दिन साजरा करण्यात आला. योग शिक्षक वर्पे सर यांनी विद्यार्थ्यांना सुमारे अडीच तास योगाचे धडे दिले. मुख्याध्यापक दिघे सर यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्व समजून सांगितले. सर्वच शिक्षकांनी योगासने केली. यावेळी गमे सर, गवळी सर, कालेवार सर, वाघे सर, कदम सर, महाजन सर, गडाख सर, सौ दिघे मॅडम, सौ गुंजाळ मॅडम, सौ. गुरव मॅडम, आदी शिक्षक व श्री. मुलमुले, भालेराव, रणधीर हे शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
रांजणगाव देशमुख परिसरातील अंजनापूर, जवळके, पोहेगाव, काकडी, मनेगाव, बहाद्दरपूर, वेस या गावांतील जिल्हा परिषदेच्या व माध्यमिक शाळांमध्येही योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

Wednesday 20 June 2018

जवळके विद्यालयाचा ८३ टक्के निकाल ; प्रथम तीनही क्रमांकावर मुलींची बाजी


रांजणगाव देशमुख (वार्ताहर)- कोपरगाव तालुक्यातील जवळके येथील शेतकरी माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल ८३.१७ टक्के लागला असुन अपेक्षा अण्णासाहेब गव्हाणे या विद्यार्थिनीने ९२.६० टक्के गुण मिळवुन प्रथम तर आरती भागवत रहाणे हिने ९१.६० टक्के व्दितीय तर विजया लहाणु गव्हाणे हिने ९०.४० टक्के गुण मिळवुन तृतिय क्रमांक मिळाला. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे मुख्याध्यापक पाचोरे आर.आर. व वेस-सोयगावाचे सरपंच माणिकराव दिघे, जवळके चे सरपंच बाबुराव थोरात, बहादरबादचे सरपंच विक्रम पाचोरे, अंजनापूरचे सरपंच ज्ञानेशवर गव्हाणे व बहाद्दरपूरच्या सरपंच सौ.सुनिता रहाणे आदी मान्यवरांनीअभिनंदन केले.

शालेय जीवन हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्वाचा टप्पा- माणिकराव दिघे


रांजणगाव देशमुख (वार्ताहार):- शिक्षण हे समाज विकासाचे व परिवर्तनाचे महत्वाचे माध्यम असुन आजचे विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहे. तसेच शालेय जीवन हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील सर्वांत महत्वाचा टप्पा आहे. असे प्रतिपादन कोपरगाव तालुक्यातील वेस- सोयगाव चे प्रथम लोकनियुक्त सरपंच माणिकराव दिघे यांनी केले. ते वेस येथे आयोजित सांस्कृतिक कार्यक्राम व बक्षिस वितरण सोहळ्याच्या प्रसंगी बोलत होते. यावेळी विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काशिनाथ खंडीझोड हे होते. सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी जेष्ठ नेते भागवत खंडीझोड, रावसाहेब भडांगे, भाऊसाहेब खंडीझोड, कचेश्वर खंडीझोड, सचिन खंडीझोड, नारायण खंडीझोड, सिताराम खंडीझोड, राहुल खंडीझोड, प्रविण खंडीझोड, सुरेश खंडीझोड, सुकदेव पवार गणेश गुंजाळ, नितीन खंडीझोड, बाबासाहेब खंडीझोड, कोंडीराम खंडीझोड, प्रभाकर खंडीझोड, अनिल खंडीझोड, मंगल खंडीझोड, सुमनबाई खंडीझोड, बापु खंडीझोड आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सचिन खंडीझोड व आभार नायायण खंडीझोड यांनी मानले.

Monday 18 June 2018

साई फाउंडेशन च्या साई एज्युकेशन इंग्लिश मेडियम स्कूल चे उद्घाटन


रांजणगाव देशमुख(वार्ताहर):- दोन जिल्ह्यांच्या सीमेवर सुरु होत असलेल्या साई फाउंडेशन च्या साई एज्युकेशन इंग्लिश मेडियम स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा उदघाटनाचा दिमाखदार सोहळा नुकताच कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथे पार पडला. या सोहळ्यासाठी हभप रामाराव महाराज ढोक, सुदर्शन न्यूज दिल्ली चे चेअरमन सुरेश चव्हाणके, संजीवनी कारखान्याचे चेअरमण बिपीन कोल्हे, कोपरगाव नगरपालिकेचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष विजय वहाडणे, पोहेगाव पतसंस्थेचे चेअरमन नितीन औताडे, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब रहाणे, सरपंच संदीप रणधीर, माजी पोलीस पाटील निवृत्ती गोर्डे, उपसरपंच बाबासाहेब गोर्डे आदींसह मान्यवर मोठ्या संख्येने हजर होते. यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, जगामध्ये नवीन तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी इंग्रजीतून शिक्षण घेणे गरजेचे झाले असून यासाठी संजय गोर्डे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी माध्यमाची शाळा सुरु करून विद्यार्थ्यांना मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. ही शाळा भविष्यात नव नवीन संधी उपलब्ध करून देईल. या प्रसंगी गोर्डे यांच्या परिवारातील सुरेश गोर्डे, अशोक गोर्डे, कैलास गोर्डे, प्रकाश गोर्डे, गंगाधर गोर्डे, गोरक गोर्डे, बाबासाहेब सोपान गोर्डे, दीपक गोर्डे, पुंजाबाई गोर्डे आदींसह परिवारातील सदस्यांसह ग्रामस्थ मोठय संख्येने हजर होते. यावेळी सूत्रसंचालन धनंजय वर्पे यांनी केले तर आभार संजय गोर्डे यानी मानले.

Thursday 14 June 2018

जवळके येथे जिल्हा बँकेकडून एटीम सेवा सुरु ; ग्राहकांची सोय होणार ; वेळही वाचणार


रांजणगाव देशमुख(वार्ताहर):- कोपरगाव तालुक्यातील जवळके येथे ग्रामीण भागातील नागरिकांच्या सेवेसाठी जिल्हा बँकेने ए टी एम मशीन सुरु केले आहे. भविष्यात हे ए टी एम ग्राहकांना चांगली सेवा देईल अशी ग्वाही बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. दि.अहमदनगर डिस्टिक्ट सेंटल को- ऑप बँक .लि अहमदनगर च्या जवळके शाखेचे ए.टी.एम चे उद्घाटन जिल्हा बँक विकास अधिकारी कैलासराव गवळी यांचा हस्ते करण्यात आले. या एटीम सेवेमुळे ग्राहकांना बँकेतून पैसे काढण्यासाठी लागणारा मोठा वेळ वाचणार असून ग्राहकांची मोठी सोय होणार आहे. जवळके परिसरात रांजणगाव देशमुख, अंजनापूर, बहाद्दरपूर, धोंडेवाडी, वेस, सोयगाव, काकडी, मनेगाव आदी मोठी गावे असून या सर्वच गावांमध्ये एकही राष्ट्रीयकृत बँक नसून बँकेच्या कामासाठी नागरिकांना तालुक्याच्या गावाला जावे लागते त्यामुळे नागरिकांचा वेळ व पैसे दोन्ही खर्च होतात. परिसरात एक राष्ट्रीयकृत बँक सुरु व्हावी अशी म्हणी गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांमधून होत आहे. सदर प्रसंगी जवळके गावचे सरपंच बाबुराव थोरात, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब रहाणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती नानासाहेब गव्हाणे, पोलीस पाटील सुधीर थोरात, माजी सरपंच बंडोपंत थोरात, जेष्ठ नेते लक्ष्मण थोरात, माजी सरपंच कैलास रहाणे, माजी उपसरपंच आण्णासाहेब भोसले, जवळके शाखेचे सर्व अधिकारी व कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते अवेळी आभार जिल्हा बँकेचे जवळकेचे शाखा अधिकारी आहेर व औताडे यांनी मानले. (फोटो ओळी- जवळके ता. कोपरगाव येथे जिल्हा बँकेच्या वतीने एटीएम सुरु करण्यात आले. छाया- विकास गोर्डे)

डॉ. कोल्हे यांना 'बेस्ट आर्टीफिशियल टेक्निशियन' पुरस्कार प्रदान; दिल्ली येथे कृषी मंत्री राधामोहन सिंग यांच्या हस्ते वितरण


रांजणगाव देशमुख (प्रतिनिधी):- कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील गोदावरी दूध संघाचे कृत्रिम रेतन तंत्रज्ञ डॉ. बाळासाहेब कोल्हे यांना राष्ट्रीय गोकुळ मिशन भारत सरकार यांच्याकडून देण्यात येणारा 'बेस्ट आर्टीफिशियल टेक्निशियन २०१८' हा पुरस्कार दिल्ली येथे केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या प्रसंगी केंद्रीय कृषी राज्यमंत्री तसेच कोपरगाव तालुक्यातील पशुधन विकास अधिकारी डॉ. दिलीप दहे, दिलीप जामदार, डॉ. अजयनाथ थोरे हे उपस्थित होते. दरम्यान हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा पोहेगाव येथे सत्कार करण्यात आला. यावेळी काळे कारखान्याचे संचालक सुनील शिंदे, राहुल रोहमारे, राजेंद्र जगन्नाथ औताडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत डॉ. कोल्हे यांचे अभिनंदन केले. सादर प्रसंगी नितीन नवले, रावसाहेब औताडे, सोमनाथ वाके, संजय औताडे, विठ्ठल जावळे, गणेश औताडे, गंगाराम औताडे, संजय भालेराव, सुजय जगताप, कैलास जाधव आदि उपस्थित होते.

Wednesday 13 June 2018

पोहेगाव केंद्रात जय हनुमान विद्यालय पहिले ; विद्यालयाचा ९६ टक्के निकाल


रांजणगाव देशमुख(प्रतिनिधी):- कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथील जय हनुमान विद्यालयातील इयत्ता दहावीचा निकाल ९५.५२ टक्के लागला असून विद्यालयाने पोहेगाव केंद्रामध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे. विद्यालयात सोनाली दिलीप गांगवे व आश्विनी सोमनाथ खालकर या दोन विद्यार्थींनीनी ९४.२० टक्के सारखेच गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर दिपाली रमेश गांगवे या विद्यार्थिनीने ८८ टक्के गुण मिळवून द्वितीय तर विजया प्रकाश कालेवार या विद्यार्थिनीने ८६.२० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे. सर्व विद्यार्थ्यांना तत्कालीन मुख्याध्यापक रहाणे सर, कालेवार सर आदि शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे सरपंच संदीप रणधीर उपसरपंच बाबासाहेब गोर्डे यांनी अभिनंदन केले आहे.

Tuesday 12 June 2018

काकडी विमानतळाच्या संरक्षक भिंतीला भगदाड ; विमानतळावर दुर्घटनांची मालिका


रांजणगाव देशमुख- प्रतिनिधी:- साईभक्ताच्या सोयीसाठी कोपरगाव तालुक्यातील काकडी येथे असलेल्या साईबाबा आंतराष्टीय विमानतळाच्या संरक्षक भिंतीला शनिवारी मोठे भगदाड पडले आहे. हे भगदाड विमानतळाच्या दक्षिणेला वडझरीच्या बाजुने पडले आहे. सातत्याने वेगवेगळ्या दुर्घटना या विमानतळाच्या परिसरात घडत आहे. यामुळे विमानतळाच्या सुरक्षेचे प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. शुक्रवारी ८ तारखेला वादळाने प्रवाशी आगमन कक्षाच्या काचा फुटुन मोठे नुकसान होते. त्या पावसाच्या ओलाव्यामुळेच ही सरक्षक भिंत खचुन तिला भगदाड पडल्याचा अंदाज आहे. या सरक्षक भिंतीचे काम सुरु आसतांना काकडीतील ग्रामस्थांनी काम निकृष्ठ प्रतिचे सुरु असल्याचे विमानतळ विकास प्राधिकरणचे तत्कालीन उपाध्यक्ष विश्वास पाटील यांच्या निदर्शनास आनुन दिले होते. शेवटी विमानतळाचे उदघाटनाला वर्ष उलटण्याच्या आतच ही भिंत पडण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून विमानतळावर अनेक घटना घडत असून यामध्ये तेथे भंडारगृहाला लागलेली आग, विमनातळावर घुसलेले कुत्रे, विमान धावपट्टीवरून घसरणे, वादळामध्ये विमानाच्या काचा फुटणे या सर्व घटना पाहता विमानतळावर संकटांची मालिकाच सुरु आहे. यामुळे साईभक्तांची मोठी गैरसोय होत आहे.

वेस येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ; विक्रीकर निरीक्षक जोंधळे यांची उपस्थिती


रांजणगाव देशमुख (वार्ताहार):- कोपरगाव तालुक्यातील वेस-सोयगाव येथील दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच नुकतीच बहादराबाद येथील विक्रीकर निरिक्षक पदी निवड झालेले सागर मिनीनाथ जोंधळे यांचाही सत्कार करण्यात आला. वेस-सोयगाव चे प्रथम लोकनियुक्त सरपंच माणिकराव दिघे यांनी आयोजित केलेल्या विद्यार्थ्यांच्या या सत्काराच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वेस गावचे जेष्ठ नेते दत्तु बाबा गोसावी हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणुन नुकतीच विक्रीकर निरिक्षक पदी निवड झालेले सागर मिनीनाथ जोंधळे हे होते. यावेळी वेस-सोयगाव सरपंच आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की ग्रामीण भागातील विद्यार्थी कोणीही शिक्षणापासुन वंचित राहु नये. तसेच पालकांनी आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यायला हवे. तसेच आपल्या भागातील जास्तीत जास्त मुले अधिकारी बनायला हवे. यावेळी कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समीतीचे संचालक सुधाकर गाढवे, उपसरपंच श्री.रामदास भडांगे, सदस्य गोरक्षनाथ माळी, नसीरभाई इनामदार रईसभाई इनामदार, भागवत आण्णा खंडीझोड, मेजर सुभाष गोसावी, दिपक कोल्हे, आप्पासाहेब कोल्हे, आनंदा भडांगे, रावसाहेब भडांगे, शिवाजी शेंडगे, नारायण खंडीझोड, दत्तु गोर्डे आदि ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच पालकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Saturday 9 June 2018

निळवंडे- शिर्डी, कोपरगाव पाइपलाइनला न्यायालयाकडून स्थगिती


निळवंडे- शिर्डी, कोपरगाव पाइपलाइनला न्यायालयाकडून स्थगिती औरंगाबाद खंडपीठाकडून स्थगिती; लाभार्थी शेतकऱ्यांकडून न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत रांजणगाव देशमुख(वार्ताहर):- उत्तर नगर जिल्ह्यातील सात तालुक्यातील अवर्षण ग्रस्त १८२ गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे प्रकल्पातून शिर्डी व कोपरगाव या लाभक्षेत्राच्या बाहेर पाणी देण्याचा प्रयत्न करणाऱ्या राज्य सरकार व लोकप्रतिनिधींना काल मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दणका देत निळवंडे ते शिर्डी, कोपरगाव पाइपलाइनला स्थगिती दिल्याने निळवंडेच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसह निळवंडे कालवा कृती समितीसह शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. याबाबाद सविस्तर वृत्त असे की, निळवंडे उर्फ अप्पर प्रवरा २ हा प्रकल्प उत्तर नगर जिल्ह्यातील ७ तालुक्यांतील १८२ गावांतील ६४२६० हेक्टर क्षेत्रासाठी १४ जुलै १९७० साली राज्य सरकारने मंजूर केला होता. चार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन होऊनही या प्रकल्पाचे काम आज ४८ वर्षांनंतरही अपूर्ण आहे. १० वर्षांपूर्वी धरणाच्या भिंतीचे काम पूर्ण झाले. मात्र कालव्यांची कामे पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे प्रकल्पात पाणी साठुनही ते वंचित शेतकऱ्यांना मिळू शकले नाही. या अन्यायाविरुद्ध निळवंडे कालवा कृती समितीने ठिकठिकाणी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करूनही जलसंपदा विभागाने दखल घेतली नव्हती. अखेर निळवंडे कालवा कृती समितीने या प्रकल्पाचा केंद्र सरकारच्या वेगवर्धित सिंचन प्रकल्पात समावेश करण्यासाठी केंद्रीय जल आयोगाच्या माजी खा. भाऊसाहेब वाकचौरे यांच्यामार्फत चौदा मान्यता मिळवल्या होत्या. सरकारच्या स्वाधीन असलेल्या सुप्रमा व वित्त विभागाची हमी या दोन मान्यता राज्य सरकारकडून मिळत नव्हत्या. त्यासाठी कालवा कृती समितीने सप्टेंबर २०१६ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात सुप्रसिद्ध वकील अजित काळे यांच्यामार्फत विक्रांत रुपेंद्र काले व नानासाहेब जवरे यांनी जनहित याचिका दाखल करून न्याय मागितला होता. दरम्यान दोन मान्यतांसह केंद्र सरकारने केंद्रीय जल आयोगाची मान्यता नुकतीच प्रदान केली होती. मात्र स्थानिक लोकप्रतिनिधींनी निळवंडे धरणाचे पाणी लाभक्षेत्राच्या बाहेरील शिर्डी नगर पंचायत व कोपरगाव नगर परिषद यांना देण्याचा निर्णय १९ जानेवारी २०१८ रोजी तांत्रिक मान्यता व ७ फेब्रुवारी २०१८ रोजी विधी व न्याय विभागाची मान्यता मिळवून घेतला होता. त्याचा खूप मोठा प्रतिकूल परिणाम निळवंडेच्या लाभक्षेत्रातील गावांवर होणार होता. त्याला कालवा कृती समितीने हरकत घेतली. व औरंगाबाद खंडपीठात दाद मागितली होती. काल बेंच क्रमांक १ चे न्या. आर एन बोर्डे व न्या. अरुण ढवळे, यांच्यासमोर सलग दोन दिवस सुनावणी झाली त्यावेळी न्यायालयाने लाभक्षेत्राच्या बाहेरील शिर्डी नगर पंचायत व कोपरगाव नगर परिषदेस पाणी देण्यास स्थगिती दिली आहे. केंद्र सरकारच्या वतीने सहाय्यक सॉलिसिटर जनरल ऍड संजीव देशपांडे, राज्य सरकारच्या वतीने ऍड अमरजितसिँग गिरासे यांनी व निळवंडे कालवा कृती समितीच्या वतीने ऍड अजित काळे यांनी जोरदार युक्तिवाद करून शिर्डी, कोपरगावला पाणी कमतरता नसल्याचे लक्षात आणून दिले. तसेच हा साई संस्थानच्या पैशाचा अपव्यय असल्याचे निदर्शनास आणून दिले. सुनावणीच्या वेळी कृती समितीचे मार्गदर्शक नानासाहेब जवरे, रुपेंद्र काले, संजीव गुंजाळ, नानासाहेब गाढवे, कौसर सय्यद, माधव गव्हाणे, पर्वत गव्हाणे, अशोक गांडूळे, कारभारी काळे, चंद्रकांत कार्ले आदि कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान यापूर्वी केंद्र सरकारने मार्च २०१७ रोजी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात निळवंडे च्या लाभक्षेत्राच्या बाहेर पाणी देण्याचे प्रयोजन नसल्याचे खंडपीठापुढे सांगितले होते. शिर्डी व कोपरगावला पाणी मीळण्याची शक्यता मालवली असल्याचे दिसून येत आहे. न्यायालयाच्या या निर्णयाचे लाभार्थी शेतकऱ्यांनी स्वागत केले असून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.