Tuesday 25 June 2019

तळेगाव दिघेत कालवा कृती समितीचे वकील अजित काळे यांचा ३० जूनला सत्कार



जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे राहणार उपस्थित
शिर्डी लाईव्ह (प्रतिनिधी)
                             उत्तर नगर जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त १८२ गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे प्रकल्पाचे कालव्यांचे काम निळवंडे कालवा कृती समितीने ज्या वकिलांच्या मोफत विधी सेवेने मार्गी लावले ते विधिज्ञ अजित काळे यांचा सत्कार निळवंडे कालवा कृती समितीने तळेगाव दिघे येथे येत्या रविवार दि.३० जून रोजी सकाळी दहा वाजता माहेर मंगल कार्यालयात प्रसिद्ध जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमास लाभधारक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कालवा कृती समितीचे नेते रमेश दिघे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. 
                             सदरचे सविस्तर वृत्त असे की, उत्तर नगर जिल्ह्यातील सात तालुक्यातील दुष्काळी १८२ गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे प्रकल्पाचे कामास निधी मिळण्याचा मार्ग निळवंडे कालवा कृती समितीचे कार्यकर्ते  विक्रांत काले व पत्रकार नानासाहेब जवरे यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जाऊन विधिज्ञ अजित काळे यांच्या मार्फत जनहित याचिका क्रं.१३३-२०१६ अन्वये मोकळा केला असताना अकोले तालुक्यातील लोकप्रतिनिधीस पुढे करून उत्तरेतील काही राजकीय नेत्यांनी अकोले तालुक्यातील ० ते २८ की. मी. तील काम अवैधरित्या बंद करून दुष्काळी शेतकऱ्यांवर  अन्याय केला होता. त्या बाबत निळवंडे कालवा कृती समितीने सातत्याने आवाज उठवून जनतेला जागे करण्याचे काम केले होते. निळवंडे कालवा कृती समितीने अकोलेतील बंद काम चालू करण्यासाठी दीड वर्ष संघर्ष करून उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खण्डपीठाचे आदेश ३ मे ला मिळविले २७ मे रोजी न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी तळेगाव दिघे येथे कालवा कृती समीतीने २७ मे रोजी मोठे आंदोलन केले त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दहा जून हि अखेरची तारीख काम चालू करण्यासाठी दिली होती. नंतर १४ जून रोजी  औरंगाबाद खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी करताना न्यायालयाने मागील तीन मे च्या आदेशाची अंमलबजावणी केली की नाही याची खातरजमा करत अकोलेतील कालव्यांचे काम सलग विना अडथळा सुरु ठेवण्याचे आदेश दिले होते. या सर्व प्रक्रियेत निळवंडे कालवा कृती समितीस औरंगाबाद उच्च न्यायालयाचे वकील संघाचे तत्कालीन अध्यक्ष अजित काळे यांचे मोफत विधी सहाय्य लाभले होते. त्यातून उतराई होण्यासाठी निळवंडे कालवा कृती समितीने त्यांचा सत्कार करण्याचा निर्णय तळेगाव दिघे येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत एकमुखाने केला आहे. त्यानुसार हा सत्कार कार्यक्रम संपन्न  होत आहे. या कार्यक्रमास १८२ गावातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन रमेश दिघे, कालवा कृती समितीचे कार्याध्यक्ष मच्छीन्द्र दिघे, पाटीलबा दिघे, डॉ.आर. पी.दिघे, भाऊसाहेब दिघे, उत्तमराव जोंधळे, दत्तात्रय आहेर, शिवनाथ आहेर, अशोक गांडूळे, विठ्ठलराव पोकळे, संतोष तारगे, चंद्रकांत कार्ले, विधिज्ञ योगेश खालकर, दिलीप खालकर, शिवाजी जाधव, बाळासाहेब सोनवणे, आबासाहे सोनवणे, दत्तात्रय चौधरी,आदिनी केले आहे.

चौकट-सदर कार्यक्रमात वकील अजित काळे यांना कालवा कृती समितीच्या वतीने "कृषिरत्न"या पुरस्काराने प्रसिद्ध जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे यांच्या हस्ते गौरविण्यात येणार असून त्यावेळी पुरंदरे यांचे सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील पाणी पूर्वेस वळविण्याबाबत व्याख्यान संपन्न होणार आहे.



गोविंदगिरीजी महाराज यांचा आज पंधरावा पुण्यतिथी सोहळा



शिर्डी लाईव्ह (प्रतिनिधी):-
                                   राहता तालुक्यातील पिंपळवाडी येथील परमपूज्य गुरुवर्य सिद्धयोगी गोविंदगिरीजी महाराज यांचा पंधरावा पुण्यतिथी सोहळा बुधवार दि.२६ जून रोजी अन्नपूर्णा पीठाधीश्वर श्रीश्री १००८  महामंडलेश्वर परमपूज्य स्वामी विश्वेश्वरानंद  गिरीजी महाराज अन्नपूर्णा आश्रम इंदौरत्रंबकेश्वर सिद्धाश्रम पिंपळवाडी व सर्व साधू संत महंतांच्याउपस्थितीमध्ये संपन्न होत आहे. पंचक्रोशीतील उत्स्फूर्त सहकार्य करणारे भक्त पिंपळवाडी, शिर्डी, शिंगवे, वारी, कान्हेगाव, भोजडे, सडे, रुई, पुणतांबा, नपावाडी,  एकरुखे, रामपूरवाडी, राहाता येथील भाविक भक्तांनी या सोहळ्यास उपस्तीत रहावे असे आवाहन पिंपळवाडी सिधाश्रमाचे मठाधिपती स्वामी नित्यानंद गिरीजी महाराज यांनी केले आहे .

Wednesday 12 June 2019

कासारे नंतर रांजणगावही सरसावले ! पुढा-यांना गावबंदी


निळवंडेचे कामात राजकीय खोडा, रांजणगावला पुढा-यांना गावबंदी
कासारे नंतर रांजणगावही सरसावले !
शिर्डी लाईव्ह(प्रतिनिधी) :-
                                   निळवंडे धरणाचे काम  पुर्ण झाले आसुन कालव्यांची कामे अपुर्ण आहेत. 182 गावांचा निळवंडे धरणाचे पाणी हा जिवन मरणाचा प्रश्न आहे. सातत्याने लाभधारक शेतकरी पाण्याची मागणी करत आहे. मात्र आश्वासनापलीकडे काही झालेच नाही. आता काम होण्याची चिन्हे दिसत आसतांना त्यालाही काहीजण अडचण निर्माण करत आहेत. आता कालव्यांची कामे तातडीने करुन लाभधारक शेतक-याच्या शेतात पाणी द्यावे अशी मागणी शेतक-यांची आहे.या प्रश्नासाठी संगमनेर तालुक्यातील कासारे यांनी यापुर्वीच पुढा-यांना गाव बंदी केली आहे. कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथेही मंगळवारी विशेष ग्रामसभा घेऊन यापुढे सर्वच राजकिय पक्षांच्या पुढा-यांना  गावबंदी करण्याचा व येणा-या मतदानावर बहीष्कार टाकण्याचा
निर्णय घेण्यात आला. यावेळी सर्वांनी गावात पुढा-यांना गावबंदी करुन मतदानावर बहीष्कारची व गावच्या निर्णयावर ठाम राहण्याची शपथ घेतली. रांजणगावात इतर गावांच्या पुढा-यांना याबात हस्तक्षेप न करु देण्याबरोबरच राजकिय पुढा-यांकडे कोणाही जाऊच नये असाही निर्णय घेण्यात आला.
                                  कासारे गावातील शेतकऱ्यांनी राजकीय नेत्यांना वैतागून फेब्रुवारीत  सर्वपक्षीय पुढाऱ्यांना गावबंदी करून पहिली चपराक लगावली होती. त्याची दखल राष्ट्रीय वृत्त वाहिन्यांनी दखल घेतली होती. आजही राज्य व देश पातळीवरील वृत्त वाहिन्या कासारे गावात ठाण मांडून आहेत. काम चालू करण्यासाठी कुठलेही प्रयत्न केलेले नाही त्यामुळे जनतेत मोठा असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथील तरुण शेतकरी अस्वस्थ होते त्यांनी २६ मे रोजी कोपरगावच्या  दुष्काळी दौऱ्यानिमित्त आलेल्या विद्यमान लोकप्रतिनिधीस गावात येण्यास मज्जाव केला होता. त्यावेळीच ही नाराजी दिसून आली होती. त्यामुळे तरुण काहीतरी निर्णय घेण्याचा मानसिकतेपर्यंत आले होते. निळवंडे धरणावर या नेत्यांनी केवळ अनेक वर्षे फक्त राजकारणच केले गेले. काम अंतिम टप्यात असतांनाही यावर योग्य तोडगा निघत नाही त्यामुळे आता गावात पुढा-यांना गावबंदी करावी व येणा-या मतदानावरही बहीष्कार टाकावा असा निर्णय रांजणगाव देशमुखच्या विशेष ग्रामसभेत एकमताने घेण्यात आला. सर्वानी हनुमान मंदीरात शपथ घेऊन या निर्णयावर  शिक्कामोर्तब केले.
                                   यावेळी सरपंच संदिप रणधिर, उपसरपंच बाबासाहेब गोर्डे, अॅड योगेश खालकर ,तंटामुक्तीचे अध्यक्ष संतोष वर्पे, प्रकाश गोर्डे, गजानन मते, अनिल खालकर, नानासाहेब वर्पे, धनंजय वर्पे, आत्याभाऊ वर्पे, शिवाजी वामन, विक्रम ठोबंरे, सुरेश देशमुख, कारभारी खालकर, दादासाहेब खालकर, प्रभाकर खालकर, रामभाऊ वर्पे, जालींदर खालकर, सुरेश खालकर, योगेश चव्हाण. भारत देशमुख, जयवंतराव खालकर, रामनाथ सहाणे, दत्तात्रय खालकर, विकास वर्पे, संजय खालकर, संपत खालकर, चंद्रभान खालकर, रंगनाथ वर्पे, विलास वर्पे, सोमनाथ खालकर, दिलीप खालकर, ज्ञानदेव चव्हाण आदिसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

Tuesday 11 June 2019

रांजणगाव देशमुख येथे साई करिअर अकॅडमी चे उदघाटन






शिर्डी लाइव्ह(प्रतिनिधी):-

                                कोपरगाव तालुक्यातील  रांजणगाव देशमुख सह परिसरात करिअर करण्यासाठी उत्सुक विद्यार्थ्यांसाठी रांजणगांव देशमुख येथे साई करिअर अकॅडमी आज सुरू झाली आहे. या अकॅडमी चा उदघाटन सोहळा शिर्डी पोलीस स्टेशनचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे, पोलीस उपनिरीक्षक अनिल कटके  या मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यकम पार पडला. यावेळी माजी पोलिस पाटील निवृत्ती गोर्डे, जवळकेचे सरपंच बाबूराव थोरात, रांजणगाव देशमुख सरपंच, उपसरपंच, सुनिल खालकर, रामनाथ बोऱ्हाडे, विनोद जवरे, दत्तु गोर्डे, युवराज गांजवे, संजय चव्हाण आदि मान्यवर उपस्थित होते. या  अकॅडमी मध्ये कराटे वक्तृत्व, गायन, योगा, नेमबाजी आदि उपक्रम राबविण्यात येणार आहेत.