रांजणगाव देशमुख(प्रतिनिधी):-
कोपरगाव तालुक्यातील जवळके, धोडेंवाडी,
अंजनापुर, बहादरपुर, बहादबाद, वेस, सोयेगांव तसेच आदी गावांच्या वतीने
रोख रक्कम रुपये चौदा हजार मदत वीर जवान केशव गोसावी यांच्या कुटुबांसाठी
केली आहेत.
त्यांच्या पश्चात अपंग वडील, पत्नी व विवाहीत बहीणी असा परिवार आहे.
आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची आहे. सदर प्रसंगी सरपंच बाबुराव थोरात,
उपसरपंच गोपीनाथ रहाणे, माजी सरपंच ज्ञानेश्वर गव्हाणे, संतोष गव्हाणे,
नंदु मामा पाडेकर, बाळासाहेब चिमण रहाणे, पत्रकार विनोद जवरे, साई भक्त
सुभाष रहाणे, विकास गोर्डे, दत्तात्रय गोर्डे आदी उपस्थित होते.
फोटो -
शहीद जवान केशव गोसावी यांचा कुटुबियांना आर्थिक देतांना सरपंच बाबुराव
थोरात, माजी सरपंच ज्ञानेश्वर गव्हाणे, उपसरपंच गोपीनाथ रहाणे आदी.