पतसंस्थेला १७ लाखांचा नफा
संस्थेकडे ४ कोटी १५ लाखांच्या ठेवी
शिर्डी लाइव्ह (प्रतिनिधी):-
कोपरगाव तालुक्यातील बहाद्दरपूर येथील सदगुरु गोपाजी बाबा ग्रामीण बिगर
शेती सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक २४ सप्टेंबर रोजी संस्थेच्या सभागृहात पार पडली. यावेळी संस्थेचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर म्हाळस्कर यांनी संस्थेच्या कामकाजाची व प्रगतीची माहिती दिली.
त्यांनी सांगितले की संस्थेचे भागभांडवल २६ लाख रुपये असून संस्थेकडे ४
कोटी १५ लाख रुपयांच्या ठेवी आहेत. तर संस्थेने ३ कोटी रुपयांचे कर्ज वितरण
केले आहे. संस्थेला १७ लाख २४ हजार रुपयांचा नफा झाला आहे. तर संस्थेकडे ६ लाख ६९ हजार रुपयांचा राखीव निधी आहे. संस्थेने १ कोटी ७० लाखांची गुंतवणूक केली आहे.
सभासदांना १३ टक्के दराने लाभांश जाहीर करण्यात आला. यावेळी संस्थेचे
चेअरमन भागवत दामू रहाणे, उपाध्यक्ष विजय रहाणे, संचालक रामदास कारभारी
रहाणे, मीननाथ पंढरीनाथ जोंधळे, बाळासाहेब सावळेराम रहाणे, भास्करराव चंदूजी थोरात, भाऊसाहेब सीताराम थोरात, रामचंद्र कारभारी पवार, सौ. सुनीता मछिंद्र पाचोरे, सुनीता बाबासाहेब खकाळे, पाराजी कचेश्वर पाचोरे, चंद्रशेखर भास्करराव रहाणे, चंद्रकांत कचरू पोकळे, सुरेश चांगदेव पाडेकर, चंद्रशेखर चंदूजी रहाणे हे सर्व संचालक तर संस्थेचे सभासद, हितचिंतक, कर्जदार, ठेवीदार तसेच संस्थेचे कर्मचारी, पिग्मी एजंट उपस्थित होते. उपस्थित सर्वांचे आभार विजय वारुबा रहाणे यांनी मानले.