Wednesday 30 December 2020

सौ. लहानबाई गोर्डे यांचे निधन

शिर्डी लाईव्ह  (प्रतिनिधी):-

सौ. लहानबाई गोर्डे 
कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथील जुन्या पिढीतील सौ. लहानबाई निवृत्ती गोर्डे वय ८० वर्षे यांचे वृद्धापकाळाने दिनांक २७ डिसेंबर २०२० रोजी सकाळी ११: १५ वाजता दुःखद निधन झाले.  त्यांच्यावर रांजणगाव देशमुख येथील अमर धाम येथे शोकाकुल वातावरणात अंत्यंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगी, दोन मुले, जावई, सुना,  नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्या माजी पोलीस पाटील निवृत्ती लहानू गोर्डे यांच्या धर्मपत्नी तर रांजणगाव देशमुख ग्रामपंचायत चे उपसरपंच बाबासाहेब गोर्डे  व अशोक गोर्डे यांच्या मातोश्री  होत. त्यांचा दशक्रिया विधी मंगळवार दिनांक ५ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ९ वाजता पाझर तलाव रांजणगाव देशमुख येथे होणार आहे. 


हे. 

Tuesday 1 September 2020

शाम गवंडी यांना मातृशोक


शिर्डी लाईव्ह  (प्रतिनिधी):-


कोपरगाव शहरातील पत्रकार शाम दादापाटील गवंडी यांच्या मातोश्री गं.भा.लक्ष्मीबाई दादापाटील गवंडी यांचे अल्पशा आजाराने  नुकतेेेच निधन झाले.   त्यांच्या पश्चात तीन मुली, एक मुलगा, जावई,  नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्या पत्रकार शाम दादापाटील गवंडी यांच्या मातोश्री तर माजी नगरसेवक कृष्णा आढाव यांच्या मावशी होत. त्यांचा दशक्रिया विधी रविवार दिनांक ६ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता कोपरगावाव अमरधाम येथे होणार आहे. 






Friday 8 May 2020

बाबासाहेब गव्हाणे यांना पितृशोक

चंद्रभान गव्हाणे यांचे निधन
शिर्डी लाईव्ह न्यूज :- 

   
चंद्रभान गव्हाणे 

                            वापी (गुजरात) येथील सुप्रसिद्ध उद्योजक बाबासाहेब चंद्रभान गव्हाणे यांचे वडील कोपरगाव तालुक्यातील अंजनापूर येथील सामाजिक कार्यकर्ते व प्रगतशील शेतकरी चंद्रभान देवराम गव्हाणे वय-७३ वर्षे यांचे वैशाख शु. एकादशीच्या दिवशी दिनांक ४ मे २०२० रोजी हृदयविकाराने निधन झाले. त्यांनी अंजनापूर ग्रामपंचायतीत सदस्य व सोसायटीत काही काळ संचालक म्हणून काम केले होते.
                                        त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली, सुना नातवंडे असा परिवार आहे. ते उद्योजक बाबासाहेब गव्हाणे व  ज्ञानदेव गव्हाणे यांचे वडील होत. त्यांच्या निधानाबद्दल अंजनपुर ग्रामस्थांसह अनेकांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. 

Monday 30 December 2019

राष्ट्रीय सेवा योजना ही संस्काराची जननी - विनोद जवरे



शिर्डी लाईव्ह न्यूज:-
                        राष्ट्रीय सेवा योजना शिबिर ही संस्काराची जननी असून विद्यार्थी दशेत ती प्रत्येकाला उपयुक्त असल्याचे मत पत्रकार विनोद जवरे यांनी केले.

राष्ट्रीय सेवा योजनाच्या हिवाळी शिबीर सोहळ्या प्रसंगी
 मार्गदर्शन करतांना  पत्रकार विनोद जवरे
.
                           कोपरगाव  तालुक्यातील बहादरपूर येथे एस एस जी एम महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी  मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी कार्यक्रम अधिकारी डॉ. बी. एम. वाघमोडे, अधिकारी डॉ. के. एस. महाले, सदस्य डॉ. एस. पी. काळे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब  चिमणराव रहाणे आदि मान्यवर उपस्स्थित होते.

                             
ते पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी ज्ञान आत्मसात करून समाजकार्य सेवेची शिदोरी या शिबिरातून घेतली पाहिजे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर ग्रामीण भागातील जनजीवन आचार-विचार शिकवण देते विद्यार्थिदशेत शिस्तीला महत्त्व आहे.  त्यातून प्रत्येकाने ते अंगीकारावे असे ते म्हणाले.
                                                यावेळी ग्रामस्थ, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठया संख्येने उपस्थित होते.





Monday 23 December 2019

आनंद मेळाव्यातून विद्यार्थ्याना व्यवहारीक ज्ञान मिळते - रोहित टेके


रामेश्वर विद्यालयात आनंद मेळावा संपन्न


कोपरगाव : शालेय स्तरावर घेण्यात येणारा आनंद मेव्याचा उपक्रम खूप स्तुत्य आहे. यातून विद्यार्थ्यानी विक्रीसाठी आनलेल्या वस्तू त्या वस्तूंना तयार अथवा खरेदी करण्यासाठी आलेला खर्च व त्यांची विक्रीकरून मिळालेले पैसे यातून नफातोटा समजतो. त्यामुळे विद्यार्थ्याना व्यावहारीक ज्ञान मिळते असे प्रतिपादन पत्रकार रोहित टेके यांनी केले.

         कोपरगाव तालुक्यातील वारी येथील श्री.रामेश्वर विद्यालयामध्ये शनिवारी बालआनंद मोहोत्सव संपन्न झाला. त्याच्या उद्गघाटनाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक काकासाहेब गवळी होते.
        या प्रसंगी मुख्याध्यापक काकासाहेब गवळी यांचेही  भाषण झाले. मेळाव्यासाठी असंख्य पालक, विद्यार्थी उपस्थित होते. या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी भाजीपाला, फळे, पाणीपुरी, पाववडा सेंटर, भेळ सेंटर, विविध प्रकारचे दुकाने मांडली होती. पालक आणि विद्यार्थी यांनी या मेळाव्यात खरेदी करून विक्रेत्यांचा उत्साह वाढविला. या मेळाव्यात विद्यार्थ्यानी आनलेल्या विविध वस्तूंच्या विक्रीतून जवळपास दहा हजाराची आर्थिक उलढाल झाली.  
        सदर आनंद मेळावा यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील शिक्षक कैलास शेळके, सुनील निकाळजे, दत्तू साळुंके, रविंद्र रासकर, वसंत जाधव, बाळासाहेब तुपे, नारायण सुकटे, चंदू जोर्वेकर, तुकाराम जेठे, सुरेश सोनवणे, नितीन निकम, गोरख सोनवणे, व शिक्षिका अनुराधा शेळके, अनिसा पठाण यांनी मोलाचे सहकार्य केले.


रोहित टेके 


x

Saturday 5 October 2019

शरद आहेर ‘राष्ट्रनिर्माण’ पुरस्काराने सन्मानित

शिर्डी येथे वितरण ; विविध मान्यवरांची उपस्थिती 

शिर्डी लाईव्ह (प्रतिनिधी):-
        कोपरगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बहादरपूर येथे कार्यरत असलेले प्राथमिक शिक्षक श्री.शरद भाऊसाहेब आहेर यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल रोटरी क्लब ऑफ शिर्डी साईबाबा यांनी सन २०१९-२० चा राष्ट्र निर्माण पुरस्काराने शिर्डी येथे सन्मानित करण्यात आले.
      कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डी.वाय.एस.पी.शिर्डी पोलीस स्टेशन श्री.सोमनाथजी वाकचौरे साहेब व शिक्षण विस्तार अधिकारी राहाता श्री.ज्ञानेश्वर वाकचौरे साहेब होते. रोटरी चे अध्यक्ष श्री.निखीलजी बोरावके, सेक्रेटरी निलेशजी गंगवाल, माजी अध्यक्ष श्री.गौरव भुजबळ, डॉ.गुंजाळ, श्री.शरदजी निमसे, श्री.राउत साहेब आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
       श्री.शरद आहेर यांनी हा पुरस्कार व्यासपीठावर जाऊन मान्यवरांच्या हस्ते पत्नी राजश्री, मुलगी श्रीशा व पोहेगाव केंद्राचे केंद्रप्रमुख राजेंद्रजी ढेपले साहेब यांचे समवेत स्वीकारला.

       यावेळी सर्वश्री सूर्यभान रहाणे, कैलास रहाणे, सोमनाथ रहाणे, चंद्रकांत डोंगरे, सुधाकर अंत्रे, निवृत्ती बढे, अशोक गव्हाणे, रामदास गव्हाणे, सीताराम गव्हाणे, मनोज सोनवणे, मुरलीधर वाकचौरे, बाळासाहेब गोरे, नंदू दिघे, रविंद्र शिरोळे, गणेश पाचोरे, विकास डोंगरे, दत्तात्रय सासवडे, दत्तात्रय अभंग, महेंद्र चव्हाण, महेश भामरे, प्रशांत बोंडखळ, इरखेडे सर आदी बहुसंख्येने उपस्थित होते.

Monday 26 August 2019

पत्रकार विनोद जवरे यांना युवा आयडॉल पुरस्कार प्रदान




शिर्डी लाईव्ह (प्रतिनिधी):- 


                                      कोपरगांव तालुक्यातील जवळके येथील युवा पत्रकार विनोद जवरे यांना युवा ध्येय परिवाराच्यावतीने दिला जाणारा युवा आयडॉल हा राज्यस्तरीय पुरस्कार नुकताच विश्व विद्यापीठाचे माजी कुलगुरू सर्जेराव निमसे व संपादक लहानु सदगीर यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यांत आला. 
                                    पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल हा पुरस्कार जवरे यांना  देण्यात आला. सदर कार्यक्रम हा अहमदनगर येथील माउली सभागृह येथे पार पडला याप्रसंगी मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमुर्ती बी जी कोळसे पाटील  उपस्थित होते.  तसेच पुरस्काराबददल आ. स्नेहलता कोल्हे, आ. राजाभाऊ  वाजे, मा.खासदार. बबन नाना घोलप  आदींनी  विनोद चे  अभिनंदन केले आहे.