Saturday, 9 August 2014

दुखः पेलण्याची शक्ती भगवंतच देतो - ढोक महाराज
रांजणगाव  देशमुख (वार्ताहर):-
                                    परमार्थ हा माणसाला दुखातून सावरण्याची शक्ती देतो म्हणून माणसाने दुखात खचून  न जाता महापुरुषांच्या जीवनाकडे बघायला हवे व त्या दुखाचा सामना करायला हवा असे ह भ प  रामराव महाराज  ढोक यांनी सांगितले.
                                   कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथील १ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट या काळात आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाच्या  काल्याच्या कीर्तानाच्या वेळी ते बोलत होते. यावेळी परिसरातील भाविक हजारोंच्या संखेने उपस्थित होते. ढोक महाराज पुढे  म्हणाले कि भगवान श्रीकृष्णाने गोकुळात जे  काम केले त्याचे उच्चारण काल्याच्या कीर्तनात करायचे असते. कृष्णाने पांडवांवर जीवापाड प्रेम केले. महारांजानी यावेळी हरिचंद्र व तारामती यांचे उदाहरण देऊन  समजावले कि हरिचंदराने स्वप्नात दिलेले वचन सत्यात पूर्ण  केले त्यांच्या जीवनातही खूप  दुखे आली पण त्यांनी खचून न जात त्या दुखांचा सामना केला. महाराज म्हणाले कि, सूर्यास्तानंतर सूर्योदय हा  होणारच असतो त्याचप्रमाणे दुखः नंतर सुख हे येणारच असते. महाराजांनी आई वडिलांचे प्रेम समजावताना सांगितले कि आई मुलावर जेवढे प्रेम करते तेवढेच प्रेम बापही मुलावर करतो. ज्योत आई आहे तर  बाप समयी आहे.  रांजणगावचे  ऐक्य खूप मोठे असून ते चिरंतन असेच रहावे असे महाराजांनी या वेळेस सांगितले.  ढोक महाराज गेल्या  ३२ वर्षापासून रांजणगावात येत आहेत. त्यामुळे गावाशी त्यांचे कौटुंबिक संबंध झालेले आहेत. सकाळी ४ वाजता काकड आरती होऊन ९ ते ११ कीर्तन झाले. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. सायंकाळी ४ वाजता दिंडीचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या वेळी  परिसरातील भाविक हजारोंच्या संखेने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment