Saturday, 9 August 2014

रांजणगाव देशमुख पथकर नाक्यावरील दुभाजकामुळे अनेक अपघात
अनेकांना शारीरिक अपंगत्व ; प्रशासनाचे दुर्लक्ष
रांजणगाव देशमुख (वार्ताहर):-
                                    कोपरगाव - संगमनेर रस्त्यावर रांजणगाव देशमुख येथे बंद असलेल्या टोलनाक्याच्या  दुभाजकामुळे अनेक अपघात होत असून  यामुळे अनेक लोकांना शारीरिक अपंगत्व आले आहे.
                                     कोपरगाव- संगमनेर रस्त्यावर  झगडेफाटा  ते वडगाव फाटा हा रस्ता बांधा वापरा आणि हस्तांतरित करा याअंतर्गत  बांधलेला असून हा रस्ता खराब झाल्यामुळे स्थानिकांच्या आंदोलनामुळे काही महिन्यांपूर्वी हा  पथकर नाका बंद करण्यात आला आहे. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने पथकर नाक्यांसंधर्भात काढलेल्या अध्यादेशानुसार हा पथकर नाका कायमचा बंद करण्यात आला आहे. तरीही येथील पत्र्याचे शेड व  रत्याच्या  मध्ये असलेले संगणक कक्ष व दुभाजक अजूनपर्यंत काढलेले नसून  येथील विद्युत दिवेही रात्रीच्या वेळेस कायम बंद असतात.  या रस्त्याने खूप मोठ्या प्रमाणात अवजड व विविध प्रकारची वाहतूक सुरु असून  वाहनांना या पथकर नाक्यावर आल्यानंतर रात्रीच्या वेळेस येथील दुभाजकाचा अंदाज येत नसल्यामुळे वाहने यावर धडकून येथे अपघात होत आहेत विशेषता कार व मोटारसायकल यांचे अपघात मोठ्या प्रमाणात होत असून या अपघातात अनेकांन शारीरिक अपंगत्व आले असून  व वाहनांचेहि नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे.  या ठिकानी  उभे केलेले पत्र्याचे शेड व रस्त्याच्या मध्ये असलेले संगणक कक्ष आणि  रस्त्यातील दुभाजक लवकरात लवकर काढणे गरजेचे आहे पण  प्रशासनाचे याकडे लक्ष नसून हे  दुभाजक वाहनधारकांना डोकेदुखी ठरत आहेत.
                                     येथे  अपघात होऊन कोणाचा जीव जाण्याच्या आत प्रशासनाने यात वेळेवर लक्ष घालून या ठिकानी  उभे केलेले पत्र्याचे शेड व रस्त्याच्या मध्ये असलेले संगणक कक्ष आणि  रस्त्यातील दुभाजक काढून  प्रवाशांच्या जीवाशी खेळणे बंद करावे अशी मागणी वाहधाराकांकडून होत आहे.

काही दिवसांपूर्वी या रस्त्याची डागडुजी करण्यात आली आहे.   हे काम अतिशय निकृष्ट प्रकारे करण्यात आले असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या निकृष्ट कामाची बिले काढली जात आहेत.

No comments:

Post a Comment