तहसीलदारांना निवेदन; अन्यथा आमरण उपोषण
रांजणगाव देशमुख(वार्ताहर):-
कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख, जवळके, अंजनापूर, बहाद्दरपूर,
धोंडेवाडी, वेस, सोयगाव, मनेगाव, मल्हारवाडी, काकडी, डांगेवाड़ी आदी गावांना
१५ दिवसात दुष्काळ जाहीर करावा अन्यथा दि. ३ डिसेंबर पासून रांजणगाव
देशमुख येथे आमरण उपोषण सुरु काण्यात येईल असे निवेदन रांजणगाव देशमुख
येथील ऍडव्होकेट योगेश खालकर यांनी तहसीलदार यांना दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यतील वरील गावांना ५० वर्षांपासून कायम
दुष्काळ असताना हि गावे दुष्काळ यादीत समाविष्ट करण्यात आलेली नाही.
तालुक्यातील एकही गाव दुष्काळाच्या पहिल्या यादीमध्ये आलेले नाही. सध्या या
गावांमध्ये पिण्याच्या व जनावरांच्या पाण्यासाठी मोठ्या झळा सोसाव्या लागत
आहेत. जनावरांना चारा उपलब्ध नाही. शेतकरी गावे सोडण्याच्या तयारीत आहेत.
शेतकऱ्यांना अळीमुळे झालेल्या कापसाच्या नुकसानीचे पैसे मिळालेले नाही. या
गावांमध्ये चारा छावण्या सुरु करणे गरजेचे आहे. वरील गावे पोहेगाव मंडळात
येत असल्याने दुष्काळी गावेही बागायत म्हणून गणली जातात. त्यामुळे या
गावांचे वेगळे मंडल कार्यालय होणे गरजेचे आहे. या सर्व मागण्या ८ दिवसात
पूर्ण कराव्या अन्यथा या गावांतील शेतकरी आपल्या कुटूंबियांसमवेत रांजणगाव
देशमुख येथे ३ डिसेंबर पासून आमरण उपोषण करतील. आणि याची जबाबदारी सरकारची
राहील.
No comments:
Post a Comment