रांजणगाव देशमुख(वार्ताहर):-
कोपरगाव तालुक्यातील रांजणगांव देशमुख, धोंडेवाडी, वेस, सोयेगांव, मनेगांव, अंजनापुर, बहादरपुर या सात गावांची असलेली प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचा धोंडेवाडी पाझर तलाव पाण्यांने भरून घेण्यांसाठी थकीत असलेल्या वीजबिलात तोडगा काढुन एक्सप्रेस फीडरवरील वीज जोड तात्काळ सुरू करावेत असे आदेश राज्य वीज वितरण कंपनीचे कार्यकारी संचालक संजीवकुमार यांनी मंगळवारी दिले अशी माहिती आमदार स्नेहलता कोल्हे यांनी दिली.
रांजणगांव देशमुख प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे व्याजासह ३२ लाख रूपये वीज बील थकले होते त्या संदर्भात पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री राम शिंदे तसेच महसुलमंत्री चंद्रकांत दादा पाटील शिर्डी दौ-यावर आले असता त्यांच्याशी याबाबत सातत्यांने पाठपुरावा केला तसेच कोल्हे कारखाना कार्यस्थळावर वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता डी बी गोसावी, उपकार्यकारी अभियंता डी एन चावडा, अतिरिक्त उप कार्यकारी अभियंता जे व्ही महाजन, उपकार्यकारी अभियंता जी आर रिचवाल (राहाता) पोलिस निरीक्षक श्री लोखंडे गटविकास अधिकारी कपिलनाथ कलोडे, संबंधीत गांवचे रहिवासी यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यांत आली त्यात सध्याची दुष्काळी स्थिती नागरिकांसह जनावरांचा पिण्यांच्या पाण्यांचा निर्माण झालेला प्रश्न त्यासाठी टँकर सुरू करण्यांवर होणारा खर्च याबाबत सविस्तर चर्चा होवुन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याशी बोलणे झाले. १९९८ पासून या योजनेचे उत्तरदायित्व संजीवनीचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्ह यांनी घेवुन सातत्यांने यातुन पाणी दिले होते. मात्र गेल्या दीड वर्षापासुन ही योजना ठप्प होती.
सोमवार १२ नोव्हेंबर रोजी याबाबत राज्य वीज वितरण कंपनीचे कार्यकारी संचालक संजीवकुमार यांच्याशीही चर्चा झाली त्यांनी बैठकीत ठरल्याप्रमाणे झालेल्या प्रस्तावावर निर्णय करून अहमदनगरचे अधिक्षक अभियंता संतोष सांगळे, कार्यकारी अभियंता जीवन एस चव्हाण यांच्याशी मंगळवारी दुपारी धोंडेवाडी पाझरतलाव एक्सप्रेस फिडरचा कट केलेला वीज पुरवठा तात्काळ चालु करावा व जनतेच्या पिण्यांच्या पाण्यांची अडचण दुर करावी असे आदेश केले अहमदनगर बैठकीस माजी सरपंच कैलास राहणे सरपंच संदिप रणधीर उपस्थित होते, त्यामुळे धोंडेवाडीचा पाझर तलाव आता चालु पिण्यांच्या पाण्यांच्या आर्वतनांत भरला जाईल व पश्चिम भागातील सात गावांच्या नागरिकांच्या पिण्यांच्या पाण्यांची समस्या दुर होईल असेही आमदार कोल्हे शेवटी म्हणांल्या. वीज वितरण कंपनीने घेतलेल्या निर्णयाचे व उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या सहकार्याबददल आमदार कोल्हे व संबंधीत गावच्या नागरिकांनी आभार मानले आहे.

No comments:
Post a Comment