महाराष्ट्र लोकसेवा आयोगातून लेखापाल पदी निवड
रांजणगाव देशमुख(प्रतिनिधी):-
कोपरगाव तालुक्यातील बहादराबाद येथील महेश कचेश्वर पाचोरे यांची
महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्याकडून घेतल्या गेलेल्या परीक्षेमधून लेखापाल
पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा रांजणगाव देशमुख येथील ग्रामस्थांच्या वतीने
त्यांचा सत्कार करण्यात आला.
कोपरगाव तालुक्यातील दुष्काळ ग्रस्त भागातील बहादराबाद येथील महेश पाचोरे
हे सामान्य शेतकरी कुटुंबातून असून मेहनत व जिद्दीच्या बळावर या यशापर्यंत
पोहोचलो असल्याचे प्रतिपादन त्यांनी आपल्या मनोगतातून केले.
पाचोरे हे
रांजणगाव देशमुख येथील
जावई असल्याने व ग्रामीण भागातील तरुणही स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून
आपले करियर करत असल्याने इतरांना त्यांचे मार्गदर्शन मिळावे म्हणून त्यांना
सत्कारासाठी आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी रांजणगाव देशमुख येथील
सरपंच संदीप रणधीर, उपसरपंच बाबासाहेब गोर्डे,
माजी पोलीस पाटील निवृत्ती गोर्डे,
भाऊसाहेब खालकर, पोलीस पाटील राजेंद्र शेटे, रवींद्र खालकर, प्रकाश गोर्डे,
कुणाल देशमुख, अशोक वामन, बाळासाहेब वामन, सोमनाथ खालकर, संपत सोनवणे,
श्रावण खालकर, सचिन खालकर, सुरेश खालकर, धनंजय वर्पे, त्र्यंबक वर्पे,
योगेश चव्हाण, संजय गोर्डे, शरद देशमुख, अजित गुडघे, सौरभ वामन, किशोर
शिंदे, गावातील क्रिकेट संघ, विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष व सभासद
तसेच ग्रामस्थ हजर होते.
(फोटो ओळी- कोपरगाव
तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथे लेखापाल पदी निवड झाल्याबद्दल महेश
पाचोरे यांचा सत्कार करण्यात आला. छाया- गोरक्षनाथ वर्पे)
No comments:
Post a Comment