रांजणगाव देशमुख(प्रतिनिधी):-
कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथे
गावातील तरुणांच्या वतीने दिनांक ५ डिसेंबर ते १६ डिसेंबर २०१८ दरम्यान
भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी प्रथम,
द्वितीयव तृतीय अशी बक्षिसेही देण्यात येणार आहेत.
रांजणगाव देशमुख येथे बस स्टँडच्या पाठीमागे या स्पर्धांचे आयोजन केले
असून दिनांक ५ डिसेंबर पासून या स्पर्धांना सुरुवात झाली आहे. विजेत्या
संघांसाठी
१११११ रुपयांचे
प्रथम बक्षीस नसिरा पोल्ट्री फार्म, पुणे
यांच्याकडून, ७७७७ रुपयांचे द्वितीय बक्षीस बाबासाहेब रणधीर यांच्याकडून,
५५५५ रुपयांचे तृतीय बक्षीस यदृच्छा पेट्रोलियम व कपिला ऍनिमल हेल्थकेअर
प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून, ४४४४ रुपयांचे चतुर्थ बक्षीस गनीभाई सय्यद
व अक्षय वर्पे यांच्याकडून तर ३३३३ रुपयांचे पाचवे बक्षीस किरण व सचिन
वर्पे, एस के ट्रान्सपोर्ट यांच्याकडून जाहीर करण्यात आले आहे.
या स्पर्धांच्या उदघाटनाच्या वेळी निवृत्ती गोर्डे, सरपंच संदीप रणधीर,
उपसरपंच बाबासाहेब गोर्डे, पोलीस पाटील राजेंद्र शेटे, रामनाथ विठ्ठल
खालकर, सोमनाथ खालकर, गणेश जनार्दन खालकर, डॉ. अरुण गव्हाणे, अजित गुडघे,
विलास रणधीर, चंद्रभान ठोंबरे, प्रकाश गोर्डे, धनंजय वर्पे, बाळासाहेब
गोर्डे,
रावसाहेब खालकर, सुभान सय्यद, प्रशांत दिघे, सचिन शिंदे, नानासाहेब वर्पे,
संतोष बिडवे, सचिन खालकर, निलेश खालकर, विशाल गोर्डे, आप्पा वर्पे,
त्र्यंबक वर्पे, अलिशान सय्यद आदींसह ग्रामस्थ हजर होते.
(फोटो ओळी- रांजणगाव देशमुख येथे क्रिकेट स्पर्धांच्या उदघाटनादरम्यान उपस्थित मान्यवर व क्रिकेट संघ. छाया- गोरक्षनाथ वर्पे)
No comments:
Post a Comment