बहादराबाद येथे डिजीटल क्लासरुम चे उदघाटन व वार्षिक स्नेहसंमेलन
शिर्डी लाईव्ह (प्रतिनिधी)
जिल्हा परिषद शाळेत सर्वसामान्यांची मुले शिकत आहे. नगर
जिल्ह्यात दोन वर्षात जिल्हा परिषद शाळामध्ये मोठा बदल झाला आहे. जिल्हा
परिषदेच्या शाळांकडे बघण्याचा दृष्टाकोण बदलविणे गरजेचे आहे. इंग्रजी
माध्यामापेक्षा मराठी माध्यमाच्या शाळा सरस आहेत. जिल्ह्यात कोपरगाव व
जामखेड तालुक्यात मोठा बदल झाला आसुन हे तालुके सर्वात पुढे आहेत. पटसंख्या
फक्त टिकुनच न रहाता वाढ होत आहे ही बाब नगर जिल्ह्यला नक्कीच भुषणावह आहे. शिक्षकांनी मनाची खुणगाठ बांधली आहे. कोपरगावचे प्राथमिक शिक्षण विभागाचे
काम राज्याला पथदर्शी आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे
यांनी केले.
ते कोपरगाव
तालुक्यातील बहादराबाद येथे जिल्हा परिषद शाळेच्या डिजीटल क्लासरुम चे
उदघाटन व वार्षिक स्नेहसंमेलनानिमीत्त आयोजीत सांज चिमण पाखरांच्या या
कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी
पंचायत समीती सभापती अनुसया होन, माजी सभापती सुनिल देवकर, साई संस्थानचे
माजी विश्वस्त सचिन तांबे, गटशिक्षणाधिकारी शबाना शेख, केंद्रप्रमुख आर
.के.ढेपले, सरपंच विक्रम पाचोरे,डॅा अरुण गव्हाणे, जवळकेचे सरपंच बाबुराव
थोरात, रोहीदास होन, अजित पाचोरे आदि प्रमुख उपस्थित होते.
यावेळी
बोलतांना सचिन तांबे म्हणाले कि, शिक्षणाबरोबर संस्कार झाले पाहीजे ते काम
बहादराबादच्या शाळेत सुरु आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेऊन अनेक जण
मोठ्या पदावर काम करत आहेत.
सुनिल
देवकर म्हणाले कि, जिल्हा परिषदेच्या शाळा इंग्रजी माध्यमांच्या पुढे
आहेत. जिल्ह्यात आजपर्यतं जे जे मोठे लोक होउन गेले त्या सर्वांचे शिक्षण
जिल्हा परिषदेच्या शाळेतच झालेले आहेत.
प्रास्ताविकात
बोलतांना मुख्याध्यापिका स्वाती गुळवे म्हणाल्या कि, आम्ही ग्रामस्थ व
पालकांच्या मदतीने शाळा सुंदर बनविली आहे. येथे विद्यार्थ्यांना सर्वागिण
शिक्षण देण्यावर आमचा भर आसतो. शाळेच्या पटवाढीवर आम्ही भर दिला २२ वरुऩ आता ४२ पट केला. शाळेच्या विकासासाठी लोकसहभागाचे अहवान करताच पालकांनी मदत
केली.दिड लाख रुपये लोक सहभाग मिळवुन शाळा डीजीटल केली. डीजीटल क्लासरुम उभी
राहीली. सर्व मुलांचे वाढदिवस आम्ही शाळेत साजरे करतो. पालक वाढदिवसाला इतर
खर्च करण्याएवजी शाळेला मदत करतात.
शाळेला
आजपर्यंत सरपंच विक्रम पाचोरे व ग्रामसेवक अहमद शेख यांनी एक- एक टीव्ही
संच, लोणी येथील डॅा गुळवे यांनी डिजीटल साऊंड सिस्टीमं, बाळासाहेब पाचोरे व
अजित पाचोरे यांनी प्रिंटर तर जिओ कंपनीने शाळेला प्रोजक्टर दिले. सचिन
तांबे यांनी संगणक संच दिला आहे.
यावेळी चार वर्षात शाळेचा सर्वांगीण विकास केल्यामुळे मुख्याध्यापिका स्वाती गुळवे यांना ग्रामस्थानी आदर्श शिक्षका म्हणून गौरविले
यावेळी
सांज चिमण पाखरांची या कार्यक्रमाअंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध
कलागुण सादर केले. यात नाटीका, देशभक्तीपर गिते, चित्रपट गिते, धार्मिक
गिते, मराठमोळी लावणी, वात्रटीका आदि बहारदार कार्यक्रम सादर करुन प्रेक्षकांना खिळवुन ठेवले होते. यात अनेकांनी बक्षीसे देऊन विद्यार्थ्यांच्या
कलागुणांना दाद दिली.
प्रास्ताविक
शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती गुळवे यांनी केले तर आभार सरपंच विक्रम
पाचोरे यांनी मानले. यावेळी सुत्रसंचालन संतोष रहाटळ व श्रीकांत रहाणे यांनी
केले.
यावेळी शिक्षीका मंगला गोपाळे सचिन आढागंळे, अभिजीत आगलावे, विलास गवळी, रामदास
गव्हाणे, निवृत्ती बढे, गणेश पाचोरे, सातपुते, नंदु दिघे, सुभाष पाचोरे, कल्पना पाचारणे, बाळासाहेब गुंजाळ, अनिता नेहे आदिसह
ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटोओळी-बहादराबाद
ता कोपरगाव येथे स्नेहसंमेलनानिमीत्त आयोजीत सांज चिमण पाखरांच्या या
कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.




No comments:
Post a Comment