Tuesday 25 June 2019

तळेगाव दिघेत कालवा कृती समितीचे वकील अजित काळे यांचा ३० जूनला सत्कार



जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे राहणार उपस्थित
शिर्डी लाईव्ह (प्रतिनिधी)
                             उत्तर नगर जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त १८२ गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे प्रकल्पाचे कालव्यांचे काम निळवंडे कालवा कृती समितीने ज्या वकिलांच्या मोफत विधी सेवेने मार्गी लावले ते विधिज्ञ अजित काळे यांचा सत्कार निळवंडे कालवा कृती समितीने तळेगाव दिघे येथे येत्या रविवार दि.३० जून रोजी सकाळी दहा वाजता माहेर मंगल कार्यालयात प्रसिद्ध जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमास लाभधारक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कालवा कृती समितीचे नेते रमेश दिघे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. 
                             सदरचे सविस्तर वृत्त असे की, उत्तर नगर जिल्ह्यातील सात तालुक्यातील दुष्काळी १८२ गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे प्रकल्पाचे कामास निधी मिळण्याचा मार्ग निळवंडे कालवा कृती समितीचे कार्यकर्ते  विक्रांत काले व पत्रकार नानासाहेब जवरे यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जाऊन विधिज्ञ अजित काळे यांच्या मार्फत जनहित याचिका क्रं.१३३-२०१६ अन्वये मोकळा केला असताना अकोले तालुक्यातील लोकप्रतिनिधीस पुढे करून उत्तरेतील काही राजकीय नेत्यांनी अकोले तालुक्यातील ० ते २८ की. मी. तील काम अवैधरित्या बंद करून दुष्काळी शेतकऱ्यांवर  अन्याय केला होता. त्या बाबत निळवंडे कालवा कृती समितीने सातत्याने आवाज उठवून जनतेला जागे करण्याचे काम केले होते. निळवंडे कालवा कृती समितीने अकोलेतील बंद काम चालू करण्यासाठी दीड वर्ष संघर्ष करून उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खण्डपीठाचे आदेश ३ मे ला मिळविले २७ मे रोजी न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी तळेगाव दिघे येथे कालवा कृती समीतीने २७ मे रोजी मोठे आंदोलन केले त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दहा जून हि अखेरची तारीख काम चालू करण्यासाठी दिली होती. नंतर १४ जून रोजी  औरंगाबाद खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी करताना न्यायालयाने मागील तीन मे च्या आदेशाची अंमलबजावणी केली की नाही याची खातरजमा करत अकोलेतील कालव्यांचे काम सलग विना अडथळा सुरु ठेवण्याचे आदेश दिले होते. या सर्व प्रक्रियेत निळवंडे कालवा कृती समितीस औरंगाबाद उच्च न्यायालयाचे वकील संघाचे तत्कालीन अध्यक्ष अजित काळे यांचे मोफत विधी सहाय्य लाभले होते. त्यातून उतराई होण्यासाठी निळवंडे कालवा कृती समितीने त्यांचा सत्कार करण्याचा निर्णय तळेगाव दिघे येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत एकमुखाने केला आहे. त्यानुसार हा सत्कार कार्यक्रम संपन्न  होत आहे. या कार्यक्रमास १८२ गावातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन रमेश दिघे, कालवा कृती समितीचे कार्याध्यक्ष मच्छीन्द्र दिघे, पाटीलबा दिघे, डॉ.आर. पी.दिघे, भाऊसाहेब दिघे, उत्तमराव जोंधळे, दत्तात्रय आहेर, शिवनाथ आहेर, अशोक गांडूळे, विठ्ठलराव पोकळे, संतोष तारगे, चंद्रकांत कार्ले, विधिज्ञ योगेश खालकर, दिलीप खालकर, शिवाजी जाधव, बाळासाहेब सोनवणे, आबासाहे सोनवणे, दत्तात्रय चौधरी,आदिनी केले आहे.

चौकट-सदर कार्यक्रमात वकील अजित काळे यांना कालवा कृती समितीच्या वतीने "कृषिरत्न"या पुरस्काराने प्रसिद्ध जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे यांच्या हस्ते गौरविण्यात येणार असून त्यावेळी पुरंदरे यांचे सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील पाणी पूर्वेस वळविण्याबाबत व्याख्यान संपन्न होणार आहे.



No comments:

Post a Comment