Wednesday 12 June 2019

कासारे नंतर रांजणगावही सरसावले ! पुढा-यांना गावबंदी


निळवंडेचे कामात राजकीय खोडा, रांजणगावला पुढा-यांना गावबंदी
कासारे नंतर रांजणगावही सरसावले !
शिर्डी लाईव्ह(प्रतिनिधी) :-
                                   निळवंडे धरणाचे काम  पुर्ण झाले आसुन कालव्यांची कामे अपुर्ण आहेत. 182 गावांचा निळवंडे धरणाचे पाणी हा जिवन मरणाचा प्रश्न आहे. सातत्याने लाभधारक शेतकरी पाण्याची मागणी करत आहे. मात्र आश्वासनापलीकडे काही झालेच नाही. आता काम होण्याची चिन्हे दिसत आसतांना त्यालाही काहीजण अडचण निर्माण करत आहेत. आता कालव्यांची कामे तातडीने करुन लाभधारक शेतक-याच्या शेतात पाणी द्यावे अशी मागणी शेतक-यांची आहे.या प्रश्नासाठी संगमनेर तालुक्यातील कासारे यांनी यापुर्वीच पुढा-यांना गाव बंदी केली आहे. कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथेही मंगळवारी विशेष ग्रामसभा घेऊन यापुढे सर्वच राजकिय पक्षांच्या पुढा-यांना  गावबंदी करण्याचा व येणा-या मतदानावर बहीष्कार टाकण्याचा
निर्णय घेण्यात आला. यावेळी सर्वांनी गावात पुढा-यांना गावबंदी करुन मतदानावर बहीष्कारची व गावच्या निर्णयावर ठाम राहण्याची शपथ घेतली. रांजणगावात इतर गावांच्या पुढा-यांना याबात हस्तक्षेप न करु देण्याबरोबरच राजकिय पुढा-यांकडे कोणाही जाऊच नये असाही निर्णय घेण्यात आला.
                                  कासारे गावातील शेतकऱ्यांनी राजकीय नेत्यांना वैतागून फेब्रुवारीत  सर्वपक्षीय पुढाऱ्यांना गावबंदी करून पहिली चपराक लगावली होती. त्याची दखल राष्ट्रीय वृत्त वाहिन्यांनी दखल घेतली होती. आजही राज्य व देश पातळीवरील वृत्त वाहिन्या कासारे गावात ठाण मांडून आहेत. काम चालू करण्यासाठी कुठलेही प्रयत्न केलेले नाही त्यामुळे जनतेत मोठा असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथील तरुण शेतकरी अस्वस्थ होते त्यांनी २६ मे रोजी कोपरगावच्या  दुष्काळी दौऱ्यानिमित्त आलेल्या विद्यमान लोकप्रतिनिधीस गावात येण्यास मज्जाव केला होता. त्यावेळीच ही नाराजी दिसून आली होती. त्यामुळे तरुण काहीतरी निर्णय घेण्याचा मानसिकतेपर्यंत आले होते. निळवंडे धरणावर या नेत्यांनी केवळ अनेक वर्षे फक्त राजकारणच केले गेले. काम अंतिम टप्यात असतांनाही यावर योग्य तोडगा निघत नाही त्यामुळे आता गावात पुढा-यांना गावबंदी करावी व येणा-या मतदानावरही बहीष्कार टाकावा असा निर्णय रांजणगाव देशमुखच्या विशेष ग्रामसभेत एकमताने घेण्यात आला. सर्वानी हनुमान मंदीरात शपथ घेऊन या निर्णयावर  शिक्कामोर्तब केले.
                                   यावेळी सरपंच संदिप रणधिर, उपसरपंच बाबासाहेब गोर्डे, अॅड योगेश खालकर ,तंटामुक्तीचे अध्यक्ष संतोष वर्पे, प्रकाश गोर्डे, गजानन मते, अनिल खालकर, नानासाहेब वर्पे, धनंजय वर्पे, आत्याभाऊ वर्पे, शिवाजी वामन, विक्रम ठोबंरे, सुरेश देशमुख, कारभारी खालकर, दादासाहेब खालकर, प्रभाकर खालकर, रामभाऊ वर्पे, जालींदर खालकर, सुरेश खालकर, योगेश चव्हाण. भारत देशमुख, जयवंतराव खालकर, रामनाथ सहाणे, दत्तात्रय खालकर, विकास वर्पे, संजय खालकर, संपत खालकर, चंद्रभान खालकर, रंगनाथ वर्पे, विलास वर्पे, सोमनाथ खालकर, दिलीप खालकर, ज्ञानदेव चव्हाण आदिसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

No comments:

Post a Comment