विविध मान्यवरांची उपस्थिती, अंजनापूरचे काम देशासाठी प्रेरणादायी
शिर्डी लाइव्ह (प्रतिनिधी):-
आजकाल झाडे अनेक ठिकाणी लावले जातात परंतु त्याचे शंभर टक्के जतन होत नाही. याला अंजनापूर अपवाद आसुन या गावात गेल्या पाच वर्षापासुन वृक्षलागवडीची चळवळ वृक्षवेध फाऊंडेशनच्या माध्यमातुन व गावातील युवक व आबालवृध्दांच्या सहकार्याने सुरु आहेत. या गावाने फक्त झाडे लावलीच नाही तर ती शंभर टक्के जगविली आहेत. येथील युवकांचे काम दिपस्तंभासारखे आहे. हे काम राज्यातील इतर गावांना नक्कीच प्रेरणादायी आहे असे मत अनेक मान्यवरांनी कोपरगाव तालुक्यातील अंजनापुर येथे व्यक्त केले.अंजनापुर येथे 2015 साली ४५ झाडे लावुन वृक्षलागवडीची सुरुवात वृक्षवेध फाऊंडेशन व ग्रामस्थांच्या मदतीने झाली मागील चार वर्षात २१५२ झाडे लावली ती शंभर टक्के जगविली आहेत यावर्षी ७३३ झाडांची लागवड करण्यात आली आसुन आता २८८५ झाडांचे रोपण झाले आहे. गावात सहा जुलै ते 9 जुलै या कालावधीत वृक्षलागवड करण्यात आली. या वृक्षलागवड सप्ताहच्या शेवटच्या दिवशी डॅा अलका नितु मांडके, उद्योजक ऑलिव्हर ग्युबर्ग, प्रशांत जोशी, एच.डी एफ सी बॅंकेच्या सी एस आर फंडाच्या देशाच्या प्रमुख श्रीमती नुसरत पठाण, डॅा प्रकाश माधव, राजा उपाध्यय, श्रीमती शाईन इंदुलकर, जयवंत गडाख, कृषी विकास संस्थेचे अमीत नाफाडे, सुमन ठाकुर, अमोल जाधव, स्वाती शाळीग्राम, डॅा सरोज मेहेत्रे, डॅा अजित कुलकुर्णी, आदि प्रमुख उपस्थित होते. अध्यक्षस्थानी बापुसाहेब गव्हाणे होते.
यावेळी उपस्थितांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी बोलतांना उद्योजक ऑलिव्हर ग्युबर्ग म्हणाले कि, झाडाशिवाय जिवन अशक्य आहे. अंजनापुरकरानी सर्व झाडे जगवुन इतिहास निर्माण केला आहे. हे काम नक्कीच इतरांना प्रेरणादायी आहे.
डॅा. अलका मांडके म्हणाल्या कि,मला इथे आल्यानंतर उर्जा मिळाली आहे. आता यापुढे वारंवार येथे येत राहणार असुन या कामात सहभागी होणार आहे.
नुसरत पठाण म्हणाल्या कि, या गावातील सामाजीक उपक्रमाचां आम्ही एक भाग आहोत याचा आम्हा सर्वांना अभिमान आहे.
अमीत नाफाडे म्हणाले कि, सामाजिक कामात अंजनापुरच्या युवकांचा सहभाग हा फार मोठा असतो. येणा-या काळात लोक आता राळेगणसिध्दी,हिवरे बाजार नंतर आता अंजनापुर पाहण्यासाठी नक्की येतील.
यावेळी एच.डी.एफ.सी बॅंक व कृषी विकास संस्था मलकापुर यांच्या वतिने हवामान केंद्राचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करुन ते वृक्षनेध फाऊंडेशन कडे हस्तातरीत करण्यात आले. यामुळे परीसरातील 25 किमी त्रिज्येतील हवामान अंजनापुरच्या शेतक-यांना एसएमएस ने कळणार आहे. यावेळी वृक्षसेवकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी वृक्षवेधचे सर्व युवक व ग्रामस्थ उपस्थित होते.


Gr8 work
ReplyDeleteमा. बाबासाहेब गव्हाणे सर,
ReplyDeleteसेवा फाऊंडेशन,
केशवसृष्टी फाऊंडेशन विलेपारले मुंबई ,या सामाजिक संस्थांशी निगडीत मुंबईहुन आवर्जुन आपला ग्रामविकास बघण्यासाठी आलेल्या डाॅं अलका मांडके भुलतज्ञ मुंबई
(जगविख्यात हृदयरोग शल्यविशारद स्व.डाॅ. नितु मांडके यांच्या सुविद्य पत्नी)
डाॅ.सरोज महेत्रा , फ्रांस येथून आलेले आॅलिव्हर साहेब,तसेच पुणे येथुन छत्रपती पुरस्कार विजेते डाॅ. प्रकाश शेठ यां
प्रतिष्ठिता मंडळींनी ९जुलै २०१९ रोजी आपल्या अंजनापुर या दुष्काळग्रस्त गावाला भेट दिली आणि गावातील तरूण विद्यार्थ्यांबरोबर हितगुज केले ही एक विशेष आगळीवेगळी चळवळ अंजनापुर गावात होऊ पहात आहे ही मला व्यक्ती:श अभिमानाची आणि सुखदायक वाटते.
अंजनापुर सारख्या छोट्या गावात पुढाकार घेत आपल्या सारखा एका यशस्वी उद्योगपती च्या मार्गदर्शनाखाली हिरहीरीनं कार्यरत असलेली ही युवाप्रेरणा खुपच प्रशंसणीय आहे.
ही सर्व प्रतिष्ठित मंडळी आपल्या गावातील सामाजिक एकजुटीने काम करण्याचे सुसुत्रीकरण बघुन थक्क झाले. केवळ
५ वर्षात २९०० झाडांचे रोपण/ संगोपण करून हे करत असतानाच संयोजितवृत्ती आणि श्रमदानाने केलेले बांध ,धरण नालेखोदाई ,डिजीटल प्राथमिक शाळा,बायोगॅस , हवामान सुचीसाठी २५कीमी. रेंजचे अद्यावत डाॅपलर तंत्रज्ञान (शेतकर्यांना पाऊस ,वारा,तापमान , आद्रता याची पुर्वसुचना मिळण्याचा फायदा या सोयी HDFC बॅंकेमार्फत मिळविनं )यासारखी इतरही मोलाची धोरणी पुरक कामे स्थानिक राजकारणास शह देत गावकर्यांच्या हितासाठी तरूणांना प्रेरित करन्याचे परमोच्च सामाजिक काम आपल्या हातून घडत असल्याचे जाणवले. तसे खाजगीबैठकीत सर्व उपस्थित पाहुण्यांनी व्यक्त केले.
मुख्:यता मुंबईहुन आलेले HDFC बॅ्केचे corporate business manager श्री. उपाध्याय सर यांनी हेरलेले आपल्या गावातील तरूणांची(मोबाईल ला स्पर्श न करता ३ तासांच्या संपुर्ण कार्यक्रमात सामील होणे) विशिष्ठ प्रणाली ची प्रशंसा आजमितीस वाखाणन्यायोग्य असुन हे उदाहरण ईतर खेडेगावातील युवकांसाठी खुप मोलाचे आहे.
आपण ही आपल्या जन्मगावापासुन ४०० कीमी दुर वापी(गुजरात) येथून आपल्या व्यवसायातुन वेळ काढुन या युवकांना नीत्य नियमीत संपर्क ठेऊन प्रेरित करून वृक्षसंवर्धनाचे हे कार्य धडविण्यात यशस्वी होऊ पहात असलेली ही पावती आहे.
फ्रांस येथून आलेले निसर्ग प्रेमी श्री.आॅलिव्हर साहेबांच्या मते येत्या १० वर्षात अंजनापुर गावचा हा विकास पहाता आपले हे गांव नक्कीच जगाच्या नकाशावर उमटेल यात शंका नाही .
गरपाऔताडे विद्यालय पोहेगांव माजी विद्यार्थी श्री बाबासाहेब रहाणे हे वापीहुन आपल्या ३०० लोकवस्ती असलेल्या अंजनापुर गावाच्या सामाजिक विकासासाठी आत्मीयतेने झटतात हे आम्हा रयत शिक्षण संस्स्थेतील सर्व माजीविद्यार्थी वर्गासाठी अभिमानाचे प्रतिक आहे.
जगभरातून त्यांच्या कामांची ही प्रशंसा होत असतांना आपल्यापैकीच खेडेगावातुन मराठी माद्यमातुन शिकलेल्या श्रीं बाबासाहेब रहाणे वापी गुजरातस्थित तसेच श्री. संदिप गाडे यांच्यासारखे तरूण उद्योगपती ही सर्व प्रेरणास्थाने /त्यांचा सहवास धडणे हे मी माझे भाग्य समजतो.
आपल्यासह सर्व टिमचे अभिनंदन आणि आपल्या पुढिल कामासाठी मनपुर्वक शुभेच्छार अरविंद औताडे, मुंबई.
अप्रतिम न्यूज तात्या भाऊ।
ReplyDelete