काकडी गावामध्ये एस टी बस आधी
पोहोचले विमान
दुष्काळाचे संकट भीषण ; पायाभूत सुविधांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
रांजणगाव देशमुख:-
अहमदनगर
जिल्ह्यातील ज्या गावात दि. २ मार्च रोजी सकाळी साडे नऊ वाजता पहिले विमान पोहेचले
आणि येत्या काही दिवसात ज्या गावातून प्रवासी घेऊन विमान उड्डान करेल त्या गावात
अजूनपर्यंत महाराष्ट्र शासनाची एस. टी बस पोहचू शकली नाही. हे वास्तव आहे कोपरगाव
तालुक्यातील काकडी या गावाचे एस टी बरोबरच हे गाव सर्वच पायाभूत सुविधांपासून वंचित
आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात काकडी येथे सुरु असलेल्या आंतरराष्ट्रिय दर्जाच्या विमान तळावरून येत्या काही दिवसात विमान उड्डाण करेल असे शासकीय यंत्रणेकडून सांगण्यात आले आहे त्या दृष्टीने येथील तयारीही पूर्ण झालेली असून धावपट्टीचे कामही पूर्ण झाले आहे. संरक्षक भिंतीचे कामही प्रगतीपथावर आहे. पण या गावातील नागरिकांना पायाभूत सुविधा देण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. या गावामध्ये अजून पर्यंत एस टी बस पोहोचू शकलेली नाही. एस टी बसची सोय नसल्यामुळे येथील नागरिकांना तालुक्याच्या गावाला जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. काकडी हे गाव कोणत्याही मोठ्या रस्त्यावर नसून ते कोपरगाव पासून ३० कि मी, राहाता व शिर्डी शहरापासून १२ कि मी आतमध्ये आहे. सुमारे १५ वर्षांपूर्वी कोपरगाव- काकडी अशी मुक्कामी बससेवा सुरु होती पण कालांतराने ही बससेवा बंद करण्यात आली. या गावामध्ये अजूनपर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु होऊ शकले नाही. त्यामुळे येथील नागरिकांना आरोग्य सेवा घेण्यासाठी शिर्डी, राहाता येथील खाजगी दवाखाण्यावर वर अवलंबून रहावे लागते.
गावामध्ये पिण्याच्या पाण्याची
कोनतीही शाश्वत योजना अजूनपर्यंत शासनाने हाती घेतलेली नाही. अजूनही येथील
नागरिकांना पाण्यासाठी tankar ची प्रतीक्षा करावी लागते. गावामध्ये पाण्याची
परिस्थिती भीषण असून पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्ताना मैलोनमैल भटकंती करावी लागत
आहे. गावात ग्रामपंचायतजवळ एक कुपनलिका असून ती दिवसाआड चालू करण्यात येते. अगदी
रात्री ३ वाजेपर्यंत या कुपनलीकेवर पाणी भरण्यासाठी गर्दी असते. सध्या गावासाठी
tankar मंजूर झालेला असून पण पाणी भरण्यासाठी कोठे उद्भवच नसल्याने tankar सुरु
होणेही अवघड असल्याचे ग्रामविकास अधिकारी जी डी कार्ले यांनी सांगितले. विमानतळाला
येनार्या पाण्यातून गावासाठी कायमस्वरुपी पाणी देण्यात यावे व विमानातळावरील
पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी बाहेर वाहून जाऊ न देता पाइपलाइनद्वारे गावातील
तलावात सोडले जावे अशी मागणीही ग्रामस्तानी प्रशासनाकडे केली आहे.
या गावामध्ये दहावीपर्यंत शाळा असून हायस्कुल च्या शाळेला पक्की इमारत नाही. शाळेच्या खोल्यांना भिंतीच्या जागी चटया लावण्यात आलेल्या आहेत. गावात शाळेसाठी पक्या स्वरूपाच्या १० वर्ग खोल्या बांधून देण्यात याव्या अशी मागणी ग्रामास्तानी केली आहे. गावाकडून तालुक्याला जोडणारे तसेच अंतर्गत कोणत्याही प्रकारच्या रस्त्यांची कामे झालेली नाही. गावातील अंतर्गत रस्ते व इतर गावांना जोडणारे सर्व रस्त्यांचे डांबरीकरण व्हावे व गावातील रस्त्यांवर स्टेटलाईट बसवण्यात यावे अशी मागणी ग्रामास्तानी केली आहे. यासंधार्भात सरपंच नानूबाई सोनवणे तसेच ग्रामास्तानी विश्वास पाटील यांच्या भेटीच्या वेळी त्यांच्याशी चर्चा केली असता रत्यासाठी १० कोटी रुपये मंजूर करून हे काम मार्गी लाउ असे अश्वासन दिले आहे. तसेच पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठीही निधी मंजूर केला असल्याचे त्यांनी सांगितले.प्रत्येक वेळेस प्रशासनाकडून केवळ अश्वसानेच दिली जातात कार्यवाही मात्र होत नाही असेही सरपंच नानुबाई सोनवणे यांनी यावेळी सांगितले. गावातील स्मशान भूमीला संरक्षक भिंत बांधून अंतर्गत सुविधा करण्यात याव्या तसेच Dr बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला संरक्षक भिंत बांधण्यात यावी अशी मागणीही ग्रामस्तानी केली आहे. आत्ताच काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकार्यांच्या झालेल्या दौर्याच्या वेळी ग्रामस्तांनी विविध अडचणींचा पाढाच त्यांच्यासमोर वाचला. विमान प्राधिकरणाच्या वतीने गावात फक्त ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयासाठी नवीन इमारत बांधून देण्यात आली आहे.
काकडी गावाची जमीन विमानतळासाठी निश्चीत करून शासनाने येथे शिर्डीत येणाऱ्या भक्तांसाठी विमानतळ बनवले पण येथील शेतकऱ्यांचा विचार केला नाही. येथील अनेक शेतकरी भूमिहीन झाले आहेत. त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न कोण सोडवणार? उद्या या गावातून विमान उड्डाण करेल पण यां गावाच्या पायाभूत सुविधांकडे कोण लक्ष्य देणार हा प्रश्न येथील नागरिकांना कायमच अनुत्तरीत आहे.
दुष्काळाचे संकट भीषण ; पायाभूत सुविधांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
रांजणगाव देशमुख:-
अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात काकडी येथे सुरु असलेल्या आंतरराष्ट्रिय दर्जाच्या विमान तळावरून येत्या काही दिवसात विमान उड्डाण करेल असे शासकीय यंत्रणेकडून सांगण्यात आले आहे त्या दृष्टीने येथील तयारीही पूर्ण झालेली असून धावपट्टीचे कामही पूर्ण झाले आहे. संरक्षक भिंतीचे कामही प्रगतीपथावर आहे. पण या गावातील नागरिकांना पायाभूत सुविधा देण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. या गावामध्ये अजून पर्यंत एस टी बस पोहोचू शकलेली नाही. एस टी बसची सोय नसल्यामुळे येथील नागरिकांना तालुक्याच्या गावाला जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. काकडी हे गाव कोणत्याही मोठ्या रस्त्यावर नसून ते कोपरगाव पासून ३० कि मी, राहाता व शिर्डी शहरापासून १२ कि मी आतमध्ये आहे. सुमारे १५ वर्षांपूर्वी कोपरगाव- काकडी अशी मुक्कामी बससेवा सुरु होती पण कालांतराने ही बससेवा बंद करण्यात आली. या गावामध्ये अजूनपर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु होऊ शकले नाही. त्यामुळे येथील नागरिकांना आरोग्य सेवा घेण्यासाठी शिर्डी, राहाता येथील खाजगी दवाखाण्यावर वर अवलंबून रहावे लागते.
या गावामध्ये दहावीपर्यंत शाळा असून हायस्कुल च्या शाळेला पक्की इमारत नाही. शाळेच्या खोल्यांना भिंतीच्या जागी चटया लावण्यात आलेल्या आहेत. गावात शाळेसाठी पक्या स्वरूपाच्या १० वर्ग खोल्या बांधून देण्यात याव्या अशी मागणी ग्रामास्तानी केली आहे. गावाकडून तालुक्याला जोडणारे तसेच अंतर्गत कोणत्याही प्रकारच्या रस्त्यांची कामे झालेली नाही. गावातील अंतर्गत रस्ते व इतर गावांना जोडणारे सर्व रस्त्यांचे डांबरीकरण व्हावे व गावातील रस्त्यांवर स्टेटलाईट बसवण्यात यावे अशी मागणी ग्रामास्तानी केली आहे. यासंधार्भात सरपंच नानूबाई सोनवणे तसेच ग्रामास्तानी विश्वास पाटील यांच्या भेटीच्या वेळी त्यांच्याशी चर्चा केली असता रत्यासाठी १० कोटी रुपये मंजूर करून हे काम मार्गी लाउ असे अश्वासन दिले आहे. तसेच पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठीही निधी मंजूर केला असल्याचे त्यांनी सांगितले.प्रत्येक वेळेस प्रशासनाकडून केवळ अश्वसानेच दिली जातात कार्यवाही मात्र होत नाही असेही सरपंच नानुबाई सोनवणे यांनी यावेळी सांगितले. गावातील स्मशान भूमीला संरक्षक भिंत बांधून अंतर्गत सुविधा करण्यात याव्या तसेच Dr बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला संरक्षक भिंत बांधण्यात यावी अशी मागणीही ग्रामस्तानी केली आहे. आत्ताच काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकार्यांच्या झालेल्या दौर्याच्या वेळी ग्रामस्तांनी विविध अडचणींचा पाढाच त्यांच्यासमोर वाचला. विमान प्राधिकरणाच्या वतीने गावात फक्त ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयासाठी नवीन इमारत बांधून देण्यात आली आहे.
काकडी गावाची जमीन विमानतळासाठी निश्चीत करून शासनाने येथे शिर्डीत येणाऱ्या भक्तांसाठी विमानतळ बनवले पण येथील शेतकऱ्यांचा विचार केला नाही. येथील अनेक शेतकरी भूमिहीन झाले आहेत. त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न कोण सोडवणार? उद्या या गावातून विमान उड्डाण करेल पण यां गावाच्या पायाभूत सुविधांकडे कोण लक्ष्य देणार हा प्रश्न येथील नागरिकांना कायमच अनुत्तरीत आहे.
काकडी- शिर्डी तीर्थक्षेत्रासाठी
होत असलेल्या विमानतळावर दि. २ मार्च रोजी पहिल्या
विमानाचे आगमन झाले. या गावात
सध्या बस सेवाही सुरु नाही)

No comments:
Post a Comment