शिर्डी लाईव्ह (प्रतिनिधी):-
गुरुवार दिनांक
१३ रोजी सर्वत्रच गणेशाचे उत्साहात आगमन झाले. कोपरगाव तालुक्यातील
रांजणगाव देशमुख येथील साई एज्युकेशन इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये गणेशाची
स्थापना करण्यात आली. यासाठी गेल्या दोन दिवसापासून विद्यार्थी, शिक्षक,
कर्मचारी यांनी परीश्रम घेऊन पुर्ण गणपतीची सजावट, रोषणाई, रांगोळी
ही सर्व तयारी केली. गणेश मूर्ती स्थापनेच्या वेळी साई फाऊंडेशन रांजणगाव
देशमुख चे अध्यक्ष संजय
गोडॅ, उपसरपंच बाबासाहेब गोडॅ, वि.का.सोसायटी चे संचालक प्रकाश गोडॅ, कुणाल
देशमुख, मा. पोलिस पाटील निवृत्ती गोडॅ, साई फाऊंडेशन चे संचालक कैलास
गोडॅ, योगेश चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी गणपतीची आरती माजी
पोलिस पाटील निवृत्ती गोडॅ यांच्या हस्ते करण्यात आली.
No comments:
Post a Comment