वाळकी येथे शिक्षकांचा निरोप समारंभ
रांजणगाव देशमुख(वार्ताहर):-
कोपरगाव तालुक्यातील वेस गावाच्या शेजारील राहता तालुक्यातील वाळकी येथे
बदली झालेल्या शिक्षकांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी
शिक्षक बँकेचे संचालक बाबा खरात, वाळकीच्या सरपंच संध्याराणी शिरोळे,
व्यवस्थापन समिती अध्यक्ष भारत शिरोळे, माजी सरपंच संपतराव शिरोळे, गनीभाई
शेख, तंटामुक्त समितीचे प्रकाश दिघे, पोलीस पाटील शामराव शिरोळे, शामदभाई
शेख, उपसरपंच हमीदा शेख, गोरक्षनाथ शिरोळे, युनूस शेख, भाऊसाहेब शिंदे, आदी
मान्यवर उपस्थित होते.
यावेळी गौरवपत्र, शाल, श्रीफळ देऊन बदली झालेल्या राजेंद्र ठाणगे, बाबा
गायकवाड, उर्मिला ब्राम्हणे, दिलीप बोरुडे, या शिक्षकांना गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीताराम गव्हाणे, यांनी केले. कार्यक्रम
यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक शिवाजी सोनवणे, राजेंद्र दुशिंग, राजू भालेराव,
संदीप हांडे, शांताराम भोसले, संजय वाघमारे आदींनी परिश्रम घेतले.
(फोटो ओळी- वाळकी येथे बदली झालेल्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.)

No comments:
Post a Comment