शिर्डी (प्रतिनिधी) : मराठी पत्रकार परिषद, मुंबई सलग्न कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघ व कोपरगाव तालुका एजुकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानाने उत्तर नगर जिल्ह्यातील पत्रकारांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यशाळा ही कोपरगाव शहरातील के .जे.सोमैया महाविद्यालयातील साकरबेन सभागृहात बुधवार दि.१३ रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष कोपरगाव तालुका एजुकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे असणार आहे. तर प्रमुख अतिथी नाशिक सार्वजनिक वाचनालयाचे सचिव श्रीकांत बेनी, मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस अनिल महाजन, नाशिक जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष यशवंत पवार, कोपरगाव तालुका एजुकेशन सोसायटीचे सचिव अँड.संजीव कुलकर्णी हे राहणार आहे. तसेच कोपरगाव, श्रीरामपूर, संगमनेर, राहाता, अकोले, नेवासा येथील पत्रकार उपस्थित राहणार आहे.
No comments:
Post a Comment