रांजणगाव देशमुख(प्रतिनिधी):-
कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव महसूल मंडळातील रांजणगाव देशमुख सह इतर गावे कोणत्याच दुष्काळ यादीमध्ये न आल्याने येथील शेतकऱ्यांवर मोठा
अन्याय झाला असून ही गावे दुष्काळ यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी उद्या
दिनांक ७ फेब्रुवारी रोजी रांजणगाव देशमुख येथे रास्त रोको आंदोलन करण्यात
येणार आहे. या संदर्भातील पत्र तहसीलदार किशोर कदम यांना देण्यात आले आहे.
पोहेगाव मंडळातील रांजणगाव देशमुख, मनेगाव, बहाद्दरपूर, अंजनापूर, वेस,
जवळके, सोयगाव, धोंडेवाडी, बहादरबाड, काकडी, मल्हारवाडी या गावांमध्ये
तीव्र स्वरूपाचा दुष्काळ असून शेतीचे उत्पन्न शून्य आहे. त्यामुळे या
परिसरातील शेतकऱ्यांना कोणताच आधार नसून प्रशासनाने हि गावे दुष्काळ यादीत
सहभागी न केल्यामुळे शेतकरी वर्गतात मोठी निराशा आहे. दुष्काळी
परिस्थितीमुळे जनावरांना चारा नसून चाऱ्यासाठी येथील अनेक शेतकरी ऊस तोडणीसाठी बाहेर जात आहेत.
त्यामुळे उद्या
दिनांक ७ फेब्रुवारी रोजी रांजणगाव देशमुख येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात
येणार आहे. या आंदोलनासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित रहावे.
--

No comments:
Post a Comment