शिर्डी व परिसरातील बातम्या देणारे संकेतस्थळ संपादक- गोरक्षनाथ वर्पे, शिर्डी, अहमदनगर, महाराष्ट्र.
Wednesday, 21 August 2019
Sunday, 18 August 2019
बहादरपूर येथे गोपाजी बाबांचा यात्रोत्सव
रांजणगाव देशमुख (वार्ताहर):-
कोपरगाव तालुक्यातील श्री क्षेत्र बहादरपूर येथे दि. १८ व १९ ऑगस्ट या दोन दिवस गोपाजी बाबा यांचा यात्रोत्सव होणार असून मोठा वैचारिक वारसा लाभलेल्या बहादरपूर यात्रेत तालुक्यातील तसेच नासिक व नगर जिल्ह्यातील हजारो भाविक हजेरी लावत असतात.
गोपाजी बाबांनी सुमारे २२५ वर्षांपूर्वी पश्चिम बंगाल येथून संजीवनी विद्येचा अभ्यास करून बहादरपूर व परिसरामध्ये मोठे काम करून बहादरपूर येथे समाधी घेतली. तेव्हापासून दर श्रावण महिन्यात हि यात्रा भरते या यात्रेमध्ये सकाळी गोपाजी बाबांची विधिवत पूजा होऊन त्यानंतर पारंपारिक झांजपथक व वाद्यांच्या सहायाने कावडीची सवाद्य मिरवणूक होते दि. १८ रोजी सायंकाळी रथाची मिरवणूक होणार असून यामध्ये सर्वांची उत्सुकुता असलेली फटाक्यांची आतषबाजी होणार आहे. तर दि. १९ रोजी सकाळी ओंकारेश्वर येथून आणलेल्या गंगाजलाची कावडी व मशाल मिरवणूक होणार असून दुपारी कुस्त्यांचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये जिल्ह्यातील नामंवंत कुस्तीपटू हजेरी लावत असतात.या वर्षीचे यात्रेचे नियोजन खकाळे वाड्याकडे असून गावामध्ये व मंदिराला भव्य दिव्य अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे . सुमारे ७० लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेले श्री गोपाजी बाबा यांच्या मंदिराचे बांधकाम पूर्णत्वाकडे जात आहे. या यात्रेमध्ये बहादरपूर व परिसरातील सर्व स्तरातील लोक सहभागी होत असतात. तर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात भाविक हजेरी लावत असतात.
शिष्यवृत्ती परीक्षेत शहापूर च्या विद्यार्थ्यांचे यश ; शिक्षक सैंदाणे यांचा सत्कार
शिर्डी लाईव्ह (प्रतिनिधी):-
कोपरगाव तालुक्यातील शहापूर जिल्हा परिषद शाळेच्या श्री सैदाणे यांचा नाशिक चे विभागीय आयुक्त श्री. राजाराम माने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शिष्यवृत्ती परीक्षेत शहापूर शाळेतून विद्यार्थ्यांची निवड झाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला.
श्री सैंदाने यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी माने यांच्या हस्ते सत्कार
सैंदाने यांचा शाळांच्या विविध उपक्रमांमध्ये नेहमीच पुढाकार
शिर्डी लाईव्ह (प्रतिनिधी):-
कोपरगाव तालुक्यातील शहापूर शाळेचे तंत्र स्नेही मुख्याध्यापक श्री. सैंदाने सर यांचा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांच्या विविध उपक्रमांमध्ये नेहमीच पुढाकार असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
त्यांनी तालुक्याच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने यांना कोपरगाव तालुक्याची एक दिशा दर्शक वाटचाल नावाचे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन सादर केले. यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला.
संवत्सर येथे तालुका स्तरीय कार्यशाळेस माने यांनी भेट दिली. सदर प्रसंगी त्यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. प्रत्येक शिक्षकाने तंत्र स्नेही व्हायला हवे असे मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले. यावेळी तालुका गटशिक्षणाधिकारी श्रीमती शबाना शेख यांनी प्रास्तविक सादर केले. आभार श्री आर के ढेपले यांनी मानले.
शिर्डी लाईव्ह (प्रतिनिधी):-
कोपरगाव तालुक्यातील शहापूर शाळेचे तंत्र स्नेही मुख्याध्यापक श्री. सैंदाने सर यांचा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांच्या विविध उपक्रमांमध्ये नेहमीच पुढाकार असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.त्यांनी तालुक्याच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने यांना कोपरगाव तालुक्याची एक दिशा दर्शक वाटचाल नावाचे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन सादर केले. यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला.
संवत्सर येथे तालुका स्तरीय कार्यशाळेस माने यांनी भेट दिली. सदर प्रसंगी त्यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. प्रत्येक शिक्षकाने तंत्र स्नेही व्हायला हवे असे मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले. यावेळी तालुका गटशिक्षणाधिकारी श्रीमती शबाना शेख यांनी प्रास्तविक सादर केले. आभार श्री आर के ढेपले यांनी मानले.
Thursday, 15 August 2019
शहापूर शाळेस लोक सहभागातून अनेक कामे
पालकांचे भरीव योगदान
शिर्डी लाईव्ह(प्रतिनिधी):-
कोपरगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शहापूर शाळेत लोकसहभागातून अनेक कामे करण्यात आली असून यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना अनेक सोयी उपलभ झाल्या आहेत.
शाळा व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्यांनी मिळून शाळेतील पिण्याच्या
टाकीसाठी शाळेस योगदान दिले आहे. तसेच गावातील साई संकल्प ग्रुप
यांच्याकडून शाळेस २० लेझीम व राष्ट्रीय महापुरुषांचे फोटो मिळाले आहेत.
शाळा व्यवस्थापन समिती व मुख्याध्यापक श्री सैंदाने सर यांच्या वतिने
त्यांचा २६ जाने २०१९ च्या कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात आला.
गावातील सरपंच ग्रामसेवक यांनी शाळेसाठी योगदान देणारांचे आभार मानले. तसेच केंद्र प्रमुख श्री. ढेपले साहेब व गटशिक्षणाधिकारी शबाना शेख यांनी लोकसहभागाबद्दल शाळेचे व पालकांचे अभिनंदन केले.
लोकसहभागातून शहापूर शाळा डिजिटल
शिक्षकांच्या परिश्रमांना यश
शिर्डी लाईव्ह(प्रतिनिधी):-
कोपरगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शहापूर शाळेने लोकसहभागातून
शाळेतील सर्व वर्ग डिजिटल केले आहेत. गावातील पालकांच्या सहकार्याने ५४
हजार एवढी लोकवर्गणी जमा करून त्यातून शाळेस प्रोजेक्टर, एल इ डी घेतला.
लोकसहभागासाठी शाळेतील मुख्याध्यापक श्री सैंदाने सर व सोनवणे मॅडम यांनी
अथक परिश्रम घेतले. तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. राहुल घारे यांनीही सहकार्य केले.
वर्ग
डिजिटल केल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थीही इंग्रजी माध्यमाच्या
शाळांतील विद्यार्थ्यांसारखे शिक्षण घेऊ शकतात. व विद्यार्थ्यांना दृक
श्राव्य शिक्षण दिल्याने त्यांच्या आंतरिक कलागुणांना मोठी चालना मिळणार
आहे.
सरपंच श्री दिपक खंडीझोड यांनी शिक्षकांचे खूप खूप
आभार मानले. शाळा डिजिटल केल्याने केंद्र प्रमुख श्री ढेपले साहेब यांनी
शाळेच्या शिक्षकांचे कौतुक केले. सदर कार्यक्रमासाठी गटशिक्षणाधिकारी
श्रीमती शबाना शेख मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.
शिष्यवृत्ती परीक्षेत शहापूर शाळेचे भरघोस यश ; सहा विद्यार्थी गुणवत्ता यादीत
शिर्डी लाईव्ह(प्रतिनिधी):-
सन २०१७ - २०१८ मध्ये झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांनी भरघोस यश
मिळवले असून कोपरगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शहापूर या शाळेतील
इयत्ता पाचवी चे सहा विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत. सन २०१७ - २०१८ मध्ये
झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांनी भरघोस यश मिळवत शाळेचे
नावही मोठे केले आहे.
शहापुर शाळेचा निकाल १०० % लागला असून. ह्या शाळेतील शिक्षक श्री. सैंदाने ज्ञानेश्वर पांडुरंग यांनी वर्षभर तासिकांचे नियोजन करून विद्यार्थ्यांचा सराव करून घेतला. तसेच परीक्षा घेऊनही प्रयत्न केले. सादर प्रसंगी
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.नितीन पाचोरे यांनी शाळेचे
मुख्याध्यापक श्री. सैंदाने सर यांचे कौतुक केले. तसेच सदर परीक्षेस
केंद्रप्रमुख श्री ढेपले सर यांचे मार्गदर्शन लाभले. गटशिक्षणाधिकारी
श्रीमती शबाना शेख मॅडम यांनी शाळेचे कौतुक करून पुढील कार्यास शुभेच्छा
दिल्या.
Subscribe to:
Posts (Atom)



