Wednesday, 21 August 2019

कारवाडी- वडाची वाडी येथे भागवत सप्ताहाचे आयोजन


शिर्डी लाईव्ह (प्रतिनिधी):-
                   कोपरगाव तालुक्यातील कारवाडी- वडाची वाडी येथे बुधवार दिनांक २१ ऑगस्ट ते बुधवार दिनांक २८ ऑगस्ट या कालावधीमध्ये भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तने व प्रवचने होणार आहेत.
                  दिनांक २१ ऑगस्ट रोजी रामायणाचार्य सुखदेव महाराज चव्हाण, दिनांक २२ रोजी प्रसन्नकुमार महाराज धामने, दिनांक २३ रोजी अनिल महाराज जमधडे, दिनांक २४ रोजी भागवताचार्य अनिल महाराज तुपे, दिनांक २५ रोजी शिवचरित्रकार प्रवीण महाराज दुशिंग, दिनांक २६ रोजी संजीवनीताई गडाख, दिनांक २७ रोजी स्वरगंधर्व बाळासाहेब महाराज रंजाळे, यांची कीर्तने होणार आहेत. तर दिनांक २८ ऑगस्ट रोजी संगीत भागवताचार्य नामदेव महाराज शाश्री यांचे काल्याचे कीर्तन होणार असून त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे.

                   सप्ताह काळात सकाळी ४ ते ६ काकडा, ६ ते ११ ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी ३ ते ४ भजन, सायंकाळी ५ ते ६ ज्ञानेश्वर प्रवचन, सायंकाळी ६ ते ७ हरीपाठ, रात्री ९ ते ११ कीर्तन व नंतर हरिजागर असे कार्यक्रम असणार आहेत. दि २८ ऑगस्ट रोजी सप्ताहाची सांगता होणार असून सकाळी कीर्तनानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. या सप्ताहात गावातील तसेच नोकरी व्यवसायानिमित्त बाहेर असलेले सर्वच ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात. या कार्यक्रमाचा परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा असे कारवाडी- वडाची वाडी ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात आले आहे. 

No comments:

Post a Comment