Sunday, 18 August 2019

श्री सैंदाने यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी माने यांच्या हस्ते सत्कार

सैंदाने यांचा शाळांच्या विविध उपक्रमांमध्ये नेहमीच पुढाकार

शिर्डी लाईव्ह (प्रतिनिधी):-
                                    कोपरगाव तालुक्यातील शहापूर शाळेचे तंत्र स्नेही मुख्याध्यापक श्री. सैंदाने सर यांचा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांच्या विविध उपक्रमांमध्ये नेहमीच पुढाकार असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

                                    त्यांनी तालुक्याच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने यांना कोपरगाव तालुक्याची एक दिशा दर्शक वाटचाल नावाचे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन सादर केले. यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला.

                                   संवत्सर येथे तालुका स्तरीय कार्यशाळेस माने यांनी भेट दिली. सदर प्रसंगी  त्यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. प्रत्येक शिक्षकाने तंत्र स्नेही व्हायला हवे असे मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले. यावेळी तालुका गटशिक्षणाधिकारी श्रीमती शबाना शेख यांनी प्रास्तविक सादर केले. आभार श्री आर के ढेपले  यांनी मानले.

No comments:

Post a Comment