शिर्डी लाईव्ह- प्रतिनिधी :-
कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथेही तालुक्याच्या कृषी
विभागामार्फत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. शेतकऱ्यांना कृषी
विभागाच्या विविध योजना, पिकांवरील कीड नियंत्रण, तसेच कापसावरील बोंड अळी
नियंत्रणासाठी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात सरपंच
संदीप रणधीर, उपसरपंच बाबासाहेब गोर्डे, ग्रामविकास अधिकारी शेख, कृषी
सहाय्यक किरण शिंदे, ग्रामपंचायत सदस्य, चंद्रभान शिंदे, चंद्रभान
गोर्डे, वीरेंद्र वर्पे, प्रकाश गोर्डे, हरिभाऊ गुडघे, अजित गुडघे, नितीन
गोर्डे, भाऊसाहेब गोर्डे, सुनील गोर्डे, अरुण वर्पे, रावसाहेब ठोंबरे,
भाऊसाहेब पवार आदि शेतकरी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमानंतर प्रत्यक्ष
कपाशीच्या शेतात जाऊन कृषी सहाय्यक किरण शिंदे यांनी शेतकऱ्यांना फेरोमन
ट्रॅप
लावण्याचे
व
बोंड अळी नियंत्रणासाठी मार्गदर्शन केले.
फोटो - कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथे डॉ. विठ्ठलराव विखे पाटील
यांच्या जयंतीनिमित्त शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.


No comments:
Post a Comment