Monday, 7 January 2019

शिक्षणाच्या बाबतीत कोपरगाव तालुका अग्रेसर- आशुतोष काळे




शिर्डी लाईव्ह(प्रतिनिधी):-
                   शिक्षणाच्या बाबतीत कोपरगाव तालुका जिल्ह्यात अग्रेसर असून शिक्षण हे पवित्र काम समजून पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद सदस्य हे कामाला लागले आहे शिक्षण क्षेत्रात मोठा बदल पाहायला मिळत आहे विद्यार्थी संख्या व गुणवत्ता वाढीवर येथील शिक्षकांचे सातत्याने लक्ष आहे. कोपरगाव पंचायत समितीमध्ये सत्तांतर होऊन काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची  सत्ता आल्यानंतर खऱ्या अर्थाने शिक्षण क्षेत्रात प्रगती झाली असल्याचे प्रतिपादन युवा नेते आशुतोष काळे यांनी केले.
                     ते कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे ग. र. औताडे पाटील विद्यालयात आयोजित शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर पंचायत समिती कोपरगाव अंतर्गत जिल्हा परिषद चांदेकसारे गटाच्या बाल आनंद मेळाव्या प्रसंगी बोलत होते.
                   यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे, सोनालीताई रोहमारे, सभापती अनुसयाताई होन,  गट विकास अधिकारी कपील कलोडे, गटशिक्षण अधिकारी शबाना शेख, उपसभापती अनिल कदम, काळे कारखान्याचे उपाध्यक्ष सुनील शिंदे, उत्तमराव औताडे, निवृत्ती शिंदे, पंचायत समिती सदस्य अर्जून काळे, एम.टी.रोहमारे, सचिन रोहमारे, सचिन मुजगुले, अँड राहुल रोहमारे,  रोहिदास होन,  उत्तम कुर्हाडे,  योगीराज देशमुख, नंदकिशोर औताडे, रोहिदास होन, भिकाजी होन,  वाल्मिक नवले, बाबुराव थोरात, बंडू थोरात,  सरपंच वैशाली आभाळे, विस्तार अधिकारी श्रीमती सोनवणे, केंद्र प्रमुख दिलिप ढेपले, राजेंद्र ढेपले अदिसह शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्तविक गट शिक्षणाधिकारी शबाना शेख यांनी केले. विद्याथ्यानी स्वागतगित, लेक वाचवा लेक शिकवा यावर नाटीका सादर करुन उपस्थितांची मने जिंकून घेतली. यावेळी गट विकास अधिकारी कपील कलोडे, सभापती अनुसया होन, सोनालीताई रोहमारे आदिनी आपले मनोगत व्यक्त केले.
               गटातील ४७ जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी भाजीपाला, हॉटेल्स, फळे अदि प्रकारचे स्टाँल लावले होते. आपल्याच पाल्यांकडून वस्तू खरेदी करण्याचा आनंद पालक घेत होते. सुत्रसंचालन व आभार चिमुकल्या विद्यार्थ्यांनी राधिका गडाख व मयुरी शेजवळ यांनी मानले.
     

(फोटो ओळी - कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे बाल आनंद मेळाव्या प्रसंगी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आशुतोष काळे व मान्यवर. छाया- गोरक्षनाथ वर्पे)

No comments:

Post a Comment