Thursday, 31 January 2019

झगडे फाटा ते रांजणगाव देशमुख रस्त्यावरील खड्डे न बुजवल्यास तीव्र आंदोलन छेडणार- अँड योगेश खालकर



रांजणगाव देशमुख (प्रतिनिधी):-
 
                                            झगडे फाटा ते रांजणगाव देशमुख या रस्त्यावर अंजनापूर, जवळके, बहादराबाद, शहापूर, वेस , सोयेगाव, धोंडेवाडी ही गावे असून जवळके चौफुली, रांजणगाव देशमुख चौफुली व बहादरपूर रस्त्यावर मोठं-मोठे खड्डे पडलेले असून ते आठ दिवसाच्या आत न बुजवल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा अँड योगेश खालकर यांच्यासह पूर्व भागातील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

                                            यावेळी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, झगडे फाटा ते रांजणगाव देशमुख येथील रस्त्यावर पडलेल्या खड्यामुळे दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढले असून या अपघातामुळे अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. तर काहींना कायमचे अपंगत्व ही आले आहे. अनेक ठिकाणी रस्ता मध्यभागी तर कडेला खचला आहे तसेच शिर्डी सारखे आंतरराष्ट्रीय दर्जाचे देवस्थान असल्यामुळे या रस्त्यावर अहोरात्र वाहतूक तसेच पायी येणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी असते मात्र खराब रस्त्यांमुळे पायी चालणे व गाडी चालवणे मोठे जिकरीचे होऊन बसले आहे. याबाबत वेळोवेळी लेखी-तोंडी सूचना देऊनही सार्वजनिक बांधकाम विभाग या कडे लक्ष देत नाही. त्यामुळे येत्या आठ दिवसात सार्वजनिक बांधकाम विभागाने जर हा प्रश्न मार्गी लावला नाही तर तीव्र आंदोलन उभारू असा इशारा अँड योगेश साहेबराव खालकर यांच्यासह पूर्व भागातील नागरिकांनी म्हटले आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनावर अमोल पाडेकर, पंकज जोंधळे, प्रसाद औताडे,  माजी सरपंच ज्ञानदेव गव्हाणे, प्रविण घारे, रामभाऊ थोरात, प्रदीप गव्हाणे, कैलास गव्हाणे, आदींच्या सह्या आहेत. 


No comments:

Post a Comment