रांजणगाव
देशमुख(वार्ताहर):-
कोपरगाव तालुक्यातील
मल्हारवाडी येथे आ. बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली समजतील गरीब, अपंग, विधवा,
परीतक्ता, जेष्ठ नागरिक यांच्या विकासासाठी चालविण्यात येणाऱ्या प्रहार अपंग
क्रांती आंदोलनाच्या वतीने मेळावा घेण्यात आला.
या मेळाव्यासाठी प्रहार
अपंग क्रांती संघटनेच्या राज्य समन्वयक संध्याताई जाधव, संघटनेचे ग्रामीण
जिल्हाध्यक्ष, मुक्तार शेख, नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र आहेर, गट प्रमुख
मुरलीधर बागुल, सीताराम मुळे, महिला अध्यक्ष शकुंतला पवार, कार्याध्यक्ष बाबासाहेब
रोडे, भाऊपाटील बिबे, बाबासाहेब गुंजाळ, पोलीस पाटील शिवराम गुंजाळ, उत्तम रानवडे,
आण्णा रानवडे, अर्जुन वेताळ, मच्छिंद्र शिंदे, नंदू येलमामे, भाऊसाहेब डांगे,
विलास डांगे, जगन्नाथ डांगे, नानासाहेब बिबे, आदींसह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी संध्या
जाधव यांनी शासनाकडून समाजातील अपंग, विधवा, जेष्ठ नागरिक यांच्यासाठी संजय गांधी
श्रावण बाळ निराधार योजनेचा लाभ घेण्याविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच
उपस्थितांना विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. अपंगांसाठीच्या पाच टक्के
निधी राखीव असतो याची माहिती देण्यात आली. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर
होते. उपस्थितांचे आभार सीताराम मुळे यांनी मानले.
(फोटो ओळी- कोपरगाव तालुक्यातील मल्हारवाडी येथे
प्रहार अपंग
क्रांती आंदोलनाच्या वतीने मेळावा घेण्यात आला.)

No comments:
Post a Comment