Sunday, 13 January 2019

धोंडेवाडी येथे पशु पक्षी प्रदर्शन; ३०० जनावरांचा सहभाग; पशुपालकांना रोख बक्षिसे

शेतकऱ्यांची जाण असलेले सरकार सत्तेवर यावे- ना. शालिनी विखे


शिर्डी लाइव्ह (प्रतिनिधी):-
                                     दुष्काळी परीस्थीतिने शेतकरी बेजार झालेला आहे. अशा परिस्थितीतही शेतकरी पशुधन जगविण्यासाठी धडपडत आहे. शेतकऱ्यांना आपल्या शेती उत्पादनाला भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची जाण असलेले सरकार सत्तेवर यावे असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शालिनी विखे पाटील यांनी केले.
                                    त्या कोपरगाव तालुक्यातील धोंडेवाडी येथे आयोजित चांदेकसारे जिल्हा परिषद गटाचे भव्य पशु पक्षी प्रदर्शनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. जिल्हा परिषद अहमदनगर व पशुसंवर्धन विभाग पंचायत  समिती कोपरगाव यांच्या वतीने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्षा सौ. राजश्री घुले, काळे कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे, जिल्हा परिषद सदस्या सौ. सोनाली रोहमारे, अजय फटांगरे, दंडवते, सोनाली साबळे, पंचायत समिती सभापती अनुसया होन, अर्जुन काळे, पौर्णिमा जगधने, योगिता पवार, सुनील शिंदे, अनिल कदम, अशोक रोहमारे, राहुल रोहमारे, वैशाली आभाळे, बाबुराव थोरात, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुनील तुंबारे, सहाय्यक आयुक्त डॉ. अजयनाथ थोरे, पशुधन विस्तार अधिकारी डॉ. दिलीप दहे, डॉ. जामदार, गट विकास अधिकारी कपिल कलोडे, सहाय्यक गट विकास अधिकारी महेश वळवी, आदींसह मान्यवर उपस्थित होते.
                                  सौ. विखे पुढे म्हणाल्या की, जिल्हा परिषदेमध्ये पशुसंवर्धन खात्याला सोनाली रोहमारे यांच्यासारखे अभ्यासू व्यक्तिमत्व मिळाले असून त्यांच्या अत्यंत आग्रहामुळे हा कार्यक्रम आपण येथे घेत आहोत. दुधाच्या दरासंधार्भात मंत्री महादेव जाणकर यांच्याशी चर्चा झाली आहे. साईजोती स्वयंसहाय्यता बचत गटाचे प्रदर्शन नगर येथे सुरु असून आपल्या ग्रामीण भागातील महिलांना नवीन प्रेरणा घेण्यासाठी आपण तेथे पाठवले पाहिजे.
                                 या प्रदर्शनातील उत्कृष्ट पशुधनासाठी कर्मवीर शंकरराव काळे साहेब यांच्या स्मरणार्थ विविध गटांसाठी ३५००० रुपयांचे बक्षीस देण्यात आले. तसेच प्रदर्शनात सहभागी पशुधनासाठी जिल्हा परिषदेच्या वारीने उत्तेजनार्थ रोख स्वरूपाचे बक्षिस देण्यात आले. यावेळी डॉ. तुंबारे, डॉ. वाकचौरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
                                 जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष राजश्री घुले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, पुण्यातील एक कंपनी आपल्या गीर गायींचे दूध मुंबई मध्ये ३०० रुपये प्रतिलिटर प्रमाणे विकते त्याचप्रमाणे आपणही गीर गायी जोपासाव्या. शेती करत असताना दुधाचा जोडधंदा असायला हवा.
                                काळे कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दुष्काळ पडलेला असून शेती उत्पादनाला भाव नाही. पशु किंवा पक्षी पालन करताना आपला खर्च कमीत- कमी कसा होईल याकडे आपण लक्ष द्यायला हवे.
                                 सादर प्रसंगी पशुधन विकास अधिकारी डॉ. संतोष वाकचौरे, डॉ. साखरे, डॉ. खर्डे, डॉ. पावसे, डॉ. भोरे, डॉ. पुंड, डॉ. बन, डॉ. चत्तर,  डॉ. भोंडे, डॉ. कदम, डॉ दिघे, डॉ. घोरपडे, डॉ. बाचकार, डॉ. भांगरे, डॉ. सातपुते, सौ. डॉ. काटे, सौ. डॉ. मुळूक, डॉ. मिसाळ , डॉ. गायकवाड, डॉ. शिंदे, डॉ. धुमाळ, डॉ. घोरपडे, डॉ. बाचकर, डॉ. बारहाते, डॉ. शिंदे एस डी यांच्यासह धोंडेवाडी सह परिसरातील नागरिक व पशुपालक आपल्या पशूंसह मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ३०० पशु या प्रदर्शनामध्ये सहभागी झाले होते. यामध्ये संकरित गायी, कालवड, देशी गायी, बैल, घोडे, शेळ्या, गोऱ्हे आदी जनावरे होती. निवेदन बाळासाहेब चिमणराव राहणे यांनी, प्रास्ताविक सोनाली रोहमारे यांनी तर आभार अजय फटांगरे यांनी व्यक्त केले.


(फोटो ओळी- कोपरगाव तालुक्यातील धोंडेवाडी येथे पशु पक्षी प्रदर्शनाच्या वेळी पशूंची पाहणी करताना जिल्हा परिषद अध्यक्षा ना. सौ शालिनी विखे तसेच उपाध्यक्षा राजश्री घुले. छाया- गोरक्षनाथ वर्पे)




No comments:

Post a Comment