कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथील सचिन जगन रणधीर वय ३० वर्षे यांनी राहत्या घरात छताला दोरीच्या साहाय्याने फाशी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
ही घटना दिनांक १ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान घडली. यावेळी सचिन यांचा भाऊ किरण यांनी सचिनला पहिले असता आरडा ओरडा केला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील राजेंद्र शेटे यांनी घटनास्थळी जाऊन सादर घटनेची माहिती शिर्डी पोलीस स्टेशनला दिली.
माहिती मिळताच शिर्डी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेंडगे, पोलीस उपनिरीक्षक दाणे व पोलीस कॉन्स्टेबल अभंग, पोलीस कॉन्स्टेबल राठोड यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी राहता येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. त्यानंतर अतिशय शोकाकुल वातावरणात रांजणगाव देशमुख येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही.
No comments:
Post a Comment