सामाजीक एकता म्हणजे काला- वावीकर महाराज
बहादरपूर येथे सुवर्ण महोत्सवी अखंड हरीनाम सप्ताहाची सांगता
रांजणगाव देशमुख(वार्ताहर):-
भगवंत प्रत्येकाच्या भावनेप्रमाणे प्रसाद देतो. तसेच तो आपल्याबरोबर राहून आपल्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवतो. काला म्हणजे सर्वधर्म समभाव व सामाजिक एकता व अखंडता होय असे प्रतिपादन हभप पांडुरंग गिरी महाराज वावीकर यांनी केले.
कोपरगाव तालुक्यातील बहादरपुर येथे सुरु असलेल्या श्री संत सदगुरु गोपाजीबाबांच्या सुवर्ण महोत्सवी अखंड हरीनाम सप्ताहाची दि. ४ मी रोजी सांगता झाली यावेळी काल्याच्या कीर्तनात ते बोलत होते. यावेळी सामाजिक , राजकीय, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर व भाविक लाखोंच्या संख्येने उपस्थित होते. वावीकर महाराज पुढे म्हणाले की, आपल्याला देव अजून कळलेला नाही. आपल्या मनोभूमिकेला परमात्मा कळला तर सोन्याला सुगंध येईल. विचारशून्य माणसे देव जाणू शकत नाही. आपण समाजाला तसा मर्यादित देव नाही. देव सर्वव्यापी व सर्वज्ञ आहे. देवाकडे जाताना अंतरीचा व बाहेरचा भाव सारखाच असावा. कंसाने महाबळ दैत्याला व पुतना मावशीला कृष्णाला मारण्यासाठी पाठवले त्यांचा अंतरीचा भाव चांगला नसल्याने भगवान श्रीकृष्णाने त्याना मारले. सामाजिक एकता व अखंडता म्हणजे काला. सर्वांनी एकत्र येउन विकाच्या दृष्टीने काम करणे म्हणजेच काला होय.
सप्ताहाचे नियोजन अगदी उत्कुष्ट प्रकारे करण्यात आले होते. सप्ताह काळात हभप महाराज उखळीकर यांच्या वाणीतून भागवताचे श्रवण भाविकांनी केले. हभप बबन महाराज गाडेकर यांच्या वाणीतून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा पार पडला. दररोज विविध ८ ते १० गावे सप्ताह स्थळी भाकरी घेऊन येत. सकाळी व सायंकाळी आमटी भाकरीच्या पंगतीचे आयोजन कारण्यात आले होते. सप्ताह काळात २९ एप्रिल रोजी रामगिरी महाराज यांच्या हस्ते मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण झाले.दिवसागणिक भाविकांची गर्दी वाढत होती. दररोज संध्याकाळी सुमारे पाच हजार भाविक कीर्तनाचा व महाप्रसादाचा लाभ घेत होते. सांगतेच्या दिवशी माजी महसुल मंत्री आ. बाळासाहेब थोरात, संजीवानाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, सभापती सुनील देवकर, कोळपेवाडी कारखान्याचे उपाध्यक्ष सचिन रोहमारे, संजीवनीचे उपाध्यक्ष शिवाजी वक्ते, स्वाभिमानी विकास आघाडीचे नितीनराव औताडे, अरुण येवले, साईनाथ रोहमारे, सुनील शिंदे, नानासाहेब गव्हाने, मंदिराचे इंजिनियर प्रकाश गव्हाने, दक्षिण मुंबई शिवसेना उपविभाग प्रमुख संजय रहाणे, आदी मान्यवर उपस्थित होते. तर सप्ताह काळात सिन्नर चे आमदार राजाभाऊ वाजे, माजी खासदार भाउसाहेब वाकचौरे, आशुतोष काळे, आदी मान्यवरांनी भेटी दिल्या. ग्रामास्तांच्या वतीने सप्ताहास सहकार्य केलेल्या सर्वांचे ऋण व्यक्त करण्यात आले.


फोटोओळी- कोपरगाव तालुक्यातील बहादरपुर येथे संपन्न झालेल्या अखंड हरीनाम सप्ताहाच्या काल्याचे कीर्तनाचे पुष्प गुंफताना हभप पांडुरंग महारज गिरी व समोर उपस्थीत असलेले प्रचंड भाविक. तर दुसर्या छायाचित्रात सकाळी काढण्यात ग्रंथदिंडीमध्ये सहभागी झालेले भाविक. (छाया-विकास गोर्डे)
No comments:
Post a Comment