संस्कृती रक्षणाची जबाबदारी तरुणांची- हभप जळकेकर महाराज
रांजणगाव देशमुख(वार्ताहर):-
जीवनात मोक्ष ही अध्यात्माची परमोच्च पातळी असली तरी संतामंडळीना मोक्षप्राप्ती कठीण वाटत नसून त्यासाठी त्यांना वेगळे प्रयत्न करावेच लागत नाही पर्यावरण, धर्म, संस्कृती यांचे रक्षण करण्याची जबाबदारी तरुणांची आहे असे प्रतिपादन खानदेशरत्न हभप ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांनी व्यक्त केला.
ते कोपरगाव तालुक्यातील श्री क्षेत्र बहादरपूर येथील गोपाजी बाबा सुवर्ण महोत्सवी साप्ताहाचे ५ वे पुष्प गुंफताना बोलत होते. महाराज पुढे म्हणाले की जीवनात पत्नीला पैशाने, मित्राला सत्यावाचानाने, पुत्राला प्रेमाने आणि मोक्षाला ज्ञानाने आपलेसे करावे. परमेश्वर सोडून संसार केवळ येरझार आहे. माणसाच्या वृत्तीवाराचे अज्ञानाचे आवरण जोपर्यंत जात नाही तोपर्यंत ज्ञान मिळत नाही. परीसाप्रमाने संतसंगीताने माणसाच्या जीवनाचे सोने होते. संताना मोक्षापेक्षाही भक्तिरस अधिक प्रिय आहे. महाराजांनी अनेक सामाजिक अनिष्ठ चालीरीती विरुद्ध आपल्या परखड वाणीतून प्रबोधन केले. पर्यावरण, धर्म, संस्कृती यांचे रक्षण करण्याची जबाबदारी तरुणांची आहे. हिंदुस्तान अखंड रहावा यासाठी विघातक प्रवृत्तींना वेळीच रोखा आणि भारत माता की जय हा मंत्र घराघरात पोहोचवा. हिंदुस्तानात राहायचे असेल तर हिंदूंचे एकावेच लागेल आणि भारत मातेचा आदर करावाच लागेल असेही त्यांनी सांगितले.
कीर्तनाचे चौथे पुष्प गुंफताना हभप ज्ञानेश्वर महाराज कदम यांनी सांगितले की. पिंपळनेर निवासी प्रसिध्द संत निळोबाराय यांनी निज भक्ताची आवडी,संभाळीत घडी घडी राखुनिया भुक तहान,करी त्यांचा बहुमान या आपल्या अभंगातून भगवतांची आवडड व्यक्त केली आहे.या अभंगाचे निरूपण करतांना ज्या माणसात जो उत्कृष्ट गुण आहे त्या गुणाने आपण देवाची भक्ती करून देवाचा प्रिय होऊ शकतो. किर्तनकार आणि कालाकार जर एकत्र आले तर तत्वज्ञानाचे व्यासपीठ निर्माण होऊ शकते. अहमदननगर जिल्हयात ज्ञानेश्वरीची निर्मिती झाली असल्याने जिल्हा भाग्यवान आहे. कोणालाही ठिकाणाची ओळख प्रसिध्द व्यक्तीमत्वामुळे होत असते. रणागगंण गाजणारा अनेक महिने तलवारीला धार लाववतो म्हणून तलवारही त्याला साथ करते. समाजाला आत्मसुखाची कल्पना नाही विषयांचे अंतरंग माहित नाही पण संत विषयांचा त्याग करतात आणि विषयतो त्यांचा झाला नारायण या रितीने जीवन जगतात.
व्यासपिठावर पाडुंरंग महारज वावीकर, बबन महाराज गाडेकर, बबन महाराज गव्हाणे, रामप्रभु महाराज आदि उपस्थित होते. सप्ताहास दिवसागणिक भाविकांची उपस्थिती वाढत आहे.
(फोटो ओळी- कोपरगाव तालुक्यातील बहादरपूर येथे कीर्तनाचे पाचवे पुष्प गुंफताना हभप ज्ञानेश्वर महाराज जळकेकर व समोर उपस्थितीत भाविक. छाया- विकास गोर्डे)
रांजणगाव देशमुख(वार्ताहर):-
जीवनात मोक्ष ही अध्यात्माची परमोच्च पातळी असली तरी संतामंडळीना मोक्षप्राप्ती कठीण वाटत नसून त्यासाठी त्यांना वेगळे प्रयत्न करावेच लागत नाही पर्यावरण, धर्म, संस्कृती यांचे रक्षण करण्याची जबाबदारी तरुणांची आहे असे प्रतिपादन खानदेशरत्न हभप ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांनी व्यक्त केला.
व्यासपिठावर पाडुंरंग महारज वावीकर, बबन महाराज गाडेकर, बबन महाराज गव्हाणे, रामप्रभु महाराज आदि उपस्थित होते. सप्ताहास दिवसागणिक भाविकांची उपस्थिती वाढत आहे.
(फोटो ओळी- कोपरगाव तालुक्यातील बहादरपूर येथे कीर्तनाचे पाचवे पुष्प गुंफताना हभप ज्ञानेश्वर महाराज जळकेकर व समोर उपस्थितीत भाविक. छाया- विकास गोर्डे)

No comments:
Post a Comment