कै. सुप्रिया खर्डे हिच्या स्मरणार्थ बहादरपूरच्या गोपाजीबाबा संजीवन समाधी मंदिरास सागवणी मंदिर
रांजणगाव देशमुख( वार्ताहर):-
तालुक्यातील
श्रीक्षेत्र बहादरपूर येथील संत सदगुरू गोपाजी बाबांच्या मुर्तीची
प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण वर्धापनदिनाचे औचित्य साधून 26 एप्रिल रोजी
बालब्रम्हचारी अरविंद महाराज, राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांचे परमशिष्य प
पू. रमेशगिरी महाराज यांच्या हस्ते व माजीमंत्री शंकररावजी कोल्हे यांच्या
प्रमुख उपस्थितीत संपन्न होत असून सकाळी 10 ते 12 या वेळेत किर्तन केसरी
हभप पांडुरंगगिरी महाराज वावीकर यांचे किर्तन, त्यानंतर महाप्रसादाचा
कार्यक्रम होईल तत्पुर्वी सकाळी 6 ते 9 मुर्ती प्राणप्रतिष्ठा होत असून
त्यानिमीत्त संवत्सर येथील भाविक भाउसाहेब खर्डे ऊर्फ रामचंद्र गवारे यांनी
मुलगी कै. सुप्रिया हिच्या स्मरणार्थ गोपाजीबाबा समाधीस सागवणी मंदिर
अर्पण केले आहे.
सदरचे
सागवणी मंदिर सिन्नर तालुक्यातील पाथरे येथील कारागिर श्री. बाबासाहेब
निवृत्ती सोमवंशी यांनी पाच ते सहा सहका-यांच्या मदतींने दोन महिन्यांत
तयार केले असून त्याची उंची कळसासह अकरा फुट तर रूंदी आठ फुट आहे. हे
मंदिर बनविण्यांसाठी सुमारे चार लाख रूपये खर्च आलेला आहे.
श्रीक्षेत्र
बहादरपुर येथे परिसरातील भाविकांनी तसेच पंचकमिटी गांवक-यांच्या
सहकार्यातुन 225 वर्षापुर्वी संजीवन समाधी घेतलेल्या गोपाजीबाबा स्थळाचा
विकास करण्यांत आला असून याठिकाणी सुमारे 70 ते 80 लाख रूपये खर्च करून
साडेपाच हजार स्क्वेअरफुट जागेवर पाच कळसाचे भव्यदिव्य मंदिर उभारण्यांत
आले आहे. गोपाजीबाबा यांनी 12 वर्षे तपश्चर्या करून त्यानंतर बहादरपुर येथे
संजीवन समाधी घेतलेली आहे. प्रत्येक वर्षी चैत्र वद्य पंचमीच्यादिवशी
याठिकाणी धार्मीक सप्ताहाचे आयोजन केले जाते. गेल्याच वर्षी सुवर्णमहोत्सवी
सप्ताह संपन्न झाला. मंदिर समितीचे प्रमुख किशोर रहाणे व पंच बाळासाहेब
रहाणे, कैलास रहाणे, रामदास रहाणे, पुंजाहरी राहणे, रमेश रहाणे तसेच
गांवक-यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम संपन्न होत आहे. दरवर्षी आळंदी,
त्र्यंबकेश्वर, जेजुरी, पुणतांबा आदि ठिकाणी दिंडया काढल्या जातात.
महाशिवरात्र व गुरूपौर्णिमा उत्सव येथे मोठया प्रमाणांत साजरे केले जातात.
गोपाजीबाबांच्या संजीवन समाधी दर्शनांसाठी नोकरीनिमीत्त बाहेरगांवी
असलेली मंडळी तसेच शुभविवाह होवुन बाहेर गेलेली मंडळी दर चैत्र वद्य
पंचमीला येथील सप्ताहाला आर्वजुन दर्शंनासाठी हजेरी लावतात. श्रावणाच्या तिस-या सोमवारी गोपाजीबाबांची यात्रा भरते. संजीवन समाधी
गोपाजीबाबांच्या दर्शंनाने असंख्य भक्तांवर कृपादृष्टी झालेली आहे.
गोपाजीबाबा हे महादेवाचे भक्त होते तर कै. सुप्रिया भाउसाहेब खर्डे या
भगिनी गोपाजीबाबांच्या भक्त होत्या. त्यांच्यावर गोपाजीबाबा, दावलमलिक व
कोल्हापूरच्या महालक्ष्मीची कृपादृष्टी होती. त्यांच्या निधनानंतर कै.
सुप्रिया खर्डे यांनी बाळापूर अकोला येथील विठठल पांडुरंग माळी यांच्या
स्वप्नात जाउन गोपाजीबाबा मुर्ती व वर्धापनदिन कार्यक्रमाविषयी दृष्टांत
दिला होता, त्यातील ब-याचशा गोष्टी तंतोतंत घडल्या म्हणून संजीवन समाधी
मंदिराशेजारीच कै. सुप्रिया खर्डे हिच्या स्मरणार्थ तुळशीवृदांवन स्मारक
तयार करण्यांत आले आहे त्याचे लोकार्पण 26 एप्रिल रोजी होत आहे. तरी
जास्तीत जास्त भाविकांनी संजीवन समाधी गोपाजी बाबा मुर्ती प्राणप्रतिष्ठा,
सागवणी समाधी मंदिर व तुळशी वृदांवन स्मारक लोकार्पण कार्यक्रमांसाठी
उपस्थित रहावे असे आवाहन बहादरपुर ग्रामथ, भजनी मंडळ, देवस्थान कमिटीने
केले आहे.

No comments:
Post a Comment