शिर्डी लाईव्ह(प्रतिनिधी):-
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शिक्षक नेहमी प्रयत्न करीत असतात त्यामुळेच जिल्हापरिषदेच्या शाळा या इंग्रजी माध्यमाच्या तुलनेत देखील कुठेच कमी पडत नसून गुणवत्तेमध्ये नेहमीच अग्रेसर आहेत. विशेष म्हणजे इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनीही आपल्या पाल्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून मराठी माध्यमाच्या शाळेत दाखल केले आहे हे सर्व श्रेय जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांचे आहे असे प्रतिपादन गट शिक्षण अधिकारी श्रीमती शबाना शेख यांनी केले.

त्या कोपरगाव तालुक्यातील शहापूर, पाचोरे मळा, ओसपांढरी जिल्हा परिषद शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात बोलत होत्या.
शहापूर, पाचोरेमळा, ओसपांढरी या तिन्ही शाळेंचे वार्षिक स्नेहसंमेलन
उत्साहात पार पडले. यावेळी चिमुकल्यांनी सादर केलेल्या विविध कार्यक्रमास
शिक्षकांसह ग्रामस्थ, पालकांनी उत्स्फूर्तपणे दाद देत कौतुक केले.
कोपरगाव
तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा शहापुर येथे पाचवी पर्यंतचे वर्ग असून
केंद्रशाळा पोहेगांव अंतर्गत या शाळेने वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित केले
होते. यावेळी शाळेतील चिमुकल्यांनी जुन्या व नव्या बहारदार गीतांसह
रसिकांचे चांगले मनोरंजन केले. कार्यक्रमास गटशिक्षणाधिकारी शबाना
शेख, केंद्रप्रमुख आर.के.ढेपले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राहुल
घारे, सुमित घारे , कैलास सदाफळ यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी, पालक,
ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच शिक्षक श्री सैंदाने सर, सुनीता सोनवणे मॅडम, भास्कर सोनवणे, राजश्री सोनवणे, भोजने धोंडिबा, सचिन सातपुते, अलका पाचोरे
यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
भास्कर सोनवणे यांनी केले तर आभार सुनिता सोनवणे यांनी मानले.
फोटो-
कोपरगाव तालुक्यातील शहापुर येथे बक्षीस वितरण करतांना गटशिक्षणाधिकारी शेख मँडम,केंद्रप्रमुख ढेपले साहेब व.आदी मान्यवर.

No comments:
Post a Comment