Monday, 13 August 2018

पंचमीपासून रांजणगाव देशमुख येथे भागवत सप्ताहाचे आयोजन


शिर्डी लाइव्ह, प्रतिनिधी:- 
                                    कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथे रामायणाचार्य ह भ प रामराव महाराज ढोक नागपूर यांच्या प्रेरणेने तसेच ह भ प बबन महाराज गव्हाणे व ह भ प अशोक महाराज क्षीरसागर अमरावती, बबन महाराज गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली दि १५ ऑगस्ट ते  २३ ऑगस्ट या दरम्यान अखंड हरिनाम भागवत सप्ताहाचे आयोजन कारण्यात आले आहे. 
                                     या सप्ताहात दि.१५ रोजी हभप माउली महाराज आळंदी, दि. १६ हभप दिगंबर महाराज किरकाडे दि. १७  हभप पांडुरंग महाराज गिरी दि. १८  हभप  विकास महाराज गायकवाड, दि. १९ हभप शिवाजी महाराज देशमुख, दि. २० हभप उद्धव महाराज मंडलिक, दि. २१ हभप अशोक महाराज क्षीरसागर, दि. २२ ह भ प रामराव महाराज ढोक व दि. २३ रोजी  ह भ प रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांचे काल्याचे कीर्तन होणार आहेत. सप्ताह काळात सकाळी ४ ते ६ काकडा, ६ ते ११ ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी ३ ते ४ भजन, सायंकाळी ५ ते ६ ज्ञानेश्वर प्रवचन, सायंकाळी ६ ते ७ हरीपाठ, रात्री ९ ते ११ कीर्तन व नंतर हरिजागर असे कार्यक्रम असणार आहेत. दि २३ ऑगस्ट रोजी सप्ताहाची सांगता होणार असून सकाळी कीर्तनानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. या सप्ताहात गावातील तसेच नोकरी व्यवसायानिमित्त बाहेर असलेले सर्वच ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात. समारोपाच्या दिवशी काकडा पेटवण्यासाठी भद्रा मारोती खुलताबाद येथून दरवर्षी मशाल आणली जाते या मशालीचे हे १३ वे वर्ष आहे. या कार्यक्रमाचा परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा असे रांजणगाव देशमुख ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात आले आहे.


फोटो- श्री. क्षेत्र हनुमान देवस्थान रांजणगाव देशमुख 

No comments:

Post a Comment