शिर्डी लाईव्ह (प्रतिनिधी):-
कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात
साजरा करण्यात आला. सकाळी ७:३० वाजता गावातील जय हनुमान विद्यालयातील ध्वजारोहण झाले. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांची प्रभात फेरी निघाली. भारत माता कि जय वंदे मातरम च्या जय
घोषाने गाव दणाणून गेले होते. गावातील लहान थोरांमधील उत्साह अवर्णनीय होता. प्रभात
फेरीनंतर गावातील ग्रामपंचायत व सोसायटीचे ध्वजारोहण
पार पडले. त्यानंतर जिल्हा
परिषद प्राथमिक शाळेत आयोजित कार्यक्रमात मागील वर्षीच्या गुणवंत
विद्यार्थ्यांचा
बक्षिसे देऊन गौरव करण्यात आला. तसेच यावेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
यावेळी ग्रामविकास अधिकारी शेख, सरपंच संदीप रणधीर, उपसरपंच बाबासाहेब गोर्डे, माजी पोलीस पाटील निवृत्ती गोर्डे, पोलिस पाटिल राजेंद्र शेटे ग्रामपंचायत
सदस्य, तलाठी जी पी कांगणे, मुख्याध्यापक अशोक दिघे सर, अमर बोगा, विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्त मोठ्या संख्येने हजर होते. सूत्रसंचालन गवळी सर व कदम सर यांनी केले.
-
यावेळी जय हनुमान विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लेझीम पथक तयार करून मनोरा, मयूर, दहीहंडी अशा प्रकारात लेझीम नृत्य सादर केले. यावेळी ग्रामस्थांनी शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. लेझीम पथकाला संजय वर्पे सर यांनी मार्गदर्शन केले.






No comments:
Post a Comment