रांजणगाव देशमुख(वार्ताहर);-
कोपरगाव तालुक्यातील बहाद्दरपूर येथे दि. २६ पासून
श्री संत सद्गुरू
गोपाजी बाबांचा यात्रोत्सव सुरु झाला असून वर्षी
रविवार दि २६ ऑगस्ट ते २८ ऑगस्ट या कालावधीत यात्रोत्सव पार पडणार आहे.
रविवार
दि २६ रोजी रोजी सायंकाळी सदगुरु गोपाजी बाबांच्या रथाची भव्य मिरवणुक
तसेच शोभेच्या दारूच्या आतषबाजीचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी १० वाजता
भव्य लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले असून सोमवार
दि २७ रोजी पहाटे ४ ते ६ बाबांच्या समाधीचे पुजन व अभिषेक सोहळा
तसेच सकाळी १० ते १२ भव्य गंगाजल कावड मिरवणुक व दुपारी २ ते ६
महाराष्ट्रातील नामांकित कुस्तीपटूंचा कुस्त्यांचा
हगामा असे कार्यक्रम होणार आहेत. परीसरातील भाविकांनी या उत्सवात सहभागी
व्हावे असे आवाहन बहादरपुर यात्रा कमिटी व बहादरपुर
ग्रामास्थांनी केले आहेत. बहाद्दरपूर येथे तळिक्यातून तसेच तालुक्याच्या
बाहेरूनही गोपाजी बाबांचे भक्त दर्शनासाठी व नवस पूर्ण करण्यासाठी येत
असतात.
No comments:
Post a Comment