Tuesday, 12 June 2018

वेस येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ; विक्रीकर निरीक्षक जोंधळे यांची उपस्थिती


रांजणगाव देशमुख (वार्ताहार):- कोपरगाव तालुक्यातील वेस-सोयगाव येथील दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच नुकतीच बहादराबाद येथील विक्रीकर निरिक्षक पदी निवड झालेले सागर मिनीनाथ जोंधळे यांचाही सत्कार करण्यात आला. वेस-सोयगाव चे प्रथम लोकनियुक्त सरपंच माणिकराव दिघे यांनी आयोजित केलेल्या विद्यार्थ्यांच्या या सत्काराच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वेस गावचे जेष्ठ नेते दत्तु बाबा गोसावी हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणुन नुकतीच विक्रीकर निरिक्षक पदी निवड झालेले सागर मिनीनाथ जोंधळे हे होते. यावेळी वेस-सोयगाव सरपंच आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की ग्रामीण भागातील विद्यार्थी कोणीही शिक्षणापासुन वंचित राहु नये. तसेच पालकांनी आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यायला हवे. तसेच आपल्या भागातील जास्तीत जास्त मुले अधिकारी बनायला हवे. यावेळी कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समीतीचे संचालक सुधाकर गाढवे, उपसरपंच श्री.रामदास भडांगे, सदस्य गोरक्षनाथ माळी, नसीरभाई इनामदार रईसभाई इनामदार, भागवत आण्णा खंडीझोड, मेजर सुभाष गोसावी, दिपक कोल्हे, आप्पासाहेब कोल्हे, आनंदा भडांगे, रावसाहेब भडांगे, शिवाजी शेंडगे, नारायण खंडीझोड, दत्तु गोर्डे आदि ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच पालकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment