Saturday, 23 June 2018

जय हनुमान विद्यालयात योग दिन उत्साहात ; योग शिक्षक वर्पे सर यांच्याकडून योगाचे धडे


रांजणगाव देशमुख(प्रतिनिधी):-
योग ही भारताची प्राचीन संकल्पना असून समस्त जगाला भारत देशाने योग दिला आहे. २१ जून हा दिवस गेल्या ४ वर्षांपासून आंतराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने देशभरात सर्वच ठिकाणी हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख सह परिसरातील सर्वच गावांमध्ये योग दिन उत्साहात व मोठ्या जोशात साजरा करण्यात आला. रांजणगाव देशमुख येथील जय हनुमान विद्यालयात सकाळी योग दिन साजरा करण्यात आला. योग शिक्षक वर्पे सर यांनी विद्यार्थ्यांना सुमारे अडीच तास योगाचे धडे दिले. मुख्याध्यापक दिघे सर यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्व समजून सांगितले. सर्वच शिक्षकांनी योगासने केली. यावेळी गमे सर, गवळी सर, कालेवार सर, वाघे सर, कदम सर, महाजन सर, गडाख सर, सौ दिघे मॅडम, सौ गुंजाळ मॅडम, सौ. गुरव मॅडम, आदी शिक्षक व श्री. मुलमुले, भालेराव, रणधीर हे शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
रांजणगाव देशमुख परिसरातील अंजनापूर, जवळके, पोहेगाव, काकडी, मनेगाव, बहाद्दरपूर, वेस या गावांतील जिल्हा परिषदेच्या व माध्यमिक शाळांमध्येही योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

No comments:

Post a Comment