Thursday, 14 June 2018

जवळके येथे जिल्हा बँकेकडून एटीम सेवा सुरु ; ग्राहकांची सोय होणार ; वेळही वाचणार


रांजणगाव देशमुख(वार्ताहर):- कोपरगाव तालुक्यातील जवळके येथे ग्रामीण भागातील नागरिकांच्या सेवेसाठी जिल्हा बँकेने ए टी एम मशीन सुरु केले आहे. भविष्यात हे ए टी एम ग्राहकांना चांगली सेवा देईल अशी ग्वाही बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. दि.अहमदनगर डिस्टिक्ट सेंटल को- ऑप बँक .लि अहमदनगर च्या जवळके शाखेचे ए.टी.एम चे उद्घाटन जिल्हा बँक विकास अधिकारी कैलासराव गवळी यांचा हस्ते करण्यात आले. या एटीम सेवेमुळे ग्राहकांना बँकेतून पैसे काढण्यासाठी लागणारा मोठा वेळ वाचणार असून ग्राहकांची मोठी सोय होणार आहे. जवळके परिसरात रांजणगाव देशमुख, अंजनापूर, बहाद्दरपूर, धोंडेवाडी, वेस, सोयगाव, काकडी, मनेगाव आदी मोठी गावे असून या सर्वच गावांमध्ये एकही राष्ट्रीयकृत बँक नसून बँकेच्या कामासाठी नागरिकांना तालुक्याच्या गावाला जावे लागते त्यामुळे नागरिकांचा वेळ व पैसे दोन्ही खर्च होतात. परिसरात एक राष्ट्रीयकृत बँक सुरु व्हावी अशी म्हणी गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांमधून होत आहे. सदर प्रसंगी जवळके गावचे सरपंच बाबुराव थोरात, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब रहाणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती नानासाहेब गव्हाणे, पोलीस पाटील सुधीर थोरात, माजी सरपंच बंडोपंत थोरात, जेष्ठ नेते लक्ष्मण थोरात, माजी सरपंच कैलास रहाणे, माजी उपसरपंच आण्णासाहेब भोसले, जवळके शाखेचे सर्व अधिकारी व कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते अवेळी आभार जिल्हा बँकेचे जवळकेचे शाखा अधिकारी आहेर व औताडे यांनी मानले. (फोटो ओळी- जवळके ता. कोपरगाव येथे जिल्हा बँकेच्या वतीने एटीएम सुरु करण्यात आले. छाया- विकास गोर्डे)

No comments:

Post a Comment