रांजणगाव देशमुख(वार्ताहर):-
दोन जिल्ह्यांच्या सीमेवर सुरु होत असलेल्या साई फाउंडेशन च्या साई एज्युकेशन इंग्लिश मेडियम स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा उदघाटनाचा दिमाखदार सोहळा नुकताच कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथे पार पडला.
या सोहळ्यासाठी हभप रामाराव महाराज ढोक, सुदर्शन न्यूज दिल्ली चे चेअरमन सुरेश चव्हाणके, संजीवनी कारखान्याचे चेअरमण बिपीन कोल्हे, कोपरगाव नगरपालिकेचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष विजय वहाडणे, पोहेगाव पतसंस्थेचे चेअरमन नितीन औताडे, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब रहाणे, सरपंच संदीप रणधीर, माजी पोलीस पाटील निवृत्ती गोर्डे, उपसरपंच बाबासाहेब गोर्डे आदींसह मान्यवर मोठ्या संख्येने हजर होते.
यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, जगामध्ये नवीन तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी इंग्रजीतून शिक्षण घेणे गरजेचे झाले असून यासाठी संजय गोर्डे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी माध्यमाची शाळा सुरु करून विद्यार्थ्यांना मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. ही शाळा भविष्यात नव नवीन संधी उपलब्ध करून देईल.
या प्रसंगी गोर्डे यांच्या परिवारातील सुरेश गोर्डे, अशोक गोर्डे, कैलास गोर्डे, प्रकाश गोर्डे, गंगाधर गोर्डे, गोरक गोर्डे, बाबासाहेब सोपान गोर्डे, दीपक गोर्डे, पुंजाबाई गोर्डे आदींसह परिवारातील सदस्यांसह ग्रामस्थ मोठय संख्येने हजर होते. यावेळी सूत्रसंचालन धनंजय वर्पे यांनी केले तर आभार संजय गोर्डे यानी मानले.



No comments:
Post a Comment