Tuesday, 12 June 2018

काकडी विमानतळाच्या संरक्षक भिंतीला भगदाड ; विमानतळावर दुर्घटनांची मालिका


रांजणगाव देशमुख- प्रतिनिधी:- साईभक्ताच्या सोयीसाठी कोपरगाव तालुक्यातील काकडी येथे असलेल्या साईबाबा आंतराष्टीय विमानतळाच्या संरक्षक भिंतीला शनिवारी मोठे भगदाड पडले आहे. हे भगदाड विमानतळाच्या दक्षिणेला वडझरीच्या बाजुने पडले आहे. सातत्याने वेगवेगळ्या दुर्घटना या विमानतळाच्या परिसरात घडत आहे. यामुळे विमानतळाच्या सुरक्षेचे प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. शुक्रवारी ८ तारखेला वादळाने प्रवाशी आगमन कक्षाच्या काचा फुटुन मोठे नुकसान होते. त्या पावसाच्या ओलाव्यामुळेच ही सरक्षक भिंत खचुन तिला भगदाड पडल्याचा अंदाज आहे. या सरक्षक भिंतीचे काम सुरु आसतांना काकडीतील ग्रामस्थांनी काम निकृष्ठ प्रतिचे सुरु असल्याचे विमानतळ विकास प्राधिकरणचे तत्कालीन उपाध्यक्ष विश्वास पाटील यांच्या निदर्शनास आनुन दिले होते. शेवटी विमानतळाचे उदघाटनाला वर्ष उलटण्याच्या आतच ही भिंत पडण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून विमानतळावर अनेक घटना घडत असून यामध्ये तेथे भंडारगृहाला लागलेली आग, विमनातळावर घुसलेले कुत्रे, विमान धावपट्टीवरून घसरणे, वादळामध्ये विमानाच्या काचा फुटणे या सर्व घटना पाहता विमानतळावर संकटांची मालिकाच सुरु आहे. यामुळे साईभक्तांची मोठी गैरसोय होत आहे.

No comments:

Post a Comment